३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र दोन सुवर्ण पदकांपासून एक पाऊल दूर उपांत्य फेरीत दिल्ली व प. बंगालवर दणदणीत विजय हल्दवानी : उत्तराखंडच्या हल्दवानी येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला…
खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र दोन सुवर्ण पदकांपासून एक पाऊल दूर उपांत्य फेरीत दिल्ली व प. बंगालवर दणदणीत विजय हल्दवानी : उत्तराखंडच्या हल्दवानी येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला…
द यंग कॉम्रेड्स शील्ड स्पर्धेत पारसी जिमखान्याविरुद्ध घेतल्या 7 विकेट मुंबई: द यंग कॉम्रेड्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत युनायडेट क्रिकेटर्स संघाला पारसी जिमखान्याविरुद्ध 81 धावांनी पराभूत व्हावे लागले तरी मध्यमगती स्विंग गोलंदाज आदित्य राणेने 7 विकेट घेत सर्वांची मने जिंकली. जय जैनच्या (97 चेंडूंत 118 धावा) शानदार शतकामुळे पारसी जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. सचिन यादवने 46 चेंडूत 50 धावा करताना इशान मुलचंदानीने 46 चेंडूत 35 धावांचे योगदान देत त्याला चांगली साथ दिली. आदित्य राणेने 22.3 षटकात 87 धावांत 7 विकेट्स घेत छाप पाडली. प्रतिस्पर्ध्यांचे मोठे आव्हान युनायटेड क्रिकेटर्सला पेलवले नाही. ओंकार रहाटेने 50, सुचित देवलीने 51 तसेच आदित्य सुळेने 32 धावा करताना थोडा प्रतिकार केला. आदित्य राणेनेही 28 चेंडूंत झटपट 30 धावा जोडताना फलंदाजीतही छाप पाडली. मात्र, अन्य सहकार्यांनी निराश केल्याने पराभव पाहावा लागला. सागर छाब्रियाने 3 तसेच नूतन गोयलने 4 महत्त्वपूर्ण विकेट घेत मोठा विजय सुकर केला.
मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा ठाणे: महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व द अमॅच्युअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळी मंडळाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच विभागीय…
महाराष्ट्राला रग्बीमध्ये 1 रौप्य, 1 कांस्य पुरूष संघाला रौप्य, महिलांना कांस्य डेहराडून ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रूग्बी सेव्हनमध्येही महाराष्ट्राने खाते उघडून 1 रौप्य व 1 कांस्य पदकांची कमाई केली. अंतिम…
कबड्डीत महिलांच्या गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत हरिव्दार ः कबड्डीमध्ये अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला गटात उपांत्य फेरीकडे वाटचाल करीत पदकाच्या आशा कायम राखल्या. अटीतटीने झालेल्या लढतीत महाराष्ट्राने पश्चिम बंगाल या तुल्यबळ संघावर 30-22 अशी मात केली. हरिव्दारमधील योगस्थळी क्रीडा परिसरात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने विजयी घोडदौड कायम राखली आहे. उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगाल विरूध्द खेळताना महाराष्ट्राकडून सोनाली शिंगटे व मंदिरा कोमकर यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. रेखा सावंत हिने जोरदार पकडी करीत त्यांना चांगली साथ दिली. या सामन्यांमध्ये महाराष्ट्रात पुढे बंगालच्या बलाढ्य खेळाडूंचे मोठे आव्हान होते तरीही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवले आणि विजय खेचून आणली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची हरियाणा संघाशी गाठ पडणार आहे. पुरुषांच्या गटात मात्र महाराष्ट्राला आज साखळी गटातील रंगतदार लढतीत पराभव स्वीकारावा लागला. उत्तर प्रदेशने त्यांना 44-43 असे एका गुणाने पराभूत केले. या पराभवामुळे महाराष्ट्राच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा दुरावल्या आहेत.
