दिलीप करंगुटकर स्मृती कॅरम स्पर्धा
पुण्याच्या आयुष गरुड विजेता पुणे : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय एकेरी कॅरम स्पर्धा पुण्याच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा आयुष गरुडने जिंकली. १२…
पुण्याच्या आयुष गरुड विजेता पुणे : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय एकेरी कॅरम स्पर्धा पुण्याच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा आयुष गरुडने जिंकली. १२…
पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. यावर रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत…
६५० पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश मुंबई : बंद दाराआड महायुतीकडून मनसेला सोबत घेण्यासाठी चर्चा सुरु असतानाच आता दिवसाढवळ्या भाजपाने मनसेला मुंबईत खिंडार पाडले आहे. तब्बल ६५० पदाधिकाऱ्यांनी ‘मनसे’ राज ठाकरेंची साथ सोडत भाजपात दाखल होण्याचा निर्णय घेतलाय.…
संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची अध्यक्षपदी निवड पुणे – २०२४ ते २०२८ या कालावधी करता निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत विविध पदांकरिता करिता कोणाचाही ज्यादा अर्ज न आल्याने ही निवडणूक आज…
नागपुर : मी डॅाक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संजय राऊत…
ठाणे : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील १७ वर्षाखालील मुलींसाठी बुधवारपासून दरवर्षी प्रमाणे कळव्यातील खारलँड मैदानात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी…
डीटीडीसीने विजेतेपद राखले ठाणे : एकतर्फी लढतीत डीटीडीसी संघाने रूट मोबाईलचा आठ गडी राखून दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील या गटाचे विजेतेपद आपल्याकडे कायम राखले…
दौंड : “जातीयवादी लोकांच्या हातात सत्ता आहे. ही सत्ता उखडून टाकण्याची वेळ आली आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्याची वेळ आलीय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार आहे. मोदींचे ऐकत नाही म्हणून…
ठाणे : दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा १३ एप्रिल पासून १६ एप्रिल पर्यंत समता विचार प्रसारक संस्थेतर्फे येऊर येथे समता संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १० वी च्या परीक्षेला बसलेल्या आणि कॉलेज मध्ये जाणाऱ्या १८ ते २५ वयाच्या युवक युवतींसाठी असलेल्या या निवासी शिबिरात शरीर विज्ञान, माध्यमांचा प्रभाव, मोबाईल चा विवेकी वापर, आकाश दर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयांवर रंजकपणे, खेळांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. डॉ. संजय मंगला गोपाळ, वंदना शिंदे, प्रशांत केळकर, राजू बहाळकर, हर्षदा बोरकर या सारखे मान्यवर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर शॉर्ट फिल्म दाखवून त्यावर चर्चा करण्यास सुप्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शक संतोष पाठारे येणार आहेत. मुलांना शिस्तीचे धडे देत व्यक्तिमत्व विकास होण्याबरोबर त्यांच्या सामाजिक जाणिवा जागृत व्हाव्या हा मुख्य उद्देश हे शिबिर भरवण्यामागे आहे. येऊर येथील निसर्गरम्य वातावरणात संपन्न होणार्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येंने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी सचिव अजय भोसले (८१०८९४९१०२) यांना संपर्क करावा. जागा मर्यादित आहेत.
ठाणे, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या यशासाठी पंचायत समिती शहापूरचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी शिवानी पवार यांची प्रेरणा व केंद्रप्रमुख डॉ. विलास वेखंडे यांचे केंद्रातील दरमहा परीक्षा नियोजन व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सी. बी. एस. सी. ई पॅटर्न च्या धर्तीवर बारावी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. या परीक्षेत शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टे, केंद्र ठुणे या शाळेने घवघवीत यश संपादन करत यशाचा चौकार लगावला आहे. शाळेचे तब्बल चार विद्यार्थी कु. हरिचंद्र रवि वाख, कु. प्राची लक्ष्मण विशे, कु. साई वाळकू झुगरे आणि कु.वैभव गुरूनाथ विशे या गुणी विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत निवड झाली आहे. शैक्षणिक वर्षे २०२३ – २०२४ या वर्षाची नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षा २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली होती. या परीक्षेचा निकाल दि.३१ मार्च रोजी जाहीर झाला आहे. दुर्गम भागातील एक छोटी शाळा असूनही नवोदय परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थी व आष्टे शाळा तसेच शिक्षकवृंद आष्टे यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यामध्ये मार्गदर्शक शिक्षक भगवान वरकुटे व राजाराम वेखंडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली आहे. शाळेच्या या घवघवीत यशात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ मंडळ आष्टे यांचे तसेच आदिवासी उन्नती मंडळ मुंबई, नॉलेज अकॅडमी शहापूर, जाणीव प्रतिष्ठान शहापूर, शिक्षक नेते स्व. काशिनाथ भोईरसर प्रतिष्ठान, दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.