मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट
मुंबई : रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी खुशखबर आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांना आता ग्रॅच्युईटी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रॅच्युईटीसाठी रिक्षा, टॅक्सी चालकांना फक्त वर्षाला 300 रुपये भरावे लागणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी आपण कल्याणकारी मंडळ निर्माण केला आहे. लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल. टॅक्सी चालकांना ग्रॅच्युएटी देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे वर्षाला तीनशे रुपये त्यासाठी तुम्हाला भरावे लागतील. याचे काही पैसे हे सरकार देणार आहे यावर काम सुरू आहे. चालकांच्या परिवाराला विमा संरक्षण दिले जाईल. या महामंडळामध्ये तात्काळ दुखापत होईल त्याला पन्नास हजार रुपये देण्याची तरतूद केली आहे. आरोग्य विभाग पॉलिसी विस्तृत केली जाणार आहे. तसेच या चालकांचं कमित कमी योगदान आणि राज्य सरकारने दिलेले पैसे असे धोरण तयार होईल. ही गरीब लोक आहेत. हे सर्व सामान्यांचे सरकार आहे याचमुळे आम्ही ही योजना आणली आहे.
