मुंबई: मॉन्सूनने मुंबई, ठाणेसह महाराष्टात दमदार हजेरी लावली खरी पण आतामात्र पावसाने दांडी मारली असून सध्यातरी मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये आजही काहीच प्रगती झालेली नाही. विशेषता धरण क्षेत्रात पावूस पडला नसल्याने मुंबई आणि ठाणेकरांच्या घशाला कोरड पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

 विदर्भामध्ये पावसाची प्रतीक्षा असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये मात्र पाऊस होत आहे. त्याचा जोर कमी झाला असून, काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुणे शहरात ऊन सावल्यांचा खेळ चांगलाच रंगलेला पहायला मिळत आहे. दुपारी पांढरे ढग आणि निळेशार आकाश प्रत्येकाचे मन मोहून घेत आहे.

सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पावसाने काही भागात उघडीप दिली असून, त्या भागात उन्हाचा चांगलाच चटका आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे. सध्या खानदेश आणि पूर्व विदर्भात मॉन्सूनची वाट पाहिली जात आहे. आज रविवारी (दि. १६) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. रायगडला १९ ते २० जून रोजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी १८ ते २० जून रोजी यलो अलर्ट दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही यलो अलर्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *