Author: bittambatami.com

 भाजपच्या मुरबाडवर शिवसेनेचा दावा

 शिवसेनेचे वामन म्हात्रे, सुभाष पवार एकनाथ शिंदेंच्या भेटीला   बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध पक्षांतर्गत कुरघोड्या वाढत असताना महायुतीतील पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वतीनेही या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. बुधवारी बदलापूर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भिवंडी लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुरबाड मतदारसंघाची मागणी केली आहे. मुरबाड मतदारसंघात बदलापूर आणि ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे आमचा दावा आहेच, असे म्हात्रे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध भाजप असे चित्र उभे राहिले आहे. विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध पक्षातील माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आघाडी उघडली आहे. नुकताच कपिल पाटील यांनी मुरबाडमध्ये कथोरे विरोधक आणि समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला निष्ठावंतांचा मेळावा असे नाव दिले. या मेळाव्यात पाटील यांनी कथोरे यांना थेट अपक्ष लढण्याचे सांगत ताकद दाखवण्याचे आव्हान केले. तसेच यावेळी कथोरे यांनी केलेल्या भूमीपूजन आणि इतर अनेक गोष्टींवरून कथोरे यांना लक्ष्य केले. लोकसभेत आलेले गद्दारीचे मळभ दूर करायचे आहे असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. जुन्या जाणत्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांची मोट बांधण्याचा कपिल पाटील यांचा प्रयत्न असतानाच दुसरीकडे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारीही आमदारकीसाठी गुढघ्याला बाशिंब बांधून तयार आहेत. काही महिन्यांपूर्वी बदलापूर शहराचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघावर दावा सांगत एकच खळबळ उडवून दिली होती. भाजपातील अंतर्गत कलहामुळे महायुतीची भिवंडी लोकसभेची जागा हातून गेली. आता विधानसभेतही तसाच प्रकार सुरू आहे. त्यात या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे अशावेळी हा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याची माहिती शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. बुधवारी वामन म्हात्रे आणि सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत मुरबाड मतदारसंघ शिवसेनेला घ्यावी अशी मागणी केली. म्हात्रे आणि पवार दोघेही इच्छुक असून ती तयारी दोघांनीही केली आहे. त्यामुळे आता मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध पक्षातील कपिल पाटील यांची आघाडी तर महायुतीतील शिवसेनेचे आव्हान असणार हे स्पष्ट झाले आहे. दावा का आणि चर्चा काय ? किसन कथोरे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार होते. त्यांचा आजही त्या पक्षात चांगला संपर्क आहे. भाजपातून स्थानिक पातळीवर होणारा विरोध पाहता कथोरे पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे असे झाल्यास येथे शिवसेनेची तयारी असावी, म्हणून ही मागणी केली जात असल्याचे खात्रीलायक माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने खासगीत दिली आहे. मात्र कथोरे यांच्या गटाकडून यावर प्रतिक्रिया दिली जात नाही. तसेच दोन दिवसांपूर्वी आमदार किसन कथोरे यांनी मला भाजपातून तिकिट मिळत असताना मी अपक्ष का लढू अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे कथोरे भाजपातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानले जाते आहे. 0000

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले

बदलापूर : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जाहिर केलेल्या ब्राह्मण समाजासाठीच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या अध्यक्षपदी बदलापूरच्या आशिष दामले यांनी निवड करण्यात आली आहे. आशिष आनंद दामले…

विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा- डॉ. कैलास शिंदे

नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्व‍त्रिक निवडणूक 2024 ची घोषणा करण्यात आली असून मा.भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांची…

ठाणे शहराच्या विकासाची दिशा ठरविणारा ठाणे शहराचा विकास आराखडा घाईत गुपचुप ठाणे महापालिका प्रशासनाने जाहीर केला आहे. विकासकांच्या फायद्यासाठी हा विकास आराखडा राबविला जात असल्याचा आरोप करत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष…

