Author: bittambatami.com

नायर रुग्णालयात एफओटी मशीन

मुंबई : नायर रुग्णालयातील श्वसनविकार विभागाला इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडच्या सीएसआर फंडातून अत्याधुनिक फोर्स्ड ऑसिलोमेट्री (एफओटी) मशीन मिळाले आहे. या सुविधेमुळे रुग्णांच्या श्वसन कार्यक्षमतेची चाचणी करणे अधिक सोपे होणार आहे. श्वसनविकाराच्या चाचणीदरम्यान रुग्णांना फुंकर मारण्यासाठी ताकद लावावी लागते, पण वयोमानामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना चाचणीदरम्यान फुंकर मारण्यात तेवढी सक्षमता नसते, पण मशीनमुळे फुंकर मारल्यानंतर श्वसननलिकेत असलेल्या अडथळ्यांचे निदान करता येणार आहे. तसेच श्वसननलिकेत असलेला दाब, दाह, सूज याचेही निदान होत असल्याने रुग्णावर तात्काळ उपचार करता येणार आहेत.

गणपत गायकवाड- श्रीकांत शिंदे वादाची पुन्हा ठिणगी

गायकवाड समर्थकांचा शिंदेंचे काम न करण्याचा निर्धार कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल किंवा कमळ चिन्हावर लढणारा कोणीही उमेदवार असेल त्याचेच काम करण्याचा निर्धार कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी शुक्रवारी रात्री घेतला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा इशारा भाजप कल्याण पूर्वच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. आमदार गायकवाड यांचे समर्थक हे भाजपा कार्यकर्ते आहे असे आम्ही मानत नाही. त्यामुळे भाजपाचा आम्हाला विरोध आहे असे मानण्याचे कारण नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. कल्याण पूर्वचे शहरप्रमुख खासदार शिंदे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यापासून आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. शहरप्रमुख गायकवाड यांच्या कृत्यामुळे आमदार गायकवाड यांना गोळीबार आणि तुरुंगात जावे लागल्याची भाजप कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार किंंवा कमळ चिन्हावर लढणारा उमेदवार असेल तर त्याचे काम आम्ही करू अशाप्रकारचे सह्यांचे एक निवेदन आमदार गायकवाड समर्थकांकडून भाजप प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात येणार आहे, असे एका आमदार गायकवाड समर्थकाने सांगितले. कोणत्याही परिस्थितीत कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी कार्यकर्ता हा श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही, अशी चर्चा आम्ही केली असल्याचे या कार्यकर्त्याने सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड झिंदाबाद अशी जोरदार घोषणाबाजी केली. कल्याण पूर्व भागात आमदार गायकवाड यांची सुमारे एक लाखाहून अधिकची मते आहेत. त्यामुळे या मतांच्या बेगमीचा विचार करून भाजपने कल्याण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. कल्याण पूर्व भागात भाजप कार्यकर्त्यांनी काय, कुठे बैठक घेतली याची आपणास माहिती नाही. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील घरी झालेल्या बैठकीत महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे ठरले आहे. त्यामुळे कल्याण पूर्वत कोणी काय निर्णय घेतला आहे. हे पहावे लागेल. आमदार गायकवाड यांना कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे १०० टक्के समर्थन आहे. त्यांच्या समर्थनार्थ कोणी काही मागणी केली तर त्यात गैर काही नाही. ती प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. – नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, भाजप, कल्याण जिल्हा. आमदार गणपत गायकवाड हे आमचे मार्गदर्शक आहेत. आमदार गायकवाड यांना जामीन होत असताना तो होउ  नये म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांनी विशेष वकील उभा केला. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्या जामिनीचे काम होउ  शकले नाही. खासदार शिंदे हे आमच्या नेत्याच्या विरोधात काम करत असतील तर आम्ही पण त्यांना का सहकार्य करावे. – संजय मोरे, अध्यक्ष, भाजप कल्याण पूर्व मंडल.

सरकारविरोधात कोणीच आवाज उठवित नाही – राजू शेट्टी  

कोल्हापूर: राज्यातील ५४३ पैकी एकुण ३९० खासदार ग्रामीण भागातून येतात. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सरकारच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केलं आहे. ईड़ी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या दबावामुळं समाजाचे प्रश्न…

मुख्य रस्त्यांसह नियमितपणे अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता होईल यादृष्टीने सफाई करावी : आयुक्त सौरभ राव