मुलींच्या महाराष्ट्राला गटात सर्वसाधारण विजेतेपद रुद्रपूर : उत्तराखंड मध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलिंग खेळाच्या स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या पूजा दानोलेला ६० किमी अंतराच्या रोड मास स्टार्ट प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत महाराष्ट्राने ८ गुण घेत मुलींच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उप पथक प्रमुख उदय डोंगरे यांनी सायंकलिंग स्पर्धे दरम्यान भेट देऊन खेळाडूंचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या पूजा दानोले हिने ६० किमी रोड रेस प्रकारात १ ता. ४५ मी १०.५९० से.वेळ देत रौप्य पदक मिळवले तर गुजरातच्या मुस्कान गुप्ता हिने १ ता. ४५ मी १०.५१२ से. वेळ देत सुवर्णपदक पटावले. आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू स्वास्ती सिंग हिने १ ता. ४५ मी १०.७६९से. कांस्यपदक मिळवले. या सर्धेचे समुलींच्या गटाचे सर्वसाधारण विजेतेपद ८ गुणांसह महाराष्ट्राने पटकावले तर ५ गुणांसह गुजरात दुस-या तर राजस्थान ३ गुणांसह तिसरा स्थानी राहीले.
एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धा माजी विंबल्डन उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या तातयाना मारिया हिला अव्वल मानांकन मुंबई, 30 जानेवारी 2025: एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या चौथ्या सत्राचे औपचारिक उद्घाटन क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथील टेनिस संकुलात 30 जानेवारी 2025 रोजी पाडले. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 31 देशांमधील मानांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. डब्लुटीए 125000डॉलर स्पर्धा मालिकेतील एक महत्वाची स्पर्धा असलेल्या या स्पर्धेला 1 फेब्रुवारी रोजी पात्रता फेऱ्यानी प्रारंभ होणार असून मुख्य ड्रॉ चे सामने 3 फेब्रुवारी 2025 पासून रंगणार आहेत. स्पर्धेतील अंतिम फेरीचे सामने 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या या वर्षीच्या मालिकेत अनुभव आणि युवा खेळाडू यांच्यातील चुरस पाहावयास मिळणार आहे. एकेरीतील अव्वल मानांकन जागतिक क्रमवारीत 73व्या स्थानी असलेल्या तातयाना मारिया हिला देण्यात आले असून ती आपल्या कारकीर्दीतील चौथ्या विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या मारियाने यापूर्वी विंबल्डन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून जागतिक क्रमवारीत 42वे स्थान हे तिचे कारकीर्दीतील सर्वोत्तम मानांकन आहे. 2022मध्ये 34 वर्षापेक्षा अधिक वय असलेली ओपन टेनिसमधील ती केवळ सहावी महिला खेळाडू ठरली आहे. मारिया हीने 2023 व 2024मध्ये कोलंबियातील कोपा कोलसॅनिटास ही डब्लुटीए 250दर्जाची स्पर्धा जिंकली होती. गतविजेती लात्वियाची दरिया सेमेनिस्तजा ही जगातील सर्वात गुणवान खेळाडूंपैकी एक असून राफेल नदालने आपल्या अकादमी साठी निवडलेली फिलिपिन्सची अलेक्झांड्रा इयाला या दोन्ही खेळाडू विजेतेपदासह डब्लूटीए क्रमवारीत पूर्ण 125गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ) व संयोजन समितीचे अध्यक्ष ओ. पी. गुप्ता यांनी सांगितले की, एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेच्या आणखी एका सत्राचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत असून या निमित्ताने टेनिस या खेळातील अधिकाधिक पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्याची संधी साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार उत्सुक आहे. एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेच्या दर्जाच्या भरघोस पारितोषिक रक्कम असलेल्या स्पर्धा भारतीय खेळाडूंना त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि जागतिक क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच, जागतिक क्रिडा क्षेत्राच्या नकाशावर महाराष्ट्र राज्याचा ब्रँड मोठ्या प्रमाणावर पुरस्कृत करण्यासाठी हि स्पर्धा महत्वाची असून आज पर्यंतची ही सर्वात भव्य स्पर्धा ठरणार आहे. महाराष्ट्राचे प्रिंसिपल सेक्रेटरी(पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था) आणि संयोजन समितीचे खजिनदार, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रवीण दराडे यांनी सांगितले की, सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेला आर्थिक पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही मुख्य प्रायोजक लार्सन अँड टूब्रो(एल अँड टी) यांचे आभार मानतो. