ठाण्यातल्या जोशी, बेडेकर महाविद्यालयात करा एम. ए.,

ठाणे : विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी, बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने मराठी भाषा विषय घेऊन एम.ए.करण्याची संधी ठाण्यातच उपलब्ध करून दिली आहे. बी. कॉम., एम.कॉम, बी. एस्सी, झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करणाऱ्या युवक आणि युवतींना, गृहिणींसह एम.ए. करण्याची इच्छा असलेल्यांना मराठी विषय घेऊन एम.ए. करता येईल.
एम. ए. मराठी का आवश्यक?
विविध सरकारी आस्थापना आणि ठाणे महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना विभागीय बढत्यांसाठी एम.ए.आवश्यक असून ते पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. ही गरज ओळखून ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी, बेडेकर, कला वाणिज्य महाविद्यालयाने मराठी भाषा विषय घेऊन एम.ए.करण्याची संधी ठाण्यात उपलब्ध करून दिली आहे.
मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही या संधीचा लाभ घेता येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय बेडेकर यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली इतर विषयांसह मराठी भाषा विभागातर्फे विविध कोर्सेस घेण्यात येणार आहेत.एम.ए.पूर्ण केल्यावर आवडीच्या क्षेत्रात संशोधन करून पी.एचडी म्हणजेच डॉक्टरेट करता येईल. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा असे आवाहन मराठी भाषा विभागप्रमुख प्रा.डॉ. संतोष राणे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी 9820176934 / 9819023904 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
एम. ए. मराठीचा कालावधी २ वर्षे
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय? रोजगारभिमुख अभ्यासक्रम प्रसारमाध्यमे आणि भाषा व्यवहार, भाषांतरकौशल्ये, साहित्य, चित्रपटांसह मुद्रितशोधन आणि अनुवादशास्त्राचा अभ्यास, ग्रंथ व्यवहार, पुस्तक प्रकाशन, वितरण असा अभ्यासक्रम असणार आहे. तसंच करिअरच्या विविध संधीही आहेत. जसे की, कवी, लेखक, ब्लॉग लेख, पटकथा लेखक, सर्जनशील लेखक, दुभाषी निवेदक, पटकथा लेखक, संहिता लेख, जाहिरात लेखक, निवेदक, मुद्रितशोधक, प्राध्यापक, संशोधक होता येईल. जून २०२४ मध्ये हा कोर्स सुरु होईल. एम.ए. चा कालावधी दोन वर्षे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *