Author: bittambatami.com

लोकशाही मजबुतीसाठी धर्मनिरपेक्षता हे संवैधानिक मूल्य जपणे आवश्यक – डॉ. संजय मंगला गोपाळ

ठाणे : समाजात धर्मा धर्मात, जाती जातीत दुही माजवणाऱ्या वृत्तींना नाकारून, सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता या संविधानाने दिलेल्या मूल्यांचे रक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे आणि ती निभावण्याची संधी या महिन्यात निवडणुकीने आपल्याला मिळाली आहे. तिचा पुरेपूर उपयोग करणे आपले कर्तव्य आहे, असे आग्रही प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी आज ठाण्यात केले. समता विचार प्रसारक संस्थेच्या सर्वधर्म समभाव सांस्कृतिक संमेलनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, विविध धर्म, जाती, भाषा, पोशाख, रितीरिवाज यानी नटलेल्या आपल्या देशात एकमेकांचा आदर करुन प्रेममय राहावं या साने गुरुजी आणि संत, विचारवंत यांच्या विचारांवर चाललो तरच देशांत शांतता नांदेल आणि प्रगती होईल. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्व धर्मीय सामील होते. हा देश सर्व धर्मीय भारतीयांचा आहे, हे स्वातंत्र्य लढ्यातील मूल्य नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात उतरले आहे. त्याच्या विरोधात काम करणार्‍या सांप्रदायिक प्रयत्नांना विरोध करत समतेचे मूल्य आपण जपणे आवश्यक आहे. हे मूल्य रुजवण्यासाठी संस्थेतर्फे ईद, दिवाळी, गुरु नानक जयंती आणि नाताळच्या सणात सर्वधर्मीय संमेलने, गुरुद्वारा, चर्च व मशीद भेट आदी कार्यक्रम संस्था आयोजित करत असते, याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त, साने गुरुजी १२५ अभियानांतर्गत ‘प्रेममय साने गुरुजी’ हा कार्यक्रम सादर झाला. साने गुरुजींच्या प्रेमळ, करुणामयी पण तितक्याच कणखर व्यक्तीमत्वाचा वेध त्यांच्या कथा, लेख, गाणी आणि साने गुरुजींवर मान्यवरांनी लिहिलेले लेख यांच्या कथनाने आणि अभिवाचनाने घेणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम, ठाण्यातील कलाकार व कार्यकर्त्यांनी सादर केला. यात, लतिका सु. मो. यांनी गुरुजींच्या जीवनावरील पत्रावळ आणि घाण या कथा सादर केल्या. नीलिमा सबनीस यांनी दलितांना पंढरपूर मंदिर प्रवेशाच्या वेळचे गुरुजींचे विचार सादर केले. अलका जोशी यांनी एस एम जोशी यांची गुरुजींचा त्यांच्यावरील प्रभाव व्यक्त करणारी नास्तिक कथा सादर केली. राजश्री भिसे यांनी गुरुजींना आलेला कडू-वाईट अनुभव आणि त्याचा त्यांच्या लेखनात उमटलेला सकारात्मक हुंकार सांगणार्‍या कथा सादर केल्या. मीनल उत्तुरकर यांनी गुरुजींचे आंतरभारतीचे विचार मांडले. विशाखा देशपांडे यांनी निवेदन करताना स्वातंत्र्य लढ्यात गुरुजी तुरुंगवासात अनन्वित अत्याचार सहन करत असतांना गुरुजींनी केलेल्या विपुल लेखनाचा वेध घेतला. संजय मंगला गोपाळ यांनी गुरुजींचे आता उठवू सारे रान हे गाणे सध्यस्थितीचा संदरर्भ देत सादर केले. खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे या सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि बलसागर भारत होवो या समूहगीताने समारोप कारण्यात आला. समता विचार प्रसारक संस्थेच्या आणि वी नीड यू सोसायटीच्या एकलव्य विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी नृत्य, गाणी असा रंगारंग कार्यक्रम सादर करुन मजा आणली. यात नियती कदम, पूजा गावडे, तेजश्री मगर, रूपाली तांगडे, भारती कांबळे, शिवशंकर गवळी यानी नृत्य पेश केली. विमल वर्मा हिने आत्मविश्वासाचे महत्व यावर आपले मनोगत व्यक्त केले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्मृतिशेष हिरजी गोहिल क्रीडा जल्लोष संपन्न झाला. क्रिकेट, कबड्डी, कॅरम, बुद्धीबळ हे खेळ तसेच चित्रकला, रांगोळी, मेहंदी, हस्तकला या कलांमध्ये एकलव्य  मुलांनी सहभाग घेतला. या सर्व सहभागी मुली मुलांना अध्यक्ष हर्षलता कदम, विश्वस्त मनीषा जोशी, हितचिंतक रवींद्र नी. ता. आदींच्या हस्ते बक्षिसे देण्याचा समारंभही यावेळी पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी सचिव अजय भोसले, येनोक कोलियार, पल्लवी लंके, रीतुराज परह्याड आदींनी विशेष मेहनत घेतली.

पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत-रविंद्र चव्हाण

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे ध्येय आहे, असे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते रविवारी मुंबईत प्रकाशन झाले. पक्षाच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण बोलत होते.भारतीय जनता पार्टीने दिलेली  अनेक आश्वासने पूर्ण केली असल्याने देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्तेचा कौल दिला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या संकल्पपूर्तीसाठी महायुतीने महाराष्ट्रातही ठोस विश्वासाने वाटचाल सुरु केली महाराष्ट्र हे मजबूत, समृद्ध, सुरक्षित राज्य बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रवक्ते सागर भदे, सुजय पत्की, मृणाल पेंडसे, ठाणे विधानसभा अध्यक्ष ॲड सुभाष काळे उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी कॉंग्रेस आघाडीतील पक्षांनी कंबर कसली आहे, आणि तेच पक्ष आता महाराष्ट्रात संविधानाच्या नावाने कोरे कागद दाखवून  डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि…

एक संधी देऊन मुरबाडच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवू या

महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांचे आवाहन राजीव चंदने मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला एक संधी देऊन मुरबाड तालुका, बदलापूर शहर व ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण परिसराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवू या, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी आज येथे केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुरबाड मतदारसंघातील उमेदवार सुभाष पवार यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडून मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात दौरा करुन मतदारांबरोबर संवाद साधला जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी एक संधी देऊन सर्वांगीण व परिपूर्ण विकासाची मुहूर्तमेढ रोवण्याचे आवाहन केले जात आहे. वाकीची वाडी, कारंद, मोऱ्याचा पाडा, आघणवाडी, चोण गावांना सुभाष पवार यांनी भेट दिली. तसेच मतदारांना महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉंग्रेस, आरपीआय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेली १५ वर्षे आपण एका चुकीची शिक्षा भोगत आहोत. ती चूक सुधारण्याची वेळ आलेली आहे. केवळ कागदावर झालेल्या  विकासाची जाहिरात केली जात आहे. विकास झाला असेल, तर ग्रामस्थ समाधानी का नाहीत, असा सवाल सुभाष पवार यांनी केला. तसेच मला केवळ एकदा आशीर्वाद द्या, मी संधीचं सोने करीन, असे आश्वासन दिले. आपल्या भागातील पाणी व रस्त्यांची अवस्था बिकट असून, दररोज संघर्ष करावा लागतो. राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामे झालेली नाहीत. लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही. आता अडचणी मांडायच्या कोणाकडे? असा सवाल ग्रामस्थांनी केला. त्यावर निवडून आल्यानंतर गावांच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही सुभाष पवार यांनी दिली. संपूर्ण मतदारसंघात महाविकास आघाडीला पसंती मिळत आहे. जनशक्तीच्या माध्यमातून बदल घडविण्यासाठी तुमचे एक मत महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करुन सुभाष पवार यांनी भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

रिपब्लिकन बहुजन सेनेचा अविनाश जाधव यांना बिनशर्त पाठिंबा

 राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे आजपासून प्रचार रॅलीत ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदासंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या दुसऱ्या टप्यातील प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आहे. ठाणे शहरात मनसेचे अविनाश जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र सद्या पहायला मिळत असताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही वाचविण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेने आज अविनाश जाधव यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच आजपासून पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष विजय घाटे स्वतः प्रचार रॅलीत सहभाग घेणार आहे. आज मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात रिपब्लिकन बहुजन सेनेने आपल्या पाठिंबाचे पत्र अविनाश जाधव यांना दिले. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. या मतदारसंघात गेल्या १० वर्षात हवी तशी विकासकामे झाली नाहीत, तसेच या मतदार संघाचे आमदार आमच्याकडे कधी फिरकतच नसल्याचा आरोप स्वतः मतदार करत असून यंदा आम्ही नक्कीच बदल करू असे आश्वासन नागरिकांकडून केले जात आहे. असे असताना २४ तास २४ तासात काम करणाऱ्या जाधव यांना फक्त एक संधी द्या असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारी रिपब्लिकन बहूजन सेना देखील अविनाश जाधव यांच्या ठामपणे पाठीशी उभी असल्याचा विश्र्वास घाटे यांनी दिली. निवडून आल्यानंतरही असेच २४ तास जनतेसाठी धावून या विधानसभा निवडणुक २०२४ साठी बिनशर्त पाठींबा जाहीर करत असताना राष्ट्रिय अध्यक्ष विजय घाटे यांनी मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना विजयाच्या शुभेच्या दिल्या. अन्याय किंवा मदतीसाठी जसे धावून जाता तसेच निवडून आल्यानंतरही असेच २४ तास जनतेसाठी देतील असा विश्र्वास देखील घाटे यांनी यावेळी ठाणेकरांना दिला.

मोदी सरकारचा अहंकार महाराष्ट्राने मोडला आणि आताही जनता त्यांना धडा शिकवणार : बाळासाहेब थोरात

अरविंद जोशी मीरा-भाईंदर : मीरा भाईंदर मतदारसंघातील माविआचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्याच्या कार्यक्रमाला आलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,  2024 मध्ये महाराष्ट्राने मोदी सरकारचा अहंकार मोडून काढला.…

झोप न येणे ही मोठ्या धोक्याची सूचना..

झोप ही माणसाच्याच नव्हे तर प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत महत्वाची गोष्ट असते. कारण एक दिवस जरी झोप व्यवस्थित झाली नाही तर दुसऱ्या दिवशी त्याचे कोणते परिणाम होतात हे आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवले…

शिक्षण दिन; मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन

आज ११ नोव्हेंबर आजचा दिवस संपूर्ण देशात शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो कारण आजच्याच दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबर १८८८ रोजी भारताचे पहिले शिक्षण मंत्री, थोर देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल…

रतन टाटा: दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्व

नरेंद्र मोदी, पंतप्रधान श्री रतन टाटा जी आपल्याला सोडून गेले त्याला एक महिना झाला आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते छोटी शहरे, अगदी गावांपर्यंत, समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची उणीव तीव्रतेने जाणवत आहे.…

पवारांना नेमेके म्हणायचे तरी आहे काय ?!

२० नोंव्हेंबर समोरच आहे. मतदान यंत्रावरील आपल्याला हव्या त्या, (आपल्या लाडक्या) पक्षचिन्हा समोरचे बटण दाबण्यासाठी अवघे दहा दिवस उरले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतील मतदानाची वेळ जवळ येत असताना, कोण…