Author: bittambatami.com

काँग्रेसची गॅरंटी महिलांना लखपती करणार

जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी जाहीर नवी दिल्ली- महिलांना वर्षाला एक लाख रुपयांची मदत देण्याची गॅरंटी देणारा निवडणूक जाहीरनामा आज काँग्रेसने प्रसिध्द केला. या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५…

मतदार जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅली –  एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : मतदार जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. मतदान जनजागृती करण्यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत मतदार जनजागृतीकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वा. पोलीस मैदान येथून सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दि. ६ एप्रिल, ४ वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी. या रॅलीसाठी जिल्हाधिकारी सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती लेखाधिकारी उमेश मगदूम यांना संपर्क-९१७२७०९१७२ करावा.

‘मातोश्री’ची सुपारी फडणवीसांनीच दिली !

किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा मुंबई- मातोश्री आणि तत्कालीन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे भ्रष्ट्राचार बाहेर काढण्याचे आदेश दिल्लीतून आले होते. स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच मला हे आदेश अमंलात आणण्याबाबत सांगतिले होते, अशा…

सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा

भिवंडी:भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या आर के लॉजी वर्ल्ड या गोदाम संकुलावर एम एम आर डी ए कडून कोणतीही नोटीस न बजावता कारवाई करण्याचा घाट घालण्यात आला. सुरेश म्हात्रे यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून येवई येथे आर के लॉजी पार्क नावाने गोदाम संकुल उभारले आहे .या बांधकामावर गुरुवारी सायंकाळी कोणतीही नोटीस न बजावता सिल करण्याच्या कारवाईसाठी  एम एम आर डी ए चे अधिकारी पोलिस फौजफाटा घेऊन दाखल झाले.यावेळी सुरेश म्हात्रे यांच्या भागीदार सहकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतली असल्याची माहिती दिली त्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेले एमएमआरडीएचे अधिकारी रित्या हाती माघी परतले. मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून ९० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्ट्राचाराची जननी कपिल पाटील यांनीच घातली आहे, असा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.एम एम आर डी ए राजकीय दबावातून कारवाई करीत असून जिनके घर शिसेके होते है ओ दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते अशा शब्दात सुरेश म्हात्रे यांनी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवार केला असून निवडणूक लढतांना समोरासमोर येऊन लढा अशा कारवाया करून पाठीत खंजीर खुपसल्यासारखे नका करू असा इशारा म्हात्रे यांनी कपिल पाटलांना दिला आहे.

नितीन बानुगडे-पाटील यांची मुलुख मैदानी तोफ नालासोपाऱ्यात धडाडणार!

महाविकास आघाडीचा आज कार्यकर्ता मेळावा विरार : ‘भारत जोडो, निर्भन बनो` या अभियानांतर्गत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा ‘महामेळावा आज सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. नालासोपारा (पश्चिम) येथील तानिया बँक्वेट हॉलमध्ये होणाऱ्या या महामेळाव्याला शिवव्याख्याते तथा शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील संबोधित करणार आहेत, अशी माहिती शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘संघर्षकन्या` भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३ एप्रिल रोजी भारती कामडी यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. दरम्यान; भारती कामडी यांचा पालघर लोकसभा ‘गावभेट दौरा सुद्धा आज सकाळी ९ वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघाकरता प्रथमच आश्वासक महिला उमेदवार घोषित केला आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेनेने या मतदार संघात आघाडी घेतली आहे.  या पार्श्वभूमीवर ‘भारत जोडो, निर्भन बनो` या अभियानांतर्गत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा होणारा हा ‘महामेळावा` सामान्य नागरिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकरता प्रेरणादायी व ऊर्जा देणारा असेल. तसेच परिवर्तनाची नांदी देणारा ठरणार आहे, असा विश्वास जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ निरुपणकार परमपूज्य तीर्थस्वरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शुभाशिर्वाद घेतले.

मतदान यंत्रांची ७ विधानसभा संघनिहाय पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ३२ रायगड आणि ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील ७ विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार ई व्ही एम हीव्हीपॅट यंत्राची प्रथम सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. ही प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पध्दतीन ही सरमिसळ करण्यात आली.जिल्ह्यातील मतदार संख्येच्या प्रमाणानुसार २ हजार ७१९ मतदान केंद्र आहेत. सध्या रायगड जिल्ह्यासाठी ६ हजार ७८० बॅलेट युनिट, ३ हजार ७७४ कंट्रोल युनिट तर ३ हजार ९५२ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राच्या १३८ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट वाटप करण्यात येणार आहे. तर १४५ टक्के व्हीव्हीपॅट वाटप करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदार संघनिहाय मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन देण्यात येणार आहे. सध्या ही यंत्र जिल्हास्तरावर स्ट्रॉँगरूम मध्ये आहेत.

राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

रायगडच्या बबन, गणेशची निवड मुंबई : येत्या ८ ते १२ एप्रिल दरम्यान पॉवरलिफ्टिंग इंडियाच्या वतीने हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रायगडच्या बबन बाबू झोरे (वाघेश्वर- कर्जत, जे व्ही आर जिम)आणि गणेश संजय तोटे (फिटनेस ऑन जिम, तक्का – पनवेल) यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत १५० पेक्षा जास्त पुरुष आणि १०० पेक्षा जास्त महिला खेळाडूंचा सहभाग अपेक्षीत आहे.   त्यांच्या निवडीबाबत बबन झोरे यांना जे व्ही आर फिटनेसचे संचालक विनोद येवले (कर्जत) आणि गणेश तोटे यांना प्रमोद विजय पवार (फिटनेस ऑन जिम, संचालक, पनवेल) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बबन, गणेश यांना प्रशिक्षक विशाल मुळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडच्यावतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, खजिनदार राहुल गजरमल यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी केली असल्यामुळे ते पदक विजेते होतील असा विश्वास माधव पंडित यांनी व्यक्त केला आहे.

१३ एप्रिलपासून ठाण्यात समता संस्कार शिबिर

ठाणे : दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा १३ एप्रिल पासून १६ एप्रिल पर्यंत समता विचार प्रसारक संस्थेतर्फे येऊर येथे समता संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १० वी च्या परीक्षेला बसलेल्या आणि कॉलेज मध्ये जाणाऱ्या १८ ते २५ वयाच्या युवक युवतींसाठी असलेल्या या निवासी शिबिरात शरीर विज्ञान, माध्यमांचा प्रभाव, मोबाईल चा विवेकी वापर, आकाश दर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयांवर रंजकपणे, खेळांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. डॉ. संजय मंगला गोपाळ, वंदना शिंदे, प्रशांत केळकर, राजू बहाळकर, हर्षदा बोरकर या सारखे मान्यवर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर शॉर्ट फिल्म दाखवून त्यावर चर्चा करण्यास सुप्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शक संतोष पाठारे येणार आहेत. मुलांना शिस्तीचे धडे देत व्यक्तिमत्व विकास होण्याबरोबर त्यांच्या सामाजिक जाणिवा जागृत व्हाव्या हा मुख्य उद्देश हे शिबिर भरवण्यामागे आहे. येऊर येथील निसर्गरम्य वातावरणात संपन्न होणार्‍या या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येंने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी सचिव अजय भोसले (८१०८९४९१०२) यांना संपर्क करावा. जागा मर्यादित आहेत.