मुंबई : शेतकऱ्यांना सीबीलची अट लागू करु नये. तसेच सीबीलचे कारण दाखवून त्यांना बँकांनी जर कर्ज नाकारले तर ते खपवून घेतलं जाणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सीबीलचे कारण सांगून बँकांनी कर्ज नाकारले तर त्यांच्यावर FIR दाखल करु असा इशाराही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला. FIR दाखल केल्यावर आमच्याकडे येऊ नका असंही फडणवीस म्हणाले.
कोणत्याही बँकांना शेतकऱ्याला कर्ज नाकारता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. सीबीलचे कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज नाकारु नये असेही ते म्हणाले. तसे जर झाले तर FIR दाखल करण्याचा इशारा फडणवीसांनी दिला आहे. याबाबतची माहिती सर्व बँकांना द्यावी असेही ते म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांना कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही फडणवीस म्हणाले. खरीप पूर्व बैठकीत बियाणे खतांची उपलब्धता याबाबतची चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे, याबाबातचा आढावा आजच्या बैठकीत आम्ही घेतला. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
