Author: bittambatami.com

जोगेश्वरी पूर्व विधानसभेसाठी भाजपचे धर्मेंद्रनाथ ठाकूर

रमेश औताडे   मुंबई : जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जनतेची मी एक दशकाहून अधिक काळ सेवा करत आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने मला तिकीट दिले तर माझा या जागेवर विजय पक्का आहे. पक्षाने तिकीट दिले नाही तरी जनतेच्या आग्रहासाठी निवडणूक लढवणार. अशी माहिती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्रनाथ ठाकूर यावेळच्या विधानसभा निवडणुकीत तयारीला लागले आहेत. पक्षाने मला तिकीट दिले तर माझा या जागेवर विजय पक्का आहे, असा विश्वास व्यक्त करत ते यावेळी म्हणाले, जोगेश्वरी पूर्व विधानसभेत १५ वर्षांपासून  कावड यात्रा, राम कथा, रुद्राभिषेक, गरजूंना मदत करण्यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रम केले आहेत. आरोग्य शिक्षण रोजगार मेळावे आदी विविध समाज उपयोगी कार्यक्रम केले आहेत. 000

माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित नवीमुंबई वाशी येथील कांदा-बटाटा मार्केट मधील माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये त्यांना अभिवादन करताना. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री…

राज्य कॅरम स्पर्धेत अनिल मुंढे – काजल कुमारी यांना प्रथम मानांकन

सिंधुदुर्ग : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिंधदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि…

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत लाभार्थी कुटुंबांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर – धनंजय जाधव

अशोक गायकवाड   कर्जत : महाराष्ट्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे राज्यभर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ३० जुलै रोजी जारी झाला आहे.कर्जत तालुक्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार कर्जत धनंजय जाधव यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या उज्वला योजनेच्या महिला तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांचे कुटुंब देखील या योजनेसाठी पात्र असणार आहे. या योजनेकरीता एका रेशनकार्डवरील एकच महिला पात्र ठरणार असून एक कार्डवर तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी सदर गॅस जोडणी ही लाभार्थी महिलेच्या नावे असणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभार्थीना प्रथम गॅस सिलेंडरची बाजारभावानुसार पूर्ण रक्कम (अंदाजे ८३० रुपये) भरावी लागेल व त्यानंतर सदर सिलेंडरसाठी भरलेली संपूर्ण रक्कम शासन अनुदान स्वरुपात लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. एका महिन्यात एकाच सिलेंडर साठी शासन अनुदान मिळणार आहे.यामुळे महिला सक्षमीकरण, स्वच्छ इंधन, पर्यावरण संरक्षणास मोठा हातभार लागणार आहे. कर्जत तालुक्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार धनंजय जाधव यांनी केले आहे. 0000

‘प्रफुल्लित’ कामगार नेत्याचा अमृतमहोत्सव !

प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर उर्फ मित्रपरिवाराचा पप्पू पाटकर. हां हां म्हणता पप्पू पंचाहत्तर वर्षांचा झाला यावर कुणाचा विश्वास बसेल असे वाटत नाही. मी १९७५ ते १९७८ या कालावधीत चर्नी रोड येथील…

तयारी सूकर, पण अवघड पेपर!

विश्लेषण विठ्ठल लांडगे महायुती सरकारने मतदारांवर विविध योजनांवर सत्तर हजार कोटी रुपयांची उधळण केली असली तरी त्यामुळे आरामात निवडणूक जिंकता येईल, अशी परिस्थिती नाही. महायुतीतील लाथाळी, शेतीविषयक धरसोडीचे निर्णय, विविध…

तणावाचे मृत्यू!

आजच्या तरुण पिढीला जास्त पैसे मिळतात; परंतु त्यासाठी त्यांना कोणती किंमत मोजावी लागते, याचा विचार केला जात नाही. कंपन्यांचे हितसंबंध जपताना तरुण पिढीला आपण अकाली वृद्धत्वात किंवा मृत्यूच्या दाढेत ढकलत…

सिताराम येचूरींना मविआतर्फे श्रद्धांजली

नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात कॉम्रेड सिताराम येचूरी यांना महाविकास आघाडीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करताना शरद पवार. मुंबई: भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस कॉम्रेड सिताराम येचूरी यांना यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज महाविकास आघाडीच्या वतीने…

मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोचा मुहुर्त ठरला

मुंबई : मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोचा मुहुर्त ठरलाय. लवकरच मुंबईकरांना अंडरग्राऊंड मेट्रोतून गारेगार प्रवास करता येणार आहे. मुंबईची पहिली वहिली अंडरग्राऊंड मेट्रो सेवा, अर्थात मेट्रो तीनचा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार आहे. बीकेसी ते आरे…