तलावपाळी परिसरातील नागरिकांशी साधला संवाद ठाणे : नौपाडा परिसरात आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६.३० वाजल्यापासून सर्वंकष स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली. श्रीकौपिनेश्वर मंदिर, भाजी मंडई परिसर, जांभळीनाका परिसर, स्टेशन रोड तसेच तलावपाळी परिसरातील साफसफाई करुन परिसर पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आला. भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, नौपाडा परिमंडळचे उपायुक्त् शंकर पाटोळे, उपायुक्त अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केस्वावानी, सहायक आयुक्त सोपान भाईक, वैदकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत त्यांनी स्वत: हातात झाडू घेवून अंतर्गत रस्त्यांची, गल्ल्यांची साफसफाई केली. यावेळी कौपिनेश्वर मंदिर ते मराठी ग्रंथ संग्रहालय परिसराची पाहणी केली. या परिसरातील दुकानांच्या पाठी असलेल्या छोटया गल्ल्यांची सफाई केली. तसेच मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत गल्ल्यांही नियमित स्वच्छ करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच तलावपाळी येथील सॅटिस पुलाच्या खाली असलेले राडारोडा त्वरीत उचलण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. नागरिकांशी साधला संवाद तलावपाळी परिसरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नियमितपणे फूटपाथची सफाई होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, तलावपाळी परिसरात काही नागरिक हे कबुतरांना दाणे खायला घालतात, त्यामुळे परिसर अस्वच्छ होतोच, परंतु कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो. त्याचप्रमाणे रस्त्यांवर पाळीव प्राणी घेवून येणारे नागरिक हे प्राण्यांची विष्ठा उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या. यावर आयुक्तांनी याबाबत निश्चितच उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी कबुतरांना दाणे घातले जातात त्या परिसरात फलक लावण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ॲम्फीथिएटरची केली पाहणी तलावपाळी परिसरात सेंट जॉन शाळेच्यासमोरील भागात महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ॲम्फीथिएटरची पाहणी केली. यावेळी येथील नागरिकांशी नियमित स्वच्छता होते का याबाबत विचारणा करीत आयुक्त सौरभ राव यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेबाबत नागरिकांनी महापालिकेचे कौतुक केले. परंतु रस्त्यावर फेरीवाले व त्यांचे कुटुंबीय झोपत असून सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे सांगत यावर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. या बाबीची दखल घेवून रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांना निवारा शेडमध्ये पाठविता येईल का याबाबतची चाचपणी करुन फूटपाथ नागरिकांसाठी मोकळे राहतील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबधितांना दिल्या.

भुजबळांनी निवडणूक लढवावी, मग इंगा दाखवतोच- जरांगे

पिंपरी: मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा हिशेब या लोकसभा निवडणूकीत चुकता केला जाईलच, त्यात जर छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढविणार असतील तर त्यांना इंगा दाखवितोच अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी…

कर्जत मतदार संघाच्या विकासपुरुषास मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

माथेरान : कर्जत खालापूर मतदार संघातील असंख्य विकास कामे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आपल्या मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांची उकल करणारा आमचा आवडता मित्र, आमदार महेंद्र थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खरोखरच आनंद वाटत आहे असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुंबईत एका छोटेखानी कार्यक्रमात आज दि.६ रोजी कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत या निष्ठावंत आमदारावर स्तुतीसुमने उधळली. एक धीरोदात्त असा हा लढवय्या आमदार आमचा सहकारी असल्याचा आम्हाला आनंद होत असून जवळपास एक हजार कोटी रुपयांची विकास कामे थोरवे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहेत असेही शिंदेंनी स्पष्ट केले.यावेळी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले,मंगेश चिवटे आणि इत्तर आमदार  उपस्थित होते.

एकनाथ खडसेंचे भाजपात कमबॅक

राज्यपालपदाची ऑफर शैलेश तवटे मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झालाय. भ्रष्ट्राचाराच्या आरोपामुळे भाजापा सोडण्यास ज्यांना भाग पाडण्यात आले तेच एकनाथ खडसे आता पुन्हा पक्षसेवेसाठी भाजपात प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसेंवरील…

