ठाणे : विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार लसंघासाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १२४ मतदान केंद्रावर सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजाववा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी सोबत जोडली आहे.
