अशोक गायकवाड
रायगड :वसतिगृहात रहाणाऱ्या मुलामुलींकरिता इ.८ वी पासून पुढे मांग, भंगी, कातकरी व माडिया गोंड या जातीमधील मुला-मुलींकरिता इ.५ वी पासून निर्वाह भत्ता देण्यात येतो. निवासी शाळेतील मुलांकरिता इ.६ वी पासून इ.१० वी पर्यत शाळा आहे. विहित नमुन्यातील अर्ज वसतिगृहात वरील पत्यावर विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड-अलिबाग, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिर, सेंटमेरी स्कूलसमोर, श्रीबाग रोड, अलिबाग येथे अथवा संबधित गृहपालांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांच्या अधिनस्त अनु.जाती करीता सध्या ७ शासकीय वसतिगृहे व एक निवासी शाळा पुढीलप्रमाणे कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतीगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, महाड गोकुळ विहार, चवदार तळे ता. महाड, रिक्त जागा- अनु, जाती २५, अनु सूचित जमाती २, भटक्या विमुक्त जमाती ४, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ १, एकूण रिक्त जागा ३५. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड, जि. रायगड तालुका पोलिस स्टेशनजवळ, नवेनगर,, रिक्त जागा- अनु, जाती २९, अनु सूचित जमाती ३, भटक्या विमुक्त जमाती ३, आर्थिकदृष्टया मागास १, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ४०.रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुर्लीचे शासकीय वसतिगृह पाली-सुधागड, यांचे कार्यालय मधली आळी, राम मंदीर रोड, पाली-सुधागड, रिक्त जागा- अनु, जाती ५८, अनु सूचित जमाती २, भटक्या विमुक्त जमाती -१, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय २, अपंग २, अनाथ ०, एकूण रिक्त जागा ६६. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पनवेल, सेक्टर १०, प्लॉट नंबर २१ ग्रीनपार्क सोसायटी समोर, रिक्त जागा- अनु, जाती १२, अनु सूचित जमाती ०, भटक्या विमुक्त जमाती ०, आर्थिकदृष्टया मागास ०, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ १, एकूण रिक्त जागा १५.
रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह, अलिबाग, गणेशमंदीर शेजारी, विजय नगर, वरसोली-अलिबाग, रिक्त जागा- अनु, जाती ५३, अनु सूचित जमाती १, भटक्या विमुक्त जमाती १, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ६१.
रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलीचे शासकीय वसतिगृह अलिबाग, गोंधळपाडा- अलिबाग, रिक्त जागा- अनु, जाती ६१, अनु सूचित जमाती ०, भटक्या विमुक्त जमाती -१, आर्थिकदृष्टया मागास ४, विशेष मागासवर्गीय १, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ६९.
रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह बोरघर-हवेली, तालुका क्रीडा संकुलाजवळ, बोरघर-हवेली, ता. तळा, रिक्त जागा- अनु, जाती ६७, अनु सूचित जमाती २, भटक्या विमुक्त जमाती ३, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय २, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ८०.
रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकिय निवासी शाळा, जावळी, ता. माणगांव, रिक्त जागा- अनु, जाती ११९, अनु सूचित जमाती ०, भटक्या विमुक्त जमाती ०, आर्थिकदृष्टया मागास ०, विशेष मागासवर्गीय १, अपंग ५, अनाथ ०, एकूण रिक्त जागा १२५.
वसतिगृह प्रवेशाकरीता आरक्षणाचा तपशिल- अनु.जाती ८० टक्के, अनु.जमाती ३ टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग ०२ टक्के, आर्थिकदृष्टया मागास ५ टक्के, अनाथ ३ टक्के, निवासी शाळ प्रवेशाकरीता आरक्षणाचा तपशिल- अनु.जाती ८० टक्के, अनु.जमाती १० टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के, अपंग २ टक्के.
वसतिगृह/निवासी शाळेची वैशिष्टये-मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशितांकरिता लेखन साहित्याकरिता रु. ४ हजार, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता,. दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा रु.६००, निर्वाहभत्ता जिल्हापातळीवर रु.५००, निर्वाहभत्ता तालुका पातळीवर, शालेय/महा. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संचाकरिता गणवेष भत्ताप्रोजेक्ट रिपोर्ट/शै. सहल भत्ता, अॅप्रन भत्ता इ. आवश्यक कागदपत्र- प्रवेशपात्र विद्यार्थ्याच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनु. जाती, व जमाती विद्यार्थ्यांकरिता रु.२ लाख ५० हजारचे आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता रु.१ लाख ५० हजारचे आंत असावे, अर्जासोबत तहसिलदार यांचे सहीचा सन २०२३-२४ मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक, बँक खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.
000000
