वसंत विहार विद्यालयाचा विजय
ॲड. रमाकांत ओवळेकर चषक स्पर्धा वसंत विहार विद्यालयाचा विजय आयर्न ठाकूरची हॅट्रिक, विहान सरमळकर सामनावीर ठाणे -मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने युनायटेड क्रिकेटर्स व सूर सुदान शौर्या स्वर संस्था आयोजित १४…
ॲड. रमाकांत ओवळेकर चषक स्पर्धा वसंत विहार विद्यालयाचा विजय आयर्न ठाकूरची हॅट्रिक, विहान सरमळकर सामनावीर ठाणे -मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने युनायटेड क्रिकेटर्स व सूर सुदान शौर्या स्वर संस्था आयोजित १४…
जिहांश पाटीलचा डबल धमाका राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत हृदित्य, काश्वी, त्रिशानेही जिंकली पदके ठाणे : महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटनेने कोपरगाव येथे आयोजित कनिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याच्या जिहांश पाटीलने ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत १५ दिवसांपूर्वी नोंदवलेला स्वतःचाच जिल्हा विक्रम पुसून टाकताना नवा उच्चांक नोंदवला. ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स संघाच्या जिहांशसह हृदित्य कवीश्वर, काश्वी करंजकर आणि त्रिशा गाला यांनी आपल्या संघासह ठाणे जिल्ह्याला पदके जिंकून दिली. जिहांशने ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत ठाणे जिल्हा अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत रचलेला ७.५ सेकंदाचा जिल्हा विक्रम मागे टाकताना ७.३२ सेकंदाचा विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय जिहांशने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १४.२८ सेकंदासह राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे सुवर्ण पदक निश्चित केले. कनिष्ठ गटात ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत हृदित्यने ८.७८ सेकंद अशा कामगिरीसह अव्वल स्थान मिळवले. मुलींच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत काश्वीने १५.७ सेकंद अशी वेळ नोंदवून वैयक्तिक रौप्य पदक पक्के केले. या स्पर्धेत अवघ्या ०.०१सेकंदाने काश्वीला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.तर अवघ्या सहा महिन्यांपासून धावण्याच्या सरावास सुरुवात करणाऱ्या त्रिक्षाने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १७.८३ सेकंद अशा वेळेसह १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील कांस्य पदक जिंकले.
डब्ल्यूआयजीए बीपीजीसी महिला खुली हौशी गोल्फ स्पर्धा पारोमिता मुखर्जी पहिल्या दिवशी आघाडीवर मुंबई: बीपीजीसी लेडीज सेक्शन्स आयोजित सीपीपीच्या सह-प्रायोजित१४व्या डब्ल्यूआयजीए बीपीजीसी महिला खुल्या हौशी गोल्फ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी एव्हीटी…
मालाडमध्ये शरीरसौष्ठवाचा २२ फेब्रुवारीला महासंग्राम ज्युनियर मुंबई श्रीसह दिव्यांग आणि मास्टर्स स्पर्धेचाही पिळदार थरार जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्युनिअर मुंबई श्री चे मालाड येथे आयोजन मुंबई : जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर शरीर घडवणाऱ्या तरुणाईला मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी देणारी ‘दिव्यांग / मास्टर्स / ज्युनियर मुंबई श्री २०२६’ तसेच ‘ज्युनियर मुंबई मेन्स फिजीक’ ही बहुप्रतिक्षित शरीरसौष्ठव स्पर्धा रविवार, २२ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्ट यांच्या विद्यमाने मालाड (पूर्व) येथील पंडित दिनदयाल उपाध्याय उद्यान, कासम बाग येथे रंगणार आहे. स्पर्धेपूर्वी दुपारी १ ते ४ या वेळेत वजन व उंची तपासणी होणार असून, ही तपासणीच अनेक खेळाडूंसाठी अंतिम कसोटी ठरणार आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली. या स्पर्धेत ज्युनियर मुंबई श्री अंतर्गत ५५ किलोपासून ७५ किलोवरील असे एकंदर सहा वजनी गट, मास्टर्स मुंबई श्रीमध्ये ४० ते ५०, ५० ते ६० आणि ६० वर्षांवरील गट, तर दिव्यांग मुंबई श्री व ज्युनियर मुंबई मेन्स फिजीकसाठी स्वतंत्र खुले गट ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नवख्या ज्युनियर खेळाडूंना अनुभवी शरीरसौष्ठवपटूंसोबत एकाच व्यासपीठावर चमक दाखवण्याची प्रेरणादायी संधी मिळणार आहे. या स्पर्धेचे आकर्षण केवळ रंगतदार सादरीकरणापुरते मर्यादित नसून पारितोषिकांमध्येही मोठा दम आहे. ज्युनियर मुंबई श्री व ज्युनियर मुंबई मेन्स फिजीकच्या प्रत्येक वजनी गटात पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे ३,०००, २,५००, २,०००, १,५०० व १,००० रुपये रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे, तसेच पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके दिली जाणार आहेत. सहा गटांतील किताब विजेत्यास १५ हजार रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. दिव्यांग मुंबई श्री गटातही पहिल्या पाच विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रे, तर मास्टर्स मुंबई श्री गटात पहिल्या तीन विजेत्यांना पदके आणि पहिल्या पाच विजेत्यांना प्रशस्तीपत्रे दिली जातील.…
अमर हिंद मंडळात रंगणार जपान विरुद्ध कबड्डीचा थरार! दादरच्या मॅटवर घुमणार आंतरराष्ट्रीय कबड्डीचा जयघोष कबड्डीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झालेल्या दादरच्या अमर हिंद मंडळाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय रंगत उतरतेय! मुंबई कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने जपान कबड्डी असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय मुलींचा संघ आणि अमर हिंद मंडळाचा मुलींचा संघ यांच्यात ११ फेब्रुवारी सायंकाळी ठीक ७ वाजता मैत्रीपूर्ण सामना रंगणार असून, कबड्डीप्रेमींना जागतिक दर्जाचा थरार अनुभवता येणार आहे. आंतरराष्ट्रीय उपस्थिती : जपानकडून मान्यवरांची हजेरी या सामन्यासाठी जपान कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी जनरल कवाई स्वतः उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोबत १६ महिला खेळाडूंचा संघ तसेच महिला प्रशिक्षक अओकी यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. ही भेट भारतीय कबड्डीच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. कबड्डीला जागतिक पातळीवर नवे बळ कबड्डी या खेळाला आंतरराष्ट्रीय महत्त्व निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर समृद्ध करणे हा या मैत्रीपूर्ण सामन्यामागील प्रमुख उद्देश आहे. दोन्ही संघांचा सामना मॅटवर होणार असून, तांत्रिक कौशल्य, वेग आणि डावपेच यांचा सुरेख संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रवेश विनामूल्य : कबड्डी प्रेमींसाठी खुलं आमंत्रण हा सामना सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमर हिंद मंडळ, दादरच्या प्रमुख कार्यवाह सीमा कोल्हटकर यांनी केले आहे. दादरच्या क्रीडा भूमीत जागतिक कबड्डीचा उत्सव जपान आणि भारतातील मैत्रीला क्रीडामाध्यमातून नवी उंची देणारा हा सामना दादरच्या क्रीडा संस्कृतीसाठी अभिमानाचा क्षण ठरणार असून, अमर हिंद मंडळ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडामंचावर आपली ठसा उमटवणार आहे.
शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालयात पार पडल्या विविध स्पर्धा कल्याण : शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालय, बी.एड., शहाड विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, फुल सजावट, नेल आर्ट स्पर्धा, हेअर स्टाईल स्पर्धा तसेच फूड स्टॉल (खाद्य मेळावा) या उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमास शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाबा रामटेके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्या वैशाली पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. कल्पना सोमनाचे, प्रा. बबन पाटील, प्रा. अनघा चौधरी, प्रा. डॉ. सुस्मिता म्हाळुंकर, प्रा. योगिनी घरत, ग्रंथपाल प्रा. अनघा मोडक तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना नियोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली कला, कल्पकता व कौशल्य सादर केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा मनमुराद आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरोग्य विद्यापीठाची उत्तम कामगिरी नाशिक : महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांकांचे पारितोषिक पटकावले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरविरुध्द झुंज देत असताना नाशिकच्या संघाने स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिला सामन्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विरुध्द ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात योगेश राऊत ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. दुसऱ्या सामन्यात यजमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठावर २६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात संदीप चौधरी ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. तिसऱ्या सामन्यात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचा ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात पुष्कर तऱ्हाळ ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत साखळी फेरीतील अजेय घोडदौड नंतर आरोग्य विद्यापीठाचा सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुध्द झाला. नाशिकच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले होते. कोल्हापूरच्या संघाने हे लक्ष्य १९.५ षटकांत ८ बाद १५८ धावा करत गाठले. केवळ २ गडयांनी विजय मिळवत कोल्हापूरने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यापीठाच्या संघातील पुष्कर तऱ्हाळ यांना मालिकेतील ’सर्वोत्तम गोलंदाज’ म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेतील येशात गोलंदाजीचा मोलाचा वाटा आहे. पुष्कर तऱ्हाळ यांनी आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना स्पर्धेतील ’बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट’ (सर्वोत्तम गोलंदाज) या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या क्रिकेट संघात संघव्यवस्थापक राजेश पाटील व कर्णधार योगेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुष्कर तऱ्हाळ, संदीप चौधरी, पवन गोलवाल, राजेंद्र दिवे, प्रविण जगताप, महेंद्रनाथ चौधरी, नंदकिशोर ठाकरे, नंदकिशोर वाघ, विजय कुरकुरे, संतोष जढाळ, बबन कांगणे, सचिन शिराळ, मुकुंद मुळे आदी खेळाडू आहेत. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे विद्यापीठ परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.
डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवण्यासाठी धावतोय एक ध्येयवेडा तरुण विशाख कृष्ण स्वामी सलग ३७० दिवस दररोज ४२ किलोमीटर धावण्याचा करणार रेकॉर्ड कल्याण : डोंबिवलीतील विशाख कृष्ण स्वामी हा धावपटू आता पर्यन्त धावण्याचे बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. यावेळेस तो दररोज तो ४२ किलोमीटर सलग ३७० दिवस धावून जागतिक रेकॉर्ड पार करणार आहे. विशाख कृष्णस्वामी हा एक सामान्य डोंबिवलीकर असून त्याला धावण्याचे वेड आहे. आता पर्यंत राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत त्याने अनेक रेकॉर्ड केलेत. मात्र आता त्याला यावेळेस एक मोठा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. तो दररोज ४२ किलोमीटर सलग ३७० दिवस धावणार आहे. ६३ दिवस झाले असून वर्ल्ड रेकॉर्ड मुळे तो महाराष्ट्राचे आणि डोंबिवली चे नाव जगात मोठं करणार आहे ही त्याची जिद्द आहे. विशाख कृष्ण स्वामी हा एका सामान्य कुटुंबातला आहे. त्याला लहानपणापासून खेळाची जास्त आवड असल्यामुळे आता डोंबिवलीकर त्याला सपोर्ट करत आहेत.
‘साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ?’ विषयावर जळजळीत लेखन स्पर्धा कल्याण : सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक विचारप्रवर्तक आणि जळजळीत लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ‘साहित्यिक म्हणजे कोण रे…
बिर्ला कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न कल्याण : बी.के. बिर्ला कॉलेजमधील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाने ऊर्जा-३ या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. दोन दिवसांच्या या क्रीडा महोत्सवात वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील १,५९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. अनिल तिवारी आणि क्रीडा संचालक डॉ. वाय.डी. बागराव, प्रा. रोहिणी पाटील, दर्शन फुले यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी बॉक्स क्रिकेट मैदान, लांब उडी पिट, शॉट पुट आणि डिस्कस थ्रो यासारख्या नवीन क्रीडा सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि फ्री फायर सारख्या एकाग्रता वाढवणाऱ्या खेळांमध्ये भाग घेतला. दुसऱ्या दिवशी, त्रिस्तरीय दौड़ स्पर्धा, लांब उडी, शॉट पुट, टग ऑफ वॉर, कॅरम, बॅडमिंटन, बीजीएमआयई क्रीडा आणि इतर खेळांचे आयोजन करण्यात आले. या काळात ‘फन स्टॉल’ देखील विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले. बिर्ला कॉलेज गेल्या दशकापासून क्रीडा क्षेत्रात सतत नवीन उंची गाठत आहे. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी बॉक्सिंग आणि कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणि फ्रान्स आणि जर्मनीमध्ये योगा आणि रग्बीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली उपस्थिती दर्शविली आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ.आर. चितलांगे यांचे सहकार्य, डॉ. नरेश चंद्र यांचे प्रोत्साहन आणि प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांचे सहकार्य नेहमीच उपलब्ध असते. विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक अनेक आधुनिक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.