Category: क्रीडा

प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा

समर चव्हाण विजेता मुंबई : प्रेस एनक्लेव्हतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात समर चव्हाण याने विजेतेपद पटकावले. सायन प्रतिक्षानगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकुण पाच फेऱ्यात समरने एक सामना अनिर्णित राखत साडे चार गुणांची कमाई केली होती. पण अमोघ शर्मानेही तितक्याच गुणांची कमाई केल्याने टायब्रेक झाला. यावेळी सरस गुणगतीच्या आधारे विजेतेपदाचा निर्णय घेण्यात आला. त्यात १३.२५ विरुध्द १२.७५ अशा अवघ्या ०.५० फरकाच्या गुणांनी समर चव्हाण याने बाजी मारली. अमोघला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर चार गुणांसहीत अदिश गावडे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. विजेत्या समर चव्हाणला कै. सदानंद चव्हाण यांच्या स्मरणार्थ अडीच हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तर अमोघ शर्माला कै. नंदकुमार जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिड हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांकावरील आदिश गावडे याला कै. सुमित्रा राजाराम पराडे यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू म्हणून युवान तावडे या खेळाडूला यावेळी सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक राजन पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजकल शरद पाठक आणि गणेश गावडे उपस्थित होते. प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा विजेते खेळाडू डावीकडून युवान तावडे, विजेता समर चव्हाण, प्रमुख पाहुणे राजन पिंगळे, उपविजेता अमोघ शर्मा आणि तृतिक क्रमांक विजेता आदिश गावडे.

नमो चषक क्रीडा महोत्सवाला राष्ट्रीय विक्रमवीर आणि

आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ललिता बाबर यांची भेट भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ललिता बाबर यांनी उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या नमो चषक स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खासदार…

अमरहिंद मंडळ आयोजित महिला व किशोर गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२५.

यंग प्रभादेवी, विजय क्लब, आकांक्षा मंडळ, शिवनेरी सेवा यांनी किशोर गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. शिवशक्ती महिला संघ उपांत्य फेरीत दाखल. मुंबई:- यंग प्रभादेवी, विजय क्लब, आकांक्षा मंडळ, शिवनेरी सेवा, यांनी…

एसएसटी महाविद्यालयाच्या रेश्मा राठोड ची खो-खो विश्वचषक विजेत्या भारतीय संघात चमकदार कामगिरी

कल्याण : एसएसटी महाविद्यालयाची विद्यार्थीनी रेश्मा राठोड हिची प्रथम खो-खो विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती, जिथे भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय नोंदवत नेपाळवर मात करून विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. ही…

नमो चषकात खेळाडूंच्या कलागुणांना वाव; नमो चषकात खेळाडूंची विशेष काळजी

पनवेल : लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव नमो चषक २०२५’ स्पर्धेला दिवसेंदिवस खेळाडू आणि…

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित

४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा ओम साईश्वर, रचना नोटरी, महावितरण, पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्टाची विजयी घोडदौड मुंबई : खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा…

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला प्रारंभ

मुंबई : लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा येथे आयोजित केलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑईल व ओ. एन. जी. सी पुरस्कृत ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे उदघाटन मुंबई…

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित खो खो स्पर्धा

४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित आणि मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने किशोर गट (४ फुट ११ इंच) तसेच व्यावसायिक पुरुष व…

मरहिंद मंडळ शालेय कबड्डी-लंगडी-खो-खो स्पर्धा श्री गणेश विद्यालयाचा डबल धमाका

मुंबई: अमरहिंद मंडळाच्या वतीने आयोजित शालेय कबड्डी, लंगडी आणि खो-खो स्पर्धांमध्ये वडाळ्याच्या श्री गणेश विद्यालयाने चमकदार कामगिरी करत दुहेरी विजेतेपद मिळवले. आज झालेल्या लंगडीच्या अंतिम सामन्यात श्री गणेश विद्यालयाने मुलांच्या…

टिटवाळा येथे कॅन्सरविरोधात मॅरेथॉनमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती कल्याण : कॅन्सरविरोधात जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘रन फॉर फाईट अगेन्स्ट कॅन्सर’ मॅरेथॉन टिटवाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. रेड स्वस्तिक सोसायटी, स्पर्श फाउंडेशन, स्पंदन…