रायगड : सध्या विशाळगड प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, पण योग्य वेळ येताच विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. शिवभक्तांच्या भावनांची दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर केलेल्या भाषणात दिले. दुर्गे दुर्गेश्वर रायगडावर 351 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तिथीनुसार झालेल्या या राज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदय सामंत देखील हजर होते.

यावेळी शिवभक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजाऊ मासाहेब की जय अजय घोष यावेळी सुरू होता.

रायगडावर विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा शिवभक्तांनी उचलून धरला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणावेळी उत्तर दिले. तसेच रायगडच्या विकासासाठी आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी सरकार देत असलेला निधी याचा उल्लेख देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे ही घोषणा संपूर्ण राज्याभिषेक सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिली जात होती. तसेच रायगडमधील महाड येथील गोहत्या वरील फलक देखील झळकवले जात होते. विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा नेत्यांच्या भाषणावेळी देखील घोषणा देऊन उपस्थित केला गेला.

कार्यक्रमावेळी रायगडावर राज दरबारामध्ये आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे असे बॅनर झळकले. नेत्यांची भाषणे सुरू असताना देखील शिवभक्तांमधून अशाच प्रकारच्या घोषणा यावेळी दिल्या गेल्या. वक्फ बोर्ड विरोधात यावेळी नाराजी व्यक्त केली जात होती. ज्या शिवभक्तांच्या भावना त्या आमच्या भावना  दरम्यान, उदय सामंत आणि अजित पवार यांनी ज्या शिवभक्तांच्या भावना त्या आमच्या भावना असे विधान केले. राज्याभिषेक सोहळा वेळी शिवभक्तमधुन आई भवानी शक्ति दे विशाळगडाला मुक्ती दे आसा घोषणा दिल्या जात होत्या. त्यांनंतर सामंत आणि पवार यानी हे विधान केले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे सरकार शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालत आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार असा आश्वासन शिवभक्तांना दिले. विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा यावेळी जाणवत होता. त्याबाबतचे फलक आणि घोषणाबाजी शिवभक्तांमधून होत होती. त्यामुळे प्रत्येक नेत्यांना आपल्या भाषणातून या मुद्द्याला स्पर्श केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *