पुणे: कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने मोठा दिलासा आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी केली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे.
१९ मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर चौकात भरधाव येणा-या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आत्येनं पुतण्यासाठी हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. जामीन मिळाल्यानंतरही पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे. अल्पवयीन मुलाला आत्येच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मुलाचे आई, वडिल आणि आजोबा हे सध्या पोलीसांच्या कोठडीत आहे. त्यामुळे मुलाला आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
