आज परळमध्ये शोकसभा होणार
मुंंबई : भविष्य निर्वाह निधी स्थानिय लोकाधिकार समितीचे माजी कार्याध्यक्ष, ज्येष्ठ शिवसैनिक आणि वांद्रे येथील भविष्य निर्वाह निधी संघटना कार्यालयातील निवृत्त सेक्शन सुपरवायझर अरुण भिकाजी गांवकर( वय 65) यांचे अलिकडेच निधन झाले.भविष्य निर्वाह निधी संघटनेतील कर्मचारी, त्यांचे हितचिंतक, मित्र परिवारा तर्फे अरुण गांवकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या 29 जून शनिवारी सायंकाळी सहा वाजता परळ शिरोडकर हायस्कूल येथे शोकसभा आयोजित केली आहे.
कोकणच्या मालवण तालुक्यातील हडी गावचे ते मुळचे रहिवाशी होत. आपल्या पीएफच्या नोकरीच्या माध्यमातून अनेक गिरणी कामगारांचा बरीच वर्ष थकलेला पीएफचा भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न सोडविण्यात अरुण गांवकर यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. तसेच स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी ते अनेक आंदोलनात सहभागी झाले होते. याचबरोबर त्यांनी अनेक मराठी तरुणांना त्यांनी नोकऱ्याही मिळवून दिल्या . समाजसेवेचा ध्यास उराशी बाळगून गांवकर यांनी उभ्या आयुष्यात अनेक गरजूंना मदत केली.आपल्या हडी गावच्या देवस्थान कमिटी मध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी दर्शना,मुलगा चित्रपट लेखक – दिग्दर्शक रामचंद्र गांवकर ,सून जुही, डाॅ.अर्चना मयुर कासकर,डाॅ.अश्विनी स्वप्निल पऱ्हाते या मुली तर काव्या ,अनविष्क,अनया ही नातवंड आहेत. त्यांचा दशक्रिया विधी रविवार ३० जून रोजी सकाळी ७.०० वाजता शिवाजी पार्क दादर येथे होणार आहे.
00000
