मनोज जरांगेंचा सरकारला १३ जुलैचा अल्टीमेटम

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातूनच घेणार आणि त्यासाठी सरकारला आम्ही १३ जुलैचा अल्टीमेटम दिला आहे असा अंतिम इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांबद्दल माहिती दिली. ओबीसी नेते यांनी हाके यांनी जरांगेंच्या मागणीविरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे. या पार्श्वभुमीवर जरांगे यांनी आज आपली भुमिका स्पष्ट केली.

या सरकारवर प्रत्येक वेळा शंका घ्यावी अशी स्थिती नाही. कॅबिनेट बैठक का रद्द झाली माहिती नाही. मात्र, आमच्या मागण्या सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया, मराठा कुणबी एकच आहेत, याबाबतचा कायदा ५७ लाखांच्या नोंदींच्या आधारे करण्यात यावा. शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी यासह  १३ जुलैपूर्वी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं , असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

आरक्षण असून ते इतके लढत आहेत, आम्हाला आरक्षण नाही आम्ही किती लढू, असं मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण असणारे लोक असं लढत आहेत तर आरक्षण नाहीत ते चौपट ताकद लावून लढतील, असं मनोज जरांगे म्हणाले. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातील, सगळ्या संघटनेतील कामगार, माथाडी कामगार, बैलगाड्या हाणणारे, ट्रॅक्टर हाणणारे, टेम्पो, रिक्षा चालवणारे एक होतील.  आम्हाला आरक्षण नाही ते मिळावं म्हणून ताकदीनं लढणार आहे. मतभेद सोडून मराठा समाजाचे लोक मुलांसाठी लढणार आहेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

जे मराठ्यांना मदत करणार नाहीत. कुठल्याही पक्षाचे आमदार, खासदार असतील त्यांना उघडं पाडणार आहे. त्यांनी मराठ्यांच्या पोरांच्या बाजूनं उभं राहावं, असं जरांगे म्हणाले.

छगन भुजबळ आंदोलनात कधी नव्हते. मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी छगन भुजबळ यांनी काम केलं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. गावगड्यातील ओबीसी बांधवांना देखील मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, असं वाटत असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. ओबीसींचं आणि मराठ्यांचं वाटोळ करणारं कोण हे सर्वांना माहिती आहे. धनगर बांधवांना एसटी आरक्षण मिळावं म्हणून तितक्या सभा घेतल्या  असत्या तर त्यांना एसटी आरक्षण मिळालं असतं असं मनोज जरांगे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *