अशोक गायकवाड
रायगड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ना. रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड व कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्याकडून रिपाइं जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.*
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी मंत्रीपदी वर्णी लागल्याने ना. रामदास आठवले हे मंगळवारी, दि १८ जून २०२४ रोजी पुणे दौऱ्यावर जात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे, कोकण युवा सरचिटणीस जिवक गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, कर्जत तालुका संपर्क प्रमुख किशोर द्वारकानाथ गायकवाड, मावळ लोकसभा उपाध्यक्ष पंकज सोनावणे, खालापूर तालुका युवा अध्यक्ष सुनिल सोनावणे, खोपोली शहर अध्यक्ष नितिन वाघमारे, राहुल महाडिक युवा नेते, रुपेश रूपवते खोपोली युवा शहर अध्यक्ष, अशोक गोतारणे , उमरोली पंचायत समिती वार्ड अध्यक्ष निलेश गायकवाड आदींनी आठवले यांचे फटाक्यांच्या आतशाबाजीत पुष्पगुच्छ, पुष्पमालेव्दारे शुभेच्छा देऊन जंगी स्वागत केले.
00000
