ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कामगार राजबीर सोनपाल चौहान यांना पूर्वलक्षी प्रभावाने कामावर हजर करून घेणे बाबत मा.ठाणे लेबर कोर्टाने आदेश पारित केले आहे, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली आहे.
कम्प्लेंट (युएलपी) क्र .५५ /२०२१ नुसार ठाणे लेबर कोर्टात राजबीर चौहान यांनी दावा दाखल केला होता. अर्जदार सफाई कर्मचारी राजबीर यांना दि. २९ जानेवारी २०२१ रोजी अचानक ठेकेदार मेसर्स. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि. पुणे यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अचानक कामावरून काढून कमी केले होते. अनेक महिने प्रयत्न करूनही ठेकेदार चे मालक श्री विजय कांबळे आणि रूग्णालय प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने राजबीर चौहान यांनी शेवटी न्याय मिळण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती.
ठाणे मनोरूग्णालयातील कायम कर्मचाऱ्यांनी संप पुकारले असतांना कंत्राटदारांमार्फत मार्फत कार्यरत सफाई सेवकांनी मनोरूग्णांचे हित लक्षात घेऊन साफसफाईचे काम बंद केले नव्हते. तरी देखील राजबीर चौहान यांना विना कायदेशीर प्रक्रिया कोणतीही बचावाची संधी न देता अचानक कामावरून कमी केल्याने राजबीर चौहान यांनी न्यायालयात दाद मागितली होती. सुमारे साडे तीन वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर शेवटी न्याय मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोर्टात राजबीर चौहान यांची बाजू ज्येष्ठ वकील नितीन शिवकर यांनी बाजू मांडली ठेकेदार तर्फे. वकील सचिन रेगे आणि रूग्णालय प्रशासनातर्फे वकील ए. के. पुराणिक यांनी बाजू मांडली होती. ठाणे लेबर कोर्ट येथे श्रीमती धनश्री मोरे (जज) यांनी दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी हा निकाल जाहीर केला आहे. याप्रकरणात वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांचे देखील कामगार राजबीर चौहान यांचे आभार व्यक्त केले आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार यांनी हटवादी भूमिका घेऊन राजबीर चौहान यांना कामावर हजर करून घेऊन कोर्टाचे आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर कोर्टाचे अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली जाईल असा इशारा युनियन तर्फे कामगार नेते जगदीश खैरालिया यांनी दिला आहे.
000000
