रायगड : निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत शुक्रवारी,(दि.२१) जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आणि नेहरु युवा केंद्र व प्रिझम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम अलिबाग पोलीस मुख्यालयातील जंजिरा हॉल येथे सकाळी ०७.०० वा संपन्न झाला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.अंकिता मयेकर, नेहरु युवा केंद्र समन्वयक निशांत रौतेला, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्रीम.तपस्वी गोंधळी, क्रीडा अधिकारी सचिन निकम, श्री अंबिका योग कुटीर या संस्थेचे प्रशिक्षक तसेच स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्थेचे स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी, पोलीस विभागातील कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *