Author: bittambatami.com

 शिवाजी चौकातील कार्यक्रमांमुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा

 शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचे आवाहन कल्याण : सोमवारी नारळी पौर्णिमा आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डामडौलातील दिखाव्याचा कार्यक्रम करण्यासाठी शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप उभारण्याचा निर्णय घेतला. या चौकातील मंडपाला पोलीस, वाहतूक, गोपनीय पोलिसांचा विरोध असताना सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून शिवसेनेकडून रेटून शिवाजी चौकात मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपामुळे वाहन कोंडी होण्याची शक्यता विचारात घेऊन आमदार विश्वनाथ भोईर यांनी वाहन चालकांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले आहे. वाहतूक विभागाने या मार्ग बदलाची कोणतीही अधिसूचना काढली नसताना, आमदार भोईर यांनी स्वतःहून वाहन चालकांनी शिवाजी चौक मार्गाऐवजी पर्यायी रस्ते मार्गाने वाहने नेण्याचे आवाहन केले आहे. शिवाजी चौकात कोणताही कार्यक्रम नसताना दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अगोदरच वाहन कोंडी असते. या चौकात आंदोलन, मोर्चा काहीही कार्यक्रम असेल तर शिवाजी चौक एक ते दोन तास कोंडीत अडकतो. या चौकापासून वाहनांचा रांगा दुर्गाडी चौक, लालचौकी, आधारवाडी चौक, काळा तलाव चौक भागात लागतात. या रांगांमुळे कल्याण शहरातील रस्ते वाहन कोंडीत अडकतात. पत्रीपुलाकडून येणारी वाहने या कोंडीत अडकतात. या वाहनांचा शिवाजी चौक ते पत्रीपूल आणि पुढे रांगा लागतात. हे माहिती असुनही आमदार भोईर यांनी लाडकी बहिण योजनेचा आणि नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम लोकांसमोर साजरा झाला पाहिजे म्हणून भर वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप टाकण्याचे नियोजन केले आहे. गोपनीय विभागाने शिवाजी चौकात मंडप उभारणी केली तर अभूतपूर्व वाहन कोंडी या चौकात होऊन संपूर्ण शहर ऐन सणासुदीत कोंडीत अडकेल, हा विचार करून शिवसेनेला शिवाजी चौकात मंडप उभारणीस तीव्र आक्षेप घेऊन तसे लेखी पत्र वरिष्ठांना दिले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या कोंडीची माहिती देण्यात आली. पण राज्य सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने आणि या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे येणार असल्याने या कार्यक्रमाला विरोध करू नका, अशी चर्चा पोलीस वर्तुळात झाल्याने या मंडपाला यंत्रणांनी विरोध केला नसल्याचे समजते. शिवाजी चौकात सोमवारी कोंडी झाली तर आणि काही गैरप्रकार झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आयोजक आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर टाकण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. आमदार भोईर यांनी मात्र शिवाजी चौकात मंडप असला तरी तेथे वाहन कोंडी होणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे, असे सांगितले. शहर कोंडी मुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचीही आहे. पण पालिका अधिकारी सुट्टी असल्याने आपल्या मुळ शहरात जात असल्याने पालिका अधिकाऱ्यांचेही या महत्वपू्र्ण विषयाकडे लक्ष नसल्याचे समजते.

मुरबाड तहसील कार्यालयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचा बिऱ्हाड मोर्चा

राजीव चंदने     मुरबाड : तालुक्यातील बळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू वाडीतील आदिवासी वस्तीला अनेक वर्षांपासून रस्ता नसल्यामुळे तेथील शालेय विद्यार्थी,ग्रामस्थ गरोदर महिलांची मोठी कुचंबना होत आहे, देश स्वातंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले  परंतु या कातकरी आदिवासी, वाडीला रस्ता नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यानां तोंड दयावे लागत आहे, मुरबाड तहसीलदार यांच्या कडे अनेकदा रस्ता आणि स्मशाना संदर्भात निवेदन दिले परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अखेर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी मुरबाड तहसील कार्यलयावर बिऱ्हाड मोर्चा काढत सोबत जनावरे, अन्न धान्य, कपडे  घेऊन तहसील कार्यलयाच्या पटांगणात आपले संसार मांडून प्रशासनाच्या कामचुकारपणा बाबत खंत व्यक्त केली, या बिऱ्हाड मोर्चेला ठाणे जिल्हा परिषदचे मा. उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी भेट दिली असता, आपण केलेली मागणी रास्त असून मी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून रस्ता व स्मशानासाठी लवकरच निधी उपलब्ध करून रस्त्याची व स्मशानाची समस्या येत्या सात दिवसात सोडवण्यासाठी प्रयत्न करेन,आणि आपण मोर्चेला पूर्णविराम दयावा. अशी ग्रामस्थांना विनंती केली, बिऱ्हाड मोर्चेला अनेक राजकीयपक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी लेखीपत्र देत सात दिवसाची मुदत मागण्यात आली व मोर्चा थांबविण्यासाठी विनंती केली याबिऱ्हाड मोर्चेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश बनसोडे, शहापूर तालुका सचिव मन्सूर शेख, ता. अध्यक्ष मारुती वाघ, चिंतामण भांगरथ आमआदमी पार्टीचे शरद पवार, जिजाबाई दंवड, लक्ष्मण खंडवी, प्रसाद वाघमारे, भीमा वाघ, व ई. कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता.

