Category: युटूब

समाजमाध्यमावरील दागिन्यांच्या छायाचित्रावरून चोरीची उकल

– घरकाम करणाऱ्या महिलेला अटक मुंबई : चोरीच्या दागिने घातलेले छायाचित्र समाज माध्यमांवर अपलोड केल्यामुळे चोरीची उकल करण्यात खार पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिलेने खार परिसरातील एका व्यावसायिक महिलेच्या घरात सुमारे ३४ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिमा नागेंद्र निशादला (२०) खार पोलिसांनी अटक केली. पांचाली ठाकूर (५७) या भावासोबत खार परिसरात राहातात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर तिचे वयोवृद्ध आई-वडिल राहत असून त्यांच्याकडे पाच नोकर आहेत. तिच्या आईच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी महिमा निशाद हिला ठेवले होते. महिमा ही मुळची उत्तर प्रदेशमधील गोरखपूरची रहिवाशी असून सध्या ती सांताक्रुज येथील वाकोला, आनंदनगर परिसरात राहत होती. एप्रिल २०२३ पासून ती त्यांच्याकडे कामाला होती. तिच्या आईच्या खोलीत एक लॉकर असून तो उघडण्यासाठी पासवर्डचा वापर करावा लागतो. गरजेच्या वेळी पासवर्ड आठवत नसल्याने तिला एक चावी देण्यात आली होती. या लॉकरमध्ये तिने तिचे सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवली होते. या चावीसह पासवर्डची महिमाला माहिती होती. लक्ष्मीपूजनच्या दिवशी १ नोव्हेंबर रोजी पांचाली आईकडे दागिने घेण्यासाठी गेली होती. मात्र तिला लॉकर उघडता आला नाही. तिला लॉकरची चावीही सापडली नाही. अखेर तिने दुसऱ्या चावीने लॉकर उघडले असता तेथील ३४ लाख २३ हजार रुपयांचे विविध सोन्याचे, चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपयांची रोख असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. महिमाने ८ नोव्हेंबर रोजी व्हॉटस् ॲपवर अपलोड केलेले एक छायाचित्र पांचालीच्या निदर्शनास आले. त्यात महिमाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि उजव्या हातातील अंगठी पांचालीच्या आईची असल्याचे दिसले. तिच्या घरी महिमानेच चोरी केल्याची खात्री पटताच ८ नोव्हेंबर रोजी पांचालीने खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीनंतर महिमाविरोधात पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी महिमाला अटक केली.

रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई, २५० किलो फटाके जप्त

  मुंबई : पालिकेने गेल्या पाच दिवसांत रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात एकूण २५० किलो फटाके जप्त केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. दिवाळीनिमित्त मुंबईत…

विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी नवी मुंबईत विविध माध्यमांतून आवाहन

नवी मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी होणा-या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नवी मुंबईतील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्याच्या दृष्टीने स्वीप अर्थात मतदार जागरूकता कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. या अंतर्गत आज दिघा येथील नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 108 मध्ये विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व सांगत त्यांच्यामार्फत आई-बाबा व कुटूंबिय आणि शेजारी यांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्याचे सांगण्यात आले. तसेच नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 113, महापे येथेही मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो या विषयावर रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमार्फत मतदानाचा संदेश प्रसारित केल्याने त्यांना मतदानाचे महत्व कळतेच शिवाय त्यांच्यामार्फत त्यांच्या आईवडिलांपर्यंत तसेच परिचितांपर्यंत मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचा संदेश पोहचतो. नेरूळ विभागात सेक्टर 29 येथील दैनंदिन बाजारामध्ये मतदार जनजागृती पथकाने भेट देत तेथील व्यावसायिक आणि ग्राहक यांच्याशी संवाद साधत त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याविषयी सांगितले, तसेच याठिकाणी मतदान करणेबाबत सामुहिक शपथही ग्रहण करण्यात आली. अशाच प्रकारे वाशी विभागात सेक्टर 15 ए येथील कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात मॉडर्न महाविद्यालय वाशी येथे वर्गावर्गांमध्ये जाऊन युवकांशी संवाद साधण्यात आला व त्यांना मतदानाचे महत्व विशद करण्यात आले. पहिल्यांदाच मतदान करणा-या तरूणांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. त्यांच्यामार्फत त्यांच्या घरी तसेच परिसरातील व संपर्कातील नागरिकांनाही संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याविषयी आवाहन केले जावे असे सूचित करण्यात आले. वाशी हायवे बसथांब्यावरील प्रवाशांमध्येही मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. उद्यानांमध्ये जॉगींगसाठी येणा-या नागरिकांसह तेथील कर्मचा-यांसह मतदानाविषयी शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे नेरूळ, वाशी व तुर्भे विभाग कार्यालयांमधील कर्मचारी तसेच विभाग कार्यालयांना भेट देणारे नागरिक यांनी एकत्रितपणे मतदानाची शपथ ग्रहण केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नमुंमपा क्षेत्रातील 150 व 151 या दोन विधानसभा मतदारसंघाकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा वाशीचे विभाग अधिकारी सागर मोरे व ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी तथा उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे – पाटील यांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे,  नेरूळ विभाग अधिकारी जयंत जावडेकर, तुर्भे विभाग अधिकारी बोधन मवाडे, दिघा विभाग अधिकारी भरत धांडे, कोपरखैरणे विभाग अधिकारी सुनिल काठोळे यांनीही आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सहभाग घेतला. ००००

काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याच्या  निषेधार्थ  आरपीआय आठवले गटाच्या वतीने शुक्रवारी मुंबईत आझाद मैदानात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष संजय पवार,जिल्हा सरचिटणीस शिरीष चिखलकर, जिल्हा उपाध्यक्ष…