Author: bittambatami.com

कोलकात्यातील निर्घुण हत्येबद्दल कोपरीकरांनी व्यक्त केला संताप

ठाणे : कोलकात्यातील महिला डॉक्टरची अत्याचारानंतर हत्या केल्याच्या घटनेबद्दल कोपरीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोपरीत निषेध…

 बोरीवली पूर्व येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 पाच तासात पावणे दोनशे लोकांनी केले रक्तदान   मुंबई : बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री भरत रामचंद्र घाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरत घाणेकर मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागाठाणे जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोरील भागात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पाच तासात सुमारे पावणे दोनशे लोकांनी रक्तदान केले. सुमारे एकशे चोपन्न बाटल्या रक्त जमा झाले. बोरीवली रक्तपेढी तर्फे हे रक्तसंकलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य, योगेश वसंत त्रिवेदी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री श्याम कदम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरुण घाणेकर  कार्यक्रमास लक्ष्मीकांत नाईक, रमेश घाणेकर, संदेश कोलापटे, संजय घाडगे, सिद्धेश्वर वाघचौरे, नरेंद्र माली, अशोक पडीयार, हरिश्चंद्र कत्वांकर, बिपिन सावंत यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री नाईक, हृदया घाणेकर, रोहित गुप्ता, ओमकार कणसे, गीत घाणेकर, निशांत पेडणेकर, राहुल वाडीकर, पार्थ नगवदरिया  आदींनी परिश्रम घेतले. 00000

 ‘सैनिक हो! तुमच्यासाठी…’ सीमेवरील जवानांसाठी आरोग्यमंत्र्यांची अशीही भेट

सीमा सुरक्षा दलातील जवानांना महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली 10 ई-रिक्षाची भेट मुंबई : दूरवर जिथे नजर जाईल तिथे केवळ वाळवंट आणि समुद्राची एक किनार नजरेस येते…वाळवंट म्हणजे नुसतीच कोरडी रेती…

‘दलित संघटनांचे एकता धरणे ‘!

२१ ऑगस्टला आझाद मैदानात अनुसूचित जातींचे उप वर्गीकरण   मुंबई, : अनुसूचित जाती, जमातींचे उप वर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वादग्रस्त निकालाच्या निषेधार्थ उत्तर भारतातील अनेक दलित संघटनांनी येत्या बुधवारी  २१…

दहीहंडीसाठी धारावी कुंभारवाडा सज्ज

धारावी : श्रीकृष्‍ण जन्माष्टमी, गोपाळकाला आठवडाभरावर आल्‍याने सर्वत्र या सणाची जोरदार तयारी सुरू आहे. दहीहंडीसाठी लागणारी मटकी बनवण्याचे काम धारावीतील कुंभारवाड्यात अनेक वर्षांपासून सुरू आहे. सध्या मटकीवरील कलाकुसरीचे काम अंतिम…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत एकही महिला लाभापासून वंचित राहणार नाही – किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”योजनेचा”जिल्हास्तरीय शुभारंभ होरायझन सभागृह अलिबाग येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी जि.प.निर्मला कुचिक आदि उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की,”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त होताचा तात्काळ जिल्ह्यातील विविध विभागांच्या बैठकीचे आयोजन करुन या याजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरावा अशी शासनाला विनंती केली होती. त्यानुसार या योजनेच्या लाभासाठी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरावा असा शासनाचा निर्णय झाला. झाली. तसेच आदिवास प्रमाणपत्राबाबतही शासनाने पंधरा वर्षांचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा हा चांगला मार्ग काढला. त्यामुळे ही योजना एकदम सोपी झाली. अंगणवाडी सेविकेच्या हातात योजनेचे काम दिले त्यांनी प्रामिाणकपणे काम केले. जिल्ह्यात ही योजना विहित वेळेत, अचूक पध्दतीने राबविली गेली ही अभिमानाची बाब आहे. पहिल्या दोन महिन्यांचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पोहचले. योजनेच्या अंमलबजावणीत रायगड जिल्हा हा सर्वात पुढे होता. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका शासनाचे कर्मचारी यांचे यात मोठे योगदान आहे. एक कोटीपेक्षा जास्त लोकांना लाभ देणारी ही योजना यशस्वीपणे राबविली गेली. या योजनेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी ३ लाख ५२ हजार लाभार्थी महिला पात्र ठरल्या आहेत. अजून ९० हजार अर्ज पात्र करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात जवळ जवळ साडेचार लाखाचा आकडा आपण नक्कीच पार करु. पात्र असलेली कुठलीच भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की, जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना शासनाची क्रांतीकारी योजना आहे. ही योजना सर्व धर्मियांसाठी असून सर्व समावेशक योजना आहे. ज्या माती-भगिनी अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांनाही या योजनेचा लाभा द्यावा. आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना लागू केल्याबद्दल राज्यशासनास मन:पूर्वक धन्यवाद देतो. महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. हे राज्य शासन महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व भाता-भगिनींना देण्यात यावा. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. यावेळी जिल्हाधिकारी तसेच आमदार महोदयांच्या हस्ते महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. 00000

महिलांना मोफत हेल्मेट वाटप

मुरबाड : मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मुकेश विशे यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिनी १३० महिलांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाडचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते. मुरबाड शहरातील…

माथेरानची महाराणी मिनी ट्रेनच्या जन्माची कहाणी

माथेरान : झुकझुक झुक आगीनगडी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, ह्या पंक्तीची आठवण करून देणारी माथेरान ची महाराणीची निवड जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणजेच युनेस्को मध्ये झाल्याने माथेरानला एक…

मुकबधिर विद्यार्थिनीकडून वृक्षांना रक्षाबंधन

खर्डी : वासिंद परिसरातील दहागाव येथे रक्षाबंधनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर झाडांना राखी बांधण्यात आली. डोंबिवली येथील रोटरी क्लब, रोटरी क्लब फॉर डेफ स्कूल व पर्यावरणवादी सामाजिक संस्था शहापूरच्या संयुक्त…

ठाणे मनोरुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा

ठाणे : भावा-बहिणीचे पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या मनोरुग्णांच्या हातावर बांधल्या. या वेळी…