वाचक मनोगत

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मोठा तालुका आहे.तालुक्यातील दळणवळण व्यवस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या आगारावर अवलंबून आहे. आगाराची व्यवस्था पाहण्याकरता आगार व्यवस्थापक, प्रवाशांच्या गाड्या वेळेवर सोडण्यासाठी वाहतूक नियंत्रक आहेत. वाहतूक नियंत्रकांचा दूरध्वनी कायम बंद अवस्थेत प्रवाशांना एखाद्या गाडीची माहिती मिळवायची असेल तर संपर्क होत नाही.सद्या संगणक युगातून जगाचा कारभार चालला आहे.वाहतूक नियंत्रकांना महामंडळाच्या अध्यक्षांनी भ्रमणध्वनी द्यावा.म्हणजे भारत दूरसंचार निगमच्या कारभारावर बोट दाखवून वेळ मारून नेता येणार नाही.मागील आठ – दहा वर्षापासून डेपोच्या शौचालयाची दुरावस्था झालेली आहे.प्रशासन प्रवाशांना गृहीत धरून चालले आहे.प्रवासी करदाता आहे.तो अनेक कर भरतो करदात्याला सेवा सुविधा मिळाव्यात अशाच अपेक्षा असतात. राजापूर डेपो शोधावा लागतो मुख्य रस्त्यावरून डेपोत जाण्यासाठी मार्ग शोधत जावे लागते.दुकानांनी घेरल्यामुळे डेपो दिसून येत नाही.गाड्या वेळेवर सोडण्याची जबाबदारी कोणाची काल,संध्याकाळी ४.३० वाजता वाहतूक नियंत्रकांना विचारले राजापूर- नाणार गाडी किती वाजता आहे.त्यांनी सांगितले पावणे पाच वाजता गाडी सुटेल. पाच वाजता पून्हा भेटून विचारले गाडी लागेल आता .सव्वा पाच वाजता वाहतूक नियंत्रकांना पुन्हा विचारले साहेब, गाडी नक्की आहे ना ?हो गाडी रत्नागिरीहून येणार आहे ती नाणारला जाणार मी त्यांना म्हणालो साडेचार पासून गाडीची चौकशी करतो आहे.एक तासाने उशीरा गाडी नाणारला सोडणार नाणार येथील महाविद्यालयातील विद्यार्थी,जेष्ठ नागरिक,अन्य प्रवाशी सकाळी सातच्या एस.टी.ने राजापूर येथे येतात.राजापूर डेपोतून नाणारला सकाळी ८.३०,११.४५ संध्याकाळी ४.४५ वाजता सुटण्याच्या वेळा आहेत पण गाड्या वेळेवर सुटत नाहीत याला जबाबदार कोण ? काल, संध्याकाळी नाणार कडे सुटणारी गाडी रत्नागिरीहून साडेपाचच्या दरम्यान आली.एम एच १४- बी टी – २०१८ गाडी नाणार लागली. गाडीत मी चढलो वाहक गाडीत होते त्यांना मी म्हणालो साहेब, पावणे सहा वाजले गाडीला आधीच एक तास उशीर झालाय.ते म्हणाले मला नाही सांगायचे तिकडे नियंत्रकांना जावून सांगा.मी म्हणालो साडेचार पासून साडेपाच पर्यंत ते करीत होतो.अशा अवस्थेत प्रवाशांनी आपली समस्या कोणाला सांगायची राजापूर आगार व्यवस्थापक, महामंडळाचे अधिकारी दखल घेऊन प्रवाशांना दिलासा देतील काय ?
महादेव गोळवसकर
कुर्ला मुंबई
mahadeogolvaskar@gmail.com
-९८६९४७६२०९.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *