Author: bittambatami.com

 मतदारराजासाठी धावाधाव!

 जिल्ह्यात मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन   नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा निवडणूक कार्यालयाने जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन केले आहे. यामध्ये बस, ट्रक, टेम्पो, जीप, कार, ऑटोरिक्षा आदी विविध वाहनांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून विविध गोष्टींचे नियोजन सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ६ हजार ८९४ मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या माध्यमातून त्या त्या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाच्या अनुषंगाने आवश्यक साहित्य, मतदार जनजागृती साहित्य, ईव्हीएम मशीन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी वाहने, भरारी पथकांसाठी वाहने आदी वाहनांचे जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वाहतूक व्यवस्था पथकाच्या माध्यमातून नियोजन केले आहे.

एस्टीपीकडून रस्ते पूर्ववत करण्यास सुरुवात

माथेरान : दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मलनिस्सारण प्रकल्प( एस्टीपी ) कामे पूर्ण करण्यासाठी कामाने वेग घेतला असून ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठेत रस्त्यांची खोदाई पूर्ण करण्यात आली आहे. त्या भागातील रस्ते बुजवून पूर्ववत करण्यात येत आहेत. चार महिने पावसाळ्यात ही कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे दसऱ्या नंतर या कामाना युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.खोदाई केल्यानंतर सर्व मातीचा उपयोग होण्यासाठी सुरक्षित ठिकाणी साठविण्यात येत आहे. लवकरच या रस्त्यावरील क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात येणार असून हे रस्ते पूर्ववत केले जाणार असल्याचे संबंधीत ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगामी काळात गावांमध्ये स्वच्छता दिसून येणार असल्याने अनेक ठिकाणी शौचालयाचे वाहून जाणाऱ्या पाण्याची दुर्गंधी यायची.काही हॉटेल धारकांनी स्वतःच्या हॉटेलमध्ये एस्टीपी प्लांट केला नसल्याने त्या हॉटेलचे सांडपाणी मुख्य रस्त्यावरील चेंबर मध्ये कचरा गोळा झाल्यास सर्व घाण परिसरात पसरल्याने दुर्गंधीचे प्रमाण दिसून यायचे. एस्टीपी प्लांट मुळे गावात दुर्गंधी हद्दपार होणार असून स्वच्छता राखण्यास मदत होईल असे सुज्ञ,अभ्यासू  नागरिक बोलत आहेत.

 मध्यवर्ती मतदान केंद्रातील नियंत्रण कक्षात लँडलाईन व टोल फ्री क्रमांक कार्यान्वित

 १४७ कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघाच्या ठाणे : भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचार संहिता जाहीर केलेली आहे. १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रासाठी मतदारांच्या तक्रारी नोंदविणे, त्यांना माहिती देणे या कामे करण्याकरिता १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती मतदान केंद्रात नियंत्रण कक्ष (२४४७) उभारण्यात आले असून या नियंत्रण कक्षात लँडलाईन दूरध्वनी क्रमांक ०२२- २०८१२८३६ व  १८००२२००२१ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे, असे १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद मुंढे यांनी कळविले आहे.

काँग्रेसच्या ‘हाताला’ ‘मशाली’चे चटके; नाना पटोले, राऊतांमध्ये उडाले खटके

रमेश औताडे मुंबई : निव़डणूका जाहिर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासाठी जोरदार घमासान सुरु आहे. पण महाविकास आघाडीत या जागावाटपावरून बिघाड असल्याचे आज जाहिरपणे दिसून आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि…

– ५१ नागरिकांना हरवलेले मोबाईल रिटर्न गिफ्ट

विठ्ठलवाडी पोलिसांची कामगिरी उल्हासनगर-  हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ नागरिकांचे त्यांचे हरवलेले किंबहुना गहाळ झालेले मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या टीमने दसऱ्याच्या दिवशी परत केल्याची घटना ताजी असतानाच,…

खो-खो प्रेमी सरस्वती मंदिरमध्ये दसरा संमेलन संपन्न

मुंबई : माहीम मध्ये खो-खो म्हटल कि सरस्वती मंदिर हायस्कूलच नाव लगेच झळाळून समोर येत. या शाळेने खो-खो ला जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू दिले. त्यात रंजन कोळी,…

महाराष्ट्रात आम आदमी पक्ष दोन जागा मागणार

कुडाळ : आम आदमी पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या दोन जागा लढवण्याची इच्छा असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगून महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कोणतेही प्रकारचे नुकसान होणार नाही…

रविवारी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा बालेवडी, पुणे येथे

मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवडी, पुणे येथे आयोजित केली आहे. सदर वार्षिक सर्वसाधारण सभा…

जुने वृत्तपत्र रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करा – मनिषा पिंगळे

अशोक गायकवाड अलिबाग : स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात २२ ऑक्टोबरपर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले आहे. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या…