 उत्तर मुंबईतील रखडलेले प्रकल्प ,रस्ते कामे मार्गी लागणार

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची ग्वाही कांदिवली येथे क्रीडा प्रशिक्षण संकुल उभारणार राजेंद्र साळसकर     मुंबई : मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा आणि एमएमआरडीए च्या अधिका-यांसोबत बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये उत्तर मुंबई आणि मुंबईतील रखडलेले विविध प्रकल्प कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, योगेश सागर, मनीषा चौधरी, सुनील राणे, भाजपा प्रदेश प्रवक्ता गणेश खणकर, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. गोयल यांनी सांगितले की,या बैठकीमध्ये कांदिवली येथे 37 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याबाबतचा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या 20-25 वर्षांपासून रखडलेल्या या राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचा मार्ग आजच्या बैठकीनंतर मोकळा झाला आहे. याठिकाणी भविष्यात आशियाई, राष्ट्रीय, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्तरावरचे खेळाडू प्रशिक्षित केले जातील. या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांमुळे मुंबईकरांचे जीवन सुखकर होणार आहे असेही गोयल यांनी नमूद केले. गोयल यांनी सांगितले की उत्तर मुंबई आणि उर्वरित मुंबईमध्ये अर्धवट आणि रखडलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून युद्धस्तरावर काम करत आहे.बोरिवली येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल यांच्या सर्वांगीण विकासासाठी विस्तृत चर्चा करून त्याबाबत अहवाल लवकरच सादर करून तेथे क्रीडा सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी असे प्रकल्प महत्वाचे असून ते पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे सुरू आहेत अशी माहिती गोयल यांनी दिली. कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या दोन महिन्यांत आणि शिंपोली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या 6-8 महिन्यांत सेवेत रुजू होईल अशी ग्वाही गोयल यांनी दिली.या बहुविद्याशाखीय केंद्रांमुळे पालघरपर्यंतच्या रहिवाशांना लाभ होणार आहे. मुबईकरांची वाहतुकीची समस्या सोडवून जीवन सुखकर करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले. आकुर्ली पश्चिम द्रूतगती मार्गावरील अंडरपासचे काम रखडले होते त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होती. मात्र बैठकीमध्ये एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ते काम येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी टाटा कंपनीला वाहतूक व्यवस्थापन आराखडा बनवण्याची विनंती केली असल्याची माहिती गोयल यांनी दिली. सहपोलीस आयुक्तांशी चर्चा करून वाहतूक कोंडी होणा-या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्याची विनंती करून एक सर्वसमावेशक योजना तातडीने आखली जाणार आहे. प्रत्येकाला हक्काचे घर देण्याच्या दिशेने रखडलेल्या गृह आणि पुनर्विकास प्रकल्पांबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( एसआरए) नोडल एजन्सी म्हणून नियंत्रण ठेवून कामे पूर्ण करून घेणार असल्याची माहितीही गोयल यांनी यवेळी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मां के नाम’ या योजनेनुसार उत्तर मुंबईमध्ये मुंबई महानगर पालिकेतर्फे एक लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. 0000

 पनवेल उरण महाविकास आघाडीची आज यलगार परिषद

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती     पनवेल : राज भंडारी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीने पुरण…

10 प्रातिनिधिक युवा लाभार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी लाभ

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेत निवड झालेल्या नवी मुंबई : कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ जाहीर केली असून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,…

शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेचा वर्धापन दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेचा वर्धापन दिन व भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीत गायनाने…

साई फाऊंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा होणार शुभारंभ

साई फाऊंडेशन आयोजित भव्य दिव्य दहीहंडी सराव शिबिर रविवारी ठाण्यात   ठाणे : साई फाऊंडेशच्यावतीने ठाण्यात भव्य दिव्य दहीहंडी उत्सवानिमित्त सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे 2 रे वर्ष…

 गोविंदा सीझन- २’ स्पर्धेत प्रथम पारितोषिक २५ लाख रुपये-उदय सामंत

अनिल ठाणेकर   ठाणे : गेल्या वर्षीपासून दहीहंडीचा एक आगळा वेगळा कार्यक्रम प्रो गोविंदा स्पर्धा आमदार प्रताप सरनाईक व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक व राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात…

ठाणे युवक काँग्रेसच्या वतीने शक्ती सुपरशी या कार्यक्रमा अंतर्गत ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष लोकेश सुखदेव घोलप यांनी स्वातंत्र दिनी महिलांच्या हस्ते ध्वजारोजन केले. सध्या देशात धर्म जाती पात याबाबत पसरत…