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धा ही भारतातील सर्वाधिक प्रतिक्षित टेनिस स्पर्धा ठरली असून यंदाची स्पर्धा सर्वाधिक वैभवशाली ठरेल. ते पुढे म्हणाले की, भारतीय खेळाडूंसाठी एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धा हे सर्वोत्तम व्यासपीठ असून गतवर्षी सहजा यमलापल्ली आणि श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती यांच्यासह महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे या खेळाडूंना या स्पर्धेचा फायदा झाला आहे. प्रार्थना ठोंबरे हीने 250दर्जाच्या स्पर्धेत दुहेरी गटात विजेतेपद देखील पटकावले. एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेचे चौथे सत्र भारतीय टेनिस क्षेत्रासाठी संस्मरणीय ठरणार असून भारतीय टेनिस प्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद घेता येणार आहे. स्पर्धेच्या उत्कृष्ट संयोजनासाठी संयोजन समिती अथक परिश्रम करत असून ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एल अँड टीच्या कॉर्पोरेट स्ट्रेटेजी व स्पेशल इनीशिएटीव्ह विभागाचे प्रमुख अनुप सहाय म्हणाले की, एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेने अल्पावधीतच एक उच्च स्तर गाठला असून भारतीय टेनिस क्षेत्राला एक नव्या आशेचे क्षितिज मिळवून दिले आहे. समृध्द परंपरा, इतिहास असलेल्या भारतीय टेनिस क्षेत्राला लार्सन अँड टूब्रो यांनी नेहमीच पाठिंबा दिला असून यंदाच्या एल अँड टी मुंबई ओपन टेनिस स्पर्धेमुळे भारतीय टेनिस व एल अँड टी यांच्या भागीदारीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. संयोजन समिती अध्यक्ष ओ.पी.गुप्ता, खजिनदार संजय खंदारे, संयोजन सचिव प्रवीण दराडे यांच्यासह अखिल भारतीय टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष भरत ओझा, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस समितीचे अध्यक्ष संजीव कोठारी, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, स्पर्धा संचालक व क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस विभागाचे सचिव लव कोठारी या प्रसंगी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते अधिकृत पोशाखाचे अनावरण करण्यात आले.
श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष व महिला गटातील दिग्गज संघांची रंगतदार लढत ठाणे : श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच विभागीय पुरुष आणि महिला गटातील भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रोमांचक स्पर्धा ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील सामने सकाळी ८:०० ते ११:०० आणि संध्याकाळी ४:०० ते ९:०० या दोन सत्रांमध्ये रंगणार आहेत. शतक महोत्सवी वर्षात ऐतिहासिक आयोजन या ऐतिहासिक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन ३१ जानेवारी रोजी सकाळी ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर बक्षीस समारोप सोहळा १ फेब्रुवारी रोजी रात्री ९:०० वाजता उमेश साळवी (सेवानिवृत्त – मुंबई उच्च न्यायालय) यांच्या हस्ते होईल. मुंबई, उपनगर व ठाण्यातील नामवंत संघांची मोठी उपस्थिती या स्पर्धेत पुरुष गटात १६ आणि महिला गटात १२ असे एकूण २८ संघ भाग घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील श्री मावळी मंडळ, श्री आनंद भारती समाज, ग्रिफीन जिमखाना, विहंग क्रीडा केंद्र, राज क्रीडा मंडळ, धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ज्ञानविकास फाउंडेशन, वायूदूत क्रीडा केंद्र, शिवभक्त क्रीडा केंद्र, युवक क्रीडा केंद्र आणि न्यू बॉम्बे हायस्कूल हे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. मुंबई जिल्ह्यातून सरस्वती स्पोर्ट्स, अमर हिंद मंडळ, विद्यार्थी क्रीडा केंद्र, श्री समर्थ व्यायाम मंदिर आणि ओम साईश्वर सेवा मंडळ यांसारख्या मातब्बर संघांनी आपली हजेरी लावली आहे. तसेच, मुंबई उपनगरातील श्री सह्याद्री संघ, महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी आणि युवा स्पोर्ट्स क्लब हे नामवंत संघही या स्पर्धेत भाग घेत आहेत. १,००,०००/- च्या पारितोषिकांसाठी संघांमध्ये चुरस या भव्य स्पर्धेसाठी तब्बल ₹१,००,०००/- ची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. त्यामुळेच या स्पर्धेत अंतिम विजयासाठी संघांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळतील. खो-खो क्रीडाप्रेमींसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे. श्री मावळी मंडळाचे शतक महोत्सव वर्ष आणि या ऐतिहासिक स्पर्धेचे रोमांचक क्षण अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे. 00000
ट्रॅकनाईट ॲथलेटिक्स स्पर्धा मुंबई: एआयएम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या युग पाटीलने युनिव्हर्सिटी पॅव्हेलियन मैदानावर खेळल्या गेलेल्या ट्रॅकनाईट ॲथलेटिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीत तीन सुवर्णपदक जिंकून 12 वर्षांखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान मिळविला. 60 मीटर धावणे प्रकारात अत्यंत चुरस पाहायला मिळाली. युग पाटीलने 8.465 सेकंद वेळेसह रेस पूर्ण करताना वर्चस्व गाजवले. त्याला डीएसएसएच्या दैविक नायडूकडून (8.620 सेकंद) चांगला प्रतिकार लाभला. त्याने रौप्यपदक मिळवले. चिल्ड्रन्स ॲकॅडमी ग्रुप ऑफ स्कूलच्या (अशोक नगर) जेसन जिमीने ९.०१५ सेकंद वेळेसह तिसरे स्थान मिळवले. त्यापूर्वी, युग पाटीलने 120 मीटर धावणे प्रकारात सातत्य राखताना उल्लेखनीय वेगाचे प्रात्यक्षिक करून 15.862 सेकंदात अंतिम रेषा पार केली. या प्रकारातही दैविक नायडूने 16.973 सेकंदाच्या वेळेसह दुसरे स्थान पटकावत पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले. जीएईटीमधील आरव कुलकर्णीने 17.740 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. 300 मीटर धावण्याच्या प्रकारात युग पाटीलने 42.779 सेकंदांच्या उल्लेखनीय वेळेसह सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तसेच दिवसातील निर्विवाद स्प्रिंट किंग म्हणून स्वत: ला सिद्ध केले. यश पालवीने 47.006 सेकंदात रेस पूर्ण करताना रौप्यपदक मिळवले. जीएईटीमधील श्री कांबळीचे (47.027 सेकंद) दूसरे स्थान थोडक्यात हुकले.
सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या पूजा दानोलेला सुवर्ण रुद्रपूर : उत्तराखंड मध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलिंग खेळाच्या सुरु झालेल्या स्पर्धेत आज पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या पूजा बबन दानोले हिने सुवर्णपदक पटकावले. रुद्रपूर येथे आजपासून सुरु झालेल्या रोड सायकलिंग खेळाच्या महिलांच्या ३० टाईम ट्रायल प्रकारात पूजा दानोले हिने ४५ मि. ३३.७३४ से. वेळ देत भारतामधील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना मागे टाकत महाराष्ट्राला सायकलिंगमधील पहिले पदक मिळवून दिले. रुद्रपूर ते पंतनगर रोडवरील १५ किमी अंतराच्या मार्गावर या स्पर्धा पार पडल्या. मूळची कोल्हापूरची असलेल्या पूजाने सायकलिंग खेळाचे प्राथमिक प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या पुणे क्रीडा प्रबोधिनी येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या कडे घेतले. नवी दिल्ली येथील सिएफआय आणि साई यांच्या संयुक्त अकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षण घेतले. पूजाने रोड, एमटीबी आणि ट्रॅक या तीनही प्रकारात आपले वर्चस्व सिद्ध केले असून सध्या रोड आणि ट्रॅकवर तीने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या स्पर्धेतील रौप्य पदक मोनिका जाट हिने ४५ मि. ४८.३५१ से. देत जिंकले तर कर्नाटकच्या शिवलिंग हिला ४५ मि. ५१.५९४ वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रुद्रपूर येथे सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष आणि स्पर्धा संचालक प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑप महाराष्ट्रचे सचिव प्रा. संजय साठे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील, प्रशिक्षक उत्तम नाळे आदी मान्यवरांनी भेटून कौतुक आणि अभिनंदन केले. या स्पर्धेचा पदक प्रदान समारंभ रुद्रपूरचे जिल्हाधिकारी मा. नितीन भडोदीया यांच्या आणि सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे महासचिव आणि जीटीसीसी चे सदस्य मनेंदर पाल सिंग यांच्या हस्ते संपन्न झाला 0000 0000