Author: bittambatami.com

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार, एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न

ठाणे : महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिन” दि.०१ ऑगस्ट पासून “महसूल पंधरवडा-२०२४” साजरा करण्यात येत आहे. यानुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी “एक हात मदतीचा दिव्यांगाच्या…

बीओबी १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना जेविनने जोविनला चकविले

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना जेविन पलायुरने (४.५ गुण) सरस सरासरीच्या बळावर त्याचाच भाऊ जोविन…

डोंबिवलीकर भगिनी बांधणार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना राखी

एक राखी जवानांसाठी माजी नगरसेवक मंदार हळबे यांचा अनोखा उपक्रम डोंबिवलीकर भगिनींनी जवानांसाठी बनवल्या हजारो राख्या   डोंबिवली : भारतीय सैनिक देशांच्या सीमांचे संरक्षण करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सीमेवर पहारा…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

मुंबई दि. १३ ऑगस्ट, २०२४ (प्रतिनिधी/वार्ताहर) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना मा. मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट…

सरकारच्या खोट्या आश्वासना विरोधात अंगणवाडी सेविका मदतनीस पुन्हा आझाद मैदानात

रमेश औताडे   मुंबई : राज्यातील एक लाख १५ हजार अंगणवाडी केंद्रातील सेविकांना व मदतनीस यांना सरकारने ५ हजार रुपये वाढीव देण्याचे आश्वासन मागील अधिवेशन काळात दिले होते. मात्र त्याची…

रिक्षावाले मुख्यमंत्री आमच्या समस्यांकडे कधी पाहणार रिक्षा चालकांचा सवाल

रमेश औताडे   मुंबई :मुख्यमंत्री एके काळी रिक्षा चालवायचे. त्यांना रिक्षा चालकांच्या समस्या सांगायची गरज नसताना आजही रिक्षा चालक अनेक संकटांचा सामना करत आहेत. लाडकी बहिण असो की लाडका भाऊ…

डेक्कन जिमखान्याला समस्यांचा विळखा -ॲड.भाऊसाहेब मोरे

अशोक गायकवाड   कर्जत : गेल्या काही दिवसांपासून टू व्हीलर, फोर व्हिलर, रिक्षा पार्किंग व कचरा आदी समस्यांच्या विळख्यात डेक्कन जिमखाना परिसर अडकला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…

विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला निर्देश द्यावेत – हाजी शाहनवाझ खान

राज भंडारी   रायगड : राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असो शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळणं कठीण झालं आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी असुविधा, समस्या सोडविण्यासाठी उपोषण आंदोलन करावे लागणे, हे चित्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि गौरवशाली परंपरेला भुषणावह नाही. समस्येचे गांभीर्य पाहता मुख्यामंत्र्यांनी मुंबई विद्यापिठाला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश द्यावेत असे आवाहन प्रदेश एमआयएम विद्यार्थी आघाडी महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी केले आहे. मुंबई विद्यापिठाचा देशातच नाही तर जगभरात नावलौकीक आहे. या विद्यापिठातंर्गत येणाऱ्या वसतीगृहातील समस्यांबाबत, असुविधांबाबत विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १२ ऑगस्ट) उपोषण आंदोलन पुकारले. कलिना संकुलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. वसतीगृहातील गैरसोयी, निकृष्ठ आणि सुमार दर्जाची खानपान सेवा, नुकतीच करण्यात आलेली पाच हजार रुपयांची दरवाढ याविरोधात नाराजी आणि संताप व्यक्त करत विद्यार्थ्यानी आंदोलनाचा मार्ग स्विकारला. वसतीगृहातील गैरसोयी, निकृष्ठ आणि सुमार दर्जाची खानपान सेवा, नुकतीच करण्यात आलेली पाच हजार रुपयांची दरवाढ या गैरसोयींना विद्यार्थी त्रासले आहेत. याशिवाय वसतीगृहाच्या भोजनगृहातील अस्वच्छता, मध्यवर्ती वाचनालयाच्या वेळा, वायफाय सुविधा, विद्यापिठातील कलिना संकुलातील पाणी समस्या याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विद्यार्थ्यांनी या समस्या आणि सुविधांबाबत वारंवार लेखी पाठपुरावा करुनही विद्यार्थ्याची दखल घेतली जात नाही. चर्चेसाठी बोलावतात, आश्वासने देतात, अंमलबजावणी होत नाही. हा घडत असलेला प्रकार योग्य नाही. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी असुविधा, समस्या सोडविण्यासाठी उपोषण आंदोलन करावे लागणे, हे चित्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला व गौरवशाली परंपरेला भुषणावह नाही. समस्येचे गांभीर्य पाहता, आपण तातडीने मुंबई विद्यापिठाला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश द्यावेत असे निवेदन त्यांनी केले आहे. 00000

रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते वासांबे विभागासाठी रुग्णवाहिका लोकार्पण!

पनवेल : यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा दरवर्षी दोन रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने मागच्या महिन्यात दिघोडे…

‘लहुजी क्रांती मोर्चा’ चा वर्धापन दिन

रमेश औताडे   मुंबई : सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती व “यह आझादी झूठी है, देश की जनता भुखी है” या ऐतिहासिक घोष वाक्याला ७७ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त १६ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पू.) मुंबई येथे लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने ६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. मधुकर गायकवाड (अधीक्षक व पथकप्रमुख, मेडीसिन विभाग, जे जे हॉस्पिटल, मुंबई) तर  प्रा. डी. आर. ओहोळ (राष्ट्रीय प्रधान महासचिव – बामसेफ) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड शेल्हाळकर, दीपक लोंढे, प्रा .पी. बी. लोखंडे,प्रा.डी.आर. कसाब व वरिष्ठ मार्गदर्शक अंकल सोनवणे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती लहुजी क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य संयोजन समितीचे प्रदेशाध्यक्ष नितीन कांबळे व प्रा.विकास पाथरीकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ०००००