जळगावचा नईम तर मुंबईची काजल अंतिम विजेते
राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब ( क्षात्रैक्य समाज, मुंबई ) यांच्या संयुक विद्यमाने वनमाळी हॉल, दादर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम…
राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब ( क्षात्रैक्य समाज, मुंबई ) यांच्या संयुक विद्यमाने वनमाळी हॉल, दादर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम…
७१वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे, श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला गटात कर्नाळा क्रीडा (रायगड), प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे) या…
ओंकार, सिद्धेश चमकले ठाणे : ओंकार करंदीकर,अश्विन माळीची गोलंदाजी आणि राहुल कश्यपच्या नाबाद खेळी मुळे विजय इंदप क्रिकेट क्लबने रॉयल क्रिकेट क्लबचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित ३७ व्या डॉ श्रीधर देशपांडे स्मृती समर्लिग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रॊयल क्रिकेट क्लबला ६१ धावांमध्ये गुंडाळल्यावर ८.२ षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या ६४ धावांसह विजय इंदप क्रिकेट क्लबने आगेकूच कायम राखली. ओंकार करंदीकर, अश्विन माळी आणि स्वप्नील दळवीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत रॉयल क्रिकेट क्लबला ६१ धावांवर रोखले. भावेश पवारच्या २६ धावांचा अपवाद वगळता रॉयलचे इतर फलंदाज छाप पाडू शकले नाहीत. ओंकार आणि अश्विनने प्रत्येकी तीन, स्वप्नील दळवीने दोन आणि प्रतीक जयस्वालने एक गडी बाद केला. त्यानंतर राहुल कश्यपच्या नाबाद ३२ धावांमुळे विजय इंदप क्रिकेट क्लबने ८ गडी राखून पराभव केला. सिद्धेश भगतने १३ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : रॉयल क्रिकेट क्लब : १५.४ षटकात सर्वबाद ६१(भावेश पवार २६, ओंकार करंदीकर ४-११-३, अश्विन माळी ४-१५-३ स्वप्नील दळवी ०.४- १-२) पराभूत विरुद्ध विजय इंदप क्रिकेट क्लब : ८.२ षटकात २ बाद ६४ ( राहुल कश्यप नाबाद ३२, सिद्धेश भगत १३, राहुल म्हात्रे २-२१-१, गणेश मोरे ३-१८-१).
ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धा ठाणे : गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने बेनेटन क्रिकेट क्लबचा एक गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे…
मुंबई : स्टेट बँकेचे कबड्डी खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक शिवाजी भांदीग्रे यांचे १ मे रोजी सायं. ७-०० च्या सुमारास परेल रुग्णालयात आकस्मित निधन झाले. परेलच्या बी. रघुवीर संघातून खेळणाऱ्या दादांनी महाराष्ट्र हायस्कूल नं. २ शाळेतून कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. निधना समयी ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व सूना असा परिवार आहे. ते दादा या नावाने कबड्डी वर्तुळात परिचित होते. उजवा कोपरा रक्षक असलेले दादा पायात झेप घेऊन पकड करण्यात माहीर होते. दादा चढाई देखील उत्तम करीत असत. खेळाडूच्या डोक्यावरून उडी मारण्यात ते तरबेज होते. पण खेळाडू पेक्षा ते अधिक रमले प्रशिक्षकाच्या भूमिकेत. विरोधी संघातील खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या सहकारी खेळाडू कडून संघाच्या विजया करीता करून घेण्यात त्यांना अधिक रस होता. साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब या संघाला पुनर्जीवित करून नावलौकिक मिळवून देण्यात शेखर शेट्टी यांच्या बरोबरीने दादांचा सिंहाचा वाटा होता. कित्येक कबड्डी खेळाडूंना त्यांनी स्टेट बँकेत कबड्डी खेळाडू म्हणून भरती केले. कबड्डी खेळाबद्दल ते खूप आत्मीयतेने बोलत. सद्या ते ओम् कबड्डी प्रबोधिनी या संघटनेच्या माध्यमातून तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम करीत होते. आजच रात्री १-३०च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशान भूमीत करण्यात आले.
ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धा ठाणे : सामनावीर ठरलेल्या निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक, साहिल गोडेच्या ९१ धावा आणि गोलंदाजांच्या एकत्रित चांगल्या कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने ए.टी स्पोर्ट्सचा १९८ धावांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय मिळवला. फलंदाजांच्या आक्रमक खेळामुळे २५८ धावांचा पर्वत उभा केल्यावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या गोलंदाजांनी ए,टी स्पोर्ट्सला ६० धावांवर गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले. दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर सुरु असलेल्या स्पर्धेतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निखिल पाटील आणि साहिल गोडेने ए.टी. स्पोर्ट्सच्या गोलंदाजांचा अक्षरशः फडशा पाडला. निखिलने नाबाद ११८ धावांची खेळी केली. ४८ चेंडूत शतक साकारणाऱ्या निखिलने ९ चौकार आणि तेवढेच षटकार ठोकले. साहिलने ३६ चेंडूत ९१ धावांची बहुमूल्य खेळी साकारताना १२ चौकार आणि पाच षटकार मारले. धृमील मटकरने नाबाद ३० धावा केल्या. या डावात योगेश सावंतने दोन, अश्विन यादव आणि सिद्धार्थ यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. त्यानंतर मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ए टी स्पोर्ट्सच्या फलंदाजाना खेळपट्टीवर टिकू न देता गोलंदाजांनी विजयाचा मार्ग मोकळा केला. संक्षिप्त धावफलक : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ( ब संघ ) : २० षटकांत ४ बाद २५८ ( निखिल पाटील नाबाद ११८, साहिल गोडे ९१, धृमील मटकर नाबाद ३०, योगेश सावंत ४-२५-२, अश्विन यादव ४-४९-१, सिद्धार्थ यादव ४-५२-१) विजयी विरुद्ध ए टी स्पोर्ट्स : १२.१ षटकात सर्वबाद ६० ( कौशिक शुक्ला १८, शिवम घोष १५ , हेमंत बुचडे २-४-२, अमित पांड्ये २-७-२,अर्जुन शेट्टी २-७-२, धृमील मटकर १.१ – २-१, अमन खान १-४-१,नंदन कामत३-१३-१.) सामनावीर – निखिल पाटील.
मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गाव चिखले, जि. पालघर येथे मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात , मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवानांनी भरघोस बक्षिसांची लयलूट केली. मनीषा शेलार हिने महिला गटातील फायनलची गदे वरील कुस्ती जिंकली. कोमल पटेल, मनस्वी राऊत, कविता राजभरने आपल्या लढती सहज जिंकून चषक पटकावले. सूरज माने, सूर्यकांत देसाई, आदर्श शिंदे, अभिषेक इंगळे यांनी देखील प्रतिस्पर्ध्यांना लिलया आस्मान दाखवून रोख रकमेची पारितोषिके आणि पदके मिळवली. या सर्व कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
मुंबई : लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेचे माजी क्रीडा शिक्षक, बुजुर्ग क्रीडा प्रशिक्षक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त किसन सखाराम कदम यांचे १ मे रोजी सकाळी चेंबूर येथील कोळेकर हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. चेंबूर हायस्कूल या चेंबूर च्या पहिल्या शाळेत काम करत असताना भ. मा. पंत यांच्या तालमीत कदमसर तयार झाले. बास्केटबॉल, खोखो, ॲथलेटिक्स अश्या विविध खेळांच्या स्पर्धांत राज्य व राष्ट्रीयस्तरावर कदमसर सहभागी झाले होते. त्यांनी या विविध खेळात अनेक खेळाडू तयार केले. त्यानंतर पंत सरांबरोबर जवाहर विद्याभवन व श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळा स्थापन करून गरीब मुलांना शिक्षण देण्यात सरांचा मोठा वाटा होता. कदम सरांच्या १ खेळाडूला अर्जुन पुरस्कार, १४ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार, २२ खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाले. सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत देखील भरघोस पदकांची कमाई केलेली आहे. चेंबूर येथील चरई स्मशानभूमीत कदम सरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वाती घोसाळकर मुंबई- मिशन टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर टीमची घोषणा करण्यात आली. भारताच्या मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची कॅप्टन्सी पुन्हा एकदा रोहीत शर्माकडेच…
ठाणे : आकाश सावला आणि निशांत मानेने पाचव्या गड्यासाठी केलेल्या नाबाद १०८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर गतविजेत्या मॉर्डन क्रिकेट क्लबने माझगाव क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून पराभव करत स्पोर्टींग क्रिकेट क्लब…