बीओबी बुध्दिबळ स्पर्धेत स्वरूप सावळकर, चारुशीला नाईक विजेते   बँक ऑफ बडोदा-

मुंबई विभागीय बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धेमध्ये पुरुष गटात फिडे गुणांकित बुध्दिबळपटू स्वरूप सावळकरने तर महिला गटात चारुशीला नाईकने विजेतेपद पटकाविले. द्वितीय मानांकित स्वरूप सावळकर विरुध्द प्रथम मानांकित तमोजीत चक्रबर्ती यामधील…

उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही

उरण : गेल्या अनेक महिन्यापासून उरण शहरातील सीसीटीव्ही बंद असून येत्या काही दिवसातच उरणकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या ३४ ठिकाणी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेला याचा फायदा होणार…

 कुलकर्णी, खर्डेकर संयुक्त आघाडीवर

 पहिली अखिल भारतीय फिडे रेटिंग खुली बुद्धिबळ स्पर्धा मुंबई : एसएमसीए-चेस स्कूल आयोजित पहिल्या अखिल भारतीय फिडे रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवलेले मुंबईचे चॅलेंजर आयएम विक्रमादित्य कुलकर्णी आणि अर्णव खर्डेकर हे संयुक्तरित्या आघाडीवर आहेत. रशियन हाऊस, पेडर रोड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत बुधवारी अव्वल क्रमांकावर असलेल्या कुलकर्णीने (2185) काळ्या मोहऱ्यानिशी खेळत निझमो इंडियन क्लासिकच्या सलामीला दिल्लीच्या सैकत नाथविरूद्ध (1829) टॉप बोर्डवर निवडले. दडपणाखाली असलेल्या दिल्लीच्या खेळाडूने 29व्या चालीवर चूक केली आणि कुलकर्णीने संधी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, खर्डेकर (1846) पांढऱ्या मोहऱ्यानिशी खेळत यश कापडी विरुद्ध (1818) फिलिडोर बचावाच्या सलामीने सुरुवात केली आणि डावावर संपूर्ण नियंत्रण राखले. मात्र,  47व्या चालीतील चूक महागात पडली. निकाल – टॉप १०: सातवी फेरी: एआयएम सैकत नाथ (५.५) पराभूत आयएम विक्रमादित्य कुलकर्णी (६.५) ०-१; अथर्व सोनी (6) बरोबरी वि. यश वाटरकर (6) 0.5-0.5; अर्णव खर्डेकर (6.5) विजय वि. यश कापडी (5); उडुपी आचार्य (5) पराभूत संजीव मिश्रा (6); दर्श शेट्टी (6) विजयी वि. आतिश लद्दड (5) 1-0; दीपक सोनी (5) पराभूत वि. गुरुप्रसाद कुलकर्णी (6) 0-1; तरुण एन (5) पराभूत वि. क्षौनीश जैस्वाल (6) 0-1; शुभ पटेल (5) पराभूत वि. कार्तिक कुंभार (6) 0-1; युती पटेल (6) विजयी वि. प्रिशा मरगाई (5) 1-0; श्रद्धा पडवेकर (4.5) पराभूत वि. ओम गडा (5.5) 0-1. 000

मिरा-भाईंदरमध्ये ६८ हजारांनी मतदार वाढले

भाईंदर : मेमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मिरा-भाईंदर मतदारसंघात मतदारांची संख्या तब्बल ६८ हजारांनी वाढली आहे. या मतदारसंघात आता पाच लाख सात हजार ५४२ मतदार झाले आहेत.…

वर्षोनुवर्षे एकाच विभागात कार्यरत 54 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी

काहींची पदोन्नती झाल्याने त्यांची दिवाळी गोड उल्हासनगर – सामान्य प्रशासनाच्या अहवालानुसार आयुक्त विकास ढाकणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत 54 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. तर काहींची…

माथेरानची राणी नोव्हेंबरमध्ये येणार रुळावर

माथेरान : सर्वानाच प्रतीक्षा असणारी नेरळ माथेरान दरम्यान धावणारी माथेरानची महाराणी अर्थातच मिनिट्रेन १ नोव्हेंबर पासून रुळावर येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रतीक्षा असणारी ही…