पालघरमध्ये महायुतीत तिढा कायम

 मनधरणीसाठी नेत्यांची दमछाक पालघर : लोकसभा निवडणुका जाहीर होउ न वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप आणि उ मेदवार निश्चित करण्याच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे. पालघर लोकसभेसाठी आघाडीने शिवसेना उ बाठाचे उ मेदवार घोषीत केले आहे. मात्र, महायुतीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे शिवसेनेला ही जागा भाजपला सोडण्याची नामुष्की आली आहे. मात्र, उमेदवारीवरून अजुनही खल मिटलेला नाही. उमेदवारी वरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी नेत्यांना वारंवार बैठका घ्याव्या लागतं आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुरं जुळलेले नाही. त्यासाठी नेत्यांची दमछाक झाली आहे. मागील निवडणुकीत पालघर लोकसभेतुन शिवसेनेचे राजेंद्र गावीत निवडुन आले होते. यावेळी ही जागा भाजप ला मिळावी म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आग्रहाची मागणी लावुन धरली. अखेर, मोठा खल आणि वाटाघाटी करून शिवसेनेला पालघर ची जागा भाजप ला सोडण्याची नामुष्की आली. मात्र, उमेदवारी वरून अजुनही युती चे घोडे आडले आहे. एकीकडे राज्यात युती आणि आघाडीचे उमेदवार निश्चितीचा तिढा अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु पालघर च्या उ मेदवारी चा तिढा अजुनही सुटलेला नाही. भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी पालघर ची जागा भाजप ला मिळावी तसेच खासदार राजेंद्र गावीतांच्या उमेदवारी ला प्रखर विरोध करत आपली बाजु माध्यमांकडे जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे महायुतीतील वाद उफाळून आला. दुसरीकडे वसई- विरारमधील भाजप पदाधिकार्यांनी देखील राजेंद्र गावीतांच्या उमेदवारी ला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे युतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. हा वाद शमविण्यासाठी युतीच्या नेत्यांना ठिक ठिकाणी बैठका घ्याव्या लागल्या आहेत. त्यानंतर मनोर येथे भाजप नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह युतीच्या प्रमुख नेत्यांना मनोमिलन बैठक घ्यावी लागली आहे. मात्र, या बैठकीतही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र गावीत यांच्या उमेदवारी विरोधात सुरं आळवला आहे. अखेर, नेत्यांना कार्यकर्त्याची मनधरणी करण्यात अपयशच आले आहे. काही दिवसांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत येउ न ठेपली आहे. मात्र, युतीचा उमेदवारीचा तिढा कायम असल्याने, महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हट्टहास करून पालघर ची जागा शिवसेनेकडून मिळवली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांनाच पुन्हा नव्याने भाजप कडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी गावीतांनी देखील भाजपच्या वरिष्ठांकडे धावाधाव केली आहे. ही बाब लक्षात आल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गावीतांच्या उ मेदवारी ला अधिकच विरोध वाढला आहे. अखेर, मनोरच्या बैठकीत युतीच्या नेत्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी ” पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उ मेदवार समजून, एक दिलाने कामाला लागण्याचे केविलवाणे आवाहन करावे लागले आहे. मात्र, तरीही गावीतांच्या उमेदवारी ला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोधच राहिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

मुंबई : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेउ न नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतुदीनुसार दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, जाहिरात प्रसिद्ध होउ न अर्ज मागविण्यात आलेले असून निवड प्रक्रिया सुरु झालेली नाही, अशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेउ न नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करिता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी विविध संवर्गातील एकूण २७४ पदांकरीता जाहिरात क्रमांक ४१४/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी घेण्यात येणार होती. परंतु, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी, २०२४ अंमलात आल्याने या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता आयोगाच्या २१ मार्चच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच दिनांक १९ मे नियोजित समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतुदीनुसार २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत किंवा जाहिरात प्रसिद्ध होउ न अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तथापि, निवड प्रक्रिया सुरु झालेली नाही, अशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेउ न नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२४ करिता शासनाच्या महसूल व वन विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ग्राम विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग इत्यादी विभागांकडून विविध गट-अ व गट-ब राजपत्रित संवर्गाकरिता प्राप्त मागणीपत्रामध्ये अराखीव पदांचा समावेश असल्याने, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण विचारात घेउ न सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागास कळविण्यात आले आहे. सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चितता नसल्याने सध्या परिक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही. प्रस्तुत परीक्षेतील सर्व संवर्गाकरिता प्रशासकीय विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर परिक्षेच्या पूर्व तयारीकरिता पुरेसा कालावधी देउ न तसेच संघ लोकसेवा आयोग व कर्मचारी चयन आयोग इत्यादींमार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेचे दिनांक विचारात घेउ न परिक्षेचा सुधारित दिनांक आयोगामार्फत जाहीर करण्यात येईल.

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !

मुंबई : पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये  महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये  १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. स्वीप अभियान महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, “स्‍वीप” (SVEEP-Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचे महत्वाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात येत आहे. एकूण मतदार २०१९ मध्ये  सेवा मतदार धरुन ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६ एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ६४ लाख २५ हजार ३४८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी २२ लाख ७९ हजार १९२ महिला मतदार आणि २ हजार ४०६ तृतीयपंथी मतदार होते. २०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार आहेत.