निरंजन डावखरे यांना पाठिंबा देत कोचिंग क्लासेस संघटनेची माघार
ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निरंजन वसंत डावखरे यांना वाढता पाठिंबा मिळत असून, निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनेही उमेदवार अमोल जगताप यांची उमेदवारी माघारी घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी ठाण्यात झालेल्या सभेत कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांनी दिले. त्याचबरोबर कोचिंग क्लासेस संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली. संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख व सचिव अॅड. सचिन सरोदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आमदार डावखरे यांना पाठिंबा असल्याचे पत्र प्रदान केले. तसेच त्यांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याची ग्वाही दिली.
00000
