Author: bittambatami.com

‘एन व्ही झालटे मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल’ मध्ये मिळणार स्वस्तात उपचार

 डिवाईन विन्सपायर फाउंडेशनच्या मुंबई : खाजगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणे सामान्यांसाठी खर्चिक असल तरी, भांडुप परिसरात अल्प किमतीत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. डिवाईन विन्सपायर फाउंडेशन यांच्या ‘एन व्ही झाल्टे मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल’चे उद्घाटन नुकतच झाले असून, या हॉस्पिटल मध्ये जनरल फिजिशियन, आर्थो, डेंटल सोनोग्राफी, इसिजी सारख्या अनेक गोष्टी चॅरिटेबल दरात करण्याची सोय आहे. भांडुप पश्चिम फरीद नगर, बी पी ई एस शाळे जवळ डिवाईन विन्सपायर फाउंडेशन यांचे एन व्ही झालटे मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल चालू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन श्री किरण खोत यांनी केले तसेच या प्रसंगी स्पिरिच्युअल बिजनेस कोच श्री. शशिकांत खामकर, विनर्स एजुकेशन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौ. ज्योती खामकर, खासदार संजय दिना पाटील, आमदार श्री रमेश कोरगावकर,  माजी आमदार श्री अशोक पाटील,  सिनिअर पोलीस ऑफिसर श्री दत्तात्रय खंडागळे, पराग विद्यालयाचे संस्थापक श्री बाळकृष्ण बने , श्री भास्कर  विचारे, श्री भास्कर विचारे, श्री संदिपभाई जळगावकर, सौ. जागृतीताई पाटील , सौ. प्रांजलताई जाधव आणि ॲड. धनंजय भोसले इ. मान्यवर उपस्थित होते. चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून या हॉस्पिटल मध्ये उपचार केले जाणार आहे. सर्वसामान्यांना स्वस्तात उपचार मिळावेत या एका हेतून हॉस्पिटल चालू करण्यात आले असल्याची माहिती डिवाईन विन्सपायर फाउंडेशन चे संस्थापक डॉ. आशिष दामा,सौ. कविता बागवे, श्री. वैभव बागवे,  श्री. गौतम पटाडे, श्री. अविनाश चौगुले आणि  सौ. राणी कुशारे दिली. हॉस्पिटल मध्ये जनरल फिजिशियन, आर्थो, डेंटल सोनोग्राफी, इसिजी, बालरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, लसी करण आदो अद्यावत सुविधा ठेवण्यात आल्या असून, तज्ञ डॉक्टर या हॉस्पिटल मध्ये रुग्णांवर उपचार करणार आहेत. 0000

कामकाजाचे नशीब चार प्रकारचे…

काहीतरी नवीन… श्याम तारे आपल्या जीवनात आपल्याला काम कसे मिळेल आणि कोणते मिळेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. कोणते या प्रश्नाचे काही प्रमाणात उत्तर आपल्या शिक्षणावर अथवा कौशल्यावर आधारित असले…

खासगी क्षेत्रातील नोकरदारांची स्थिती वाईट

भारतातील खासगी क्षेत्रात नोकरी करणे कठीण झाले आहे. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या बहुतेक लोकांची स्थिती दयनीय आहे. मिळालेल्या पगारातून बरेचजण खाण्यापिण्याचा खर्च कसा तरी भागवू शकत आहेत. घर, आरोग्य, शिक्षण…

नो हॉर्न प्लीज!

दृष्टीक्षेप अजय तिवारी ध्वनी प्रदूषण ही जागतिक स्तरावरील समस्या आहे. ध्वनी प्रदूषणाला अनेक घटक कारणीभूत ठरतात. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वाहनांचे कर्णकर्कश्श हॉर्न. गरज नसताना कवा वाहतुक कोंडीत अडकल्यावर…

राज्यसभेच्या उमेदवारीत विधानसभेची बेरीज

महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, झारखंड, जम्मू-काश्मीर या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात दहा जगांच्या पोटनिवडणुका होत आहेत. त्यातच राज्यसभेतील बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस हे संकटकालीन मित्र आता विरोधी…

MPSCची परीक्षा अखेर पुढे ढकलण्याच निर्णय

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने…

तर…बदलापूरमध्ये मणिपूरचा ट्रेलर होता का ?- निरुपम

रमेश औताडे मुंबई :बदलापूरची घटना सरकारने संवेदनशीलपणे हाताळली मात्र विरोधकांनी यावर राजकारण केले. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी महाराष्ट्राचा लवकरच मणिपूर होईल, असे भाकीत केले होते. मग बदलापूरमध्ये मणिपूरचा ट्रेलर होता का…

फडणवीसांच्या राजीनाम्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत त्यांचा राजीनामा मागितला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळं देवेंद्र…

बदलापुरच्या घटनेला राजकारण म्हणणारे विकृतच- उद्धव ठाकरे

मुंबई :  बदलापूरच्या घटनेला राजकारण म्हणणारे विकृत आहेत… दुर्दैवाने जर मुख्यमंत्र्यांनासुद्धा यात राजकारण दिसत असेल तर ते विकृतच असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका केली…