ईव्हीएम डेटा ऑपरेटर गुरव, वायकरांचा मेव्हणा आणि निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांच्या फोन कॉलचे गौडबंगाल कायम

मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या विजयात मोबाईलचा झोल असल्याचा आरोप प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी केल्यानंतर आता या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. मतदान केंद्रात बेकायदेशीरपणे फोन वापरणाऱ्या रविंद्र वायकर यांचा मेव्हणा त्यांना फोन वापरायला देणारा सरकारी ईव्हिएम ऑपरेटर गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यादिशेन पोलिस तपास सुरु आहे. यावर आज तातडीने पत्रकार परिषद घेत निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यंवंशी यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला पण पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने त्या गोंधळून गेल्या.

मतदान केंद्रात बेकायदेशिर रित्या ईव्हिएम डाटा ऑपरेटिंगचा फोन उमेदवार रविंद्र वायकर यांच्या मेव्हण्याला वापरण्याला देण्यावरू त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय मग तुम्हीही मतदान केंद्रात सारखे फोनवर बोलत होता तुमच्यावर गुन्हा का दाखल होऊ नये? तुम्ही कुणाशी बोलत होता ? य़ा प्रश्नांवर वंदना सुर्यवंशी समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. मतदान केंद्रातील फुटेज न्यायालयाने परवानगी दिल्याशिवाय आम्ही देऊ शकणार नाही असे सारके पालपूद लावणाऱ्या वंदना सुर्यंवंशी यांना मग पोलिस तपास करुन गुन्हा कसा सिद्ध करणार यावर त्यांना पुन्हा तेच पालपुद लावले. एकुणच या मतदान प्रक्रीयेत अनेक त्रुटी राहील्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे अपक्ष उमेदवार आणि तक्रारदार भारत शहा यांनी सांगितले आहे.

मोल कीर्तीकर यांच्याकडूनही आता यासंदर्भात अर्ज दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाईस असून त्याला कुठलीही मोबाईल कनेक्टीव्हीटी नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे.

डेटा कम्पॅलेशन सिस्टीम आणि ईव्हीएम वेगवेगळं आहे. ईव्हीएमशी डेटा कम्पॅलेशन सिस्टीमद्वारे केवळ वेबसाईटवर डेटा टाकला जातो, त्याच्याशी संबंधित काही ओटीपी मोबाईलवर येतो, त्यासाठी काही मोबाईल होते, त्यापैकीच एक म्हणजे डेटा ऑपरेटर गुरव यांच्याकडेही मोबाईल होता, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली.

तसेच, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, त्याला कुठलीही वायर किंवा वायरलेस कनेक्टीव्हीटी नसते. ईव्हीएम प्रोग्रामेबल नसून ईव्हीएमचा ओटीपी नसतो, ते स्वतंत्र आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली. मोबाईल असणं हा वेगळा भाग आहे, मोबाईलचा ईव्हीएमशी कुठलाही संबंध नसल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

डेटा ऑपरेटर गुरवची चौकशी सुरू

गुरव आमचा डेटा ऑफरेटर आहे, हा जो गोंधळ झाला तो त्या आमच्या कर्मचारी गुरवमुळे झाला असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. मतमोजणी आणि हे मोबाईल प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे, असेही वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले.

गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहेत- आदित्य ठाकरे

गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यास नकार देणे म्हणजे आणखी एक चंदिगडचा क्षण टाळण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप ही आदित्य ठाकरे यांनी केलाय. आम्ही नेहमी म्हणतो की भाजप आणि मिंधे टोळीला आमची लोकशाही संपवायची आहे आणि आमची घटना बदलायची आहे. हा गैरप्रकार हा त्यांच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे सवाल

खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी वनराई पोलिसांच्या तपासाबाबत निवडणूक आयोगाला काही सवाल केले आहेत.

१. अमोल कीर्तिकर यांनी विचारल्याप्रमाणे ते मतमोजणीच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करतील का?

२. फुटेज देण्यास नकार देणाऱ्या उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून ते उत्तरदायित्व मागतील का?

३.वायकर यांच्या विजयाचा निवडणूक निकाल रोखणार का?

४. एकदा मतमोजणी कशी झाली आणि रिटर्निंग ऑफिसरने मतांची फेरमोजणी कशी जाहीर केली हे ते स्पष्ट करतील का? ५. १९ व्या फेरीनंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांची घोषणा का थांबवली गेली हे ते स्पष्ट करतील का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *