Category: क्रीडा

महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपला

महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपला पुण्यात खो-खो परिवारातर्फे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली क्रीडा विश्वावर दुःखाचा डोंगर पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके लोकनेते व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपल्याची भावना प्रत्येक मैदानातून व्यक्त होत असून, खो-खो परिवाराने पुण्यात आयोजित केलेल्या शोकसभेत ही हानी शब्दातीत असल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. भावपूर्ण शोकसभा : आठवणींनी दाटलेले क्षण पुण्यात पार पडलेल्या या विशेष शोकसभेत राज्यभरातून आलेले क्रीडा संघटक, प्रशिक्षक, पंच, खेळाडू व पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. खेळाडूंचे कैवारी, शिस्तप्रिय नेतृत्व मनोगत व्यक्त करताना वक्त्यांनी दादांची खेळाप्रती असलेली ओढ, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि निर्णयक्षमता अधोरेखित केली. “दादा शब्दाला जागणारे होते; एकदा शब्द दिला की काम पूर्ण,” असा अनुभव अनेकांनी सांगितला. खो-खो खेळाला आधुनिक स्वरूप देत त्याला व्यावसायिक उंचीवर नेण्यात दादांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद झाले. निधी, सुविधा आणि थेट संवाद राज्यातील क्रीडा संकुले, मैदाने, स्पर्धा व खेळाडूंसाठी निधी उपलब्ध करून देताना दादांनी कधीही आखडता हात घेतला नाही. सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रायगड आदी जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी अडचणीच्या काळात दादांनी मोठ्या भावाप्रमाणे मदतीचा हात दिल्याच्या आठवणी सांगितल्या. मैदानावर थेट येऊन खेळाडूंशी संवाद साधण्याची त्यांची शैली सर्वांच्या मनात कोरली गेली. महिला खेळाडूंना बळ महिला खेळाडूंना संधी, सन्मान आणि नेतृत्वाच्या पातळीवर पुढे आणण्यात दादांचे योगदान मोलाचे असल्याचे रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या प्रतिनिधींनी नमूद केले. “महिलांना विश्वासाने पुढे नेणारा नेता आज आपल्यात नाही,” ही भावना सर्वत्र उमटली. न भरून निघणारी हानी…

भिडले, नडले आणि मग हरले..

भिडले, नडले आणि मग हरले.. नेपाळ अवघ्या ४ धावांनी इंग्लंडविरुध्द पराभूत स्वाती घोसाळकर मुंबई – अरबी समुद्रांच्या उसळणाऱ्या उंच लाटांपेक्षाही उत्तुंग उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या नेपाळच्या पाठीराख्यांच्या समोर नेपाळ बलाढ्य इंग्रजांना भिडले……

 डोंबिवलीत प्रथमच पार पडली १२ तास स्टेडियम रन

डोंबिवलीत प्रथमच पार पडली १२ तास स्टेडियम रन रनर्स क्लॅन फाऊंडेशनचा यशस्वी उपक्रम डोंबिवलीच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय कल्याण : रनर्स क्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने प्रथमच १२ तास स्टेडियम…

  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड टेनिस क्रिकेट फेडरेशनच्या माध्यमातून मुलांचे क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकार होणार – डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे…

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा युवा खेळाडू विवांश घोषचे शानदार यश मुंबई : नुकत्याच मरीन लाईन्स येथील विद्यापीठ क्रीडा संकुलात झालेल्या “चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो” स्पर्धेत युवा तायक्वांडोपटू विवांश घोषने शानदार यश…

अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे पुण्यात शोकसभा

अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे पुण्यात शोकसभा मुंबई, दि. ६ फेब्रुवारी – महाराष्ट्राचे क्रीडा नेतृत्व, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने क्रीडा प्रेमी, कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा हक्काचा आधार असलेला नेता गमावला आहे. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे रविवार, ८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता नु. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आप्पा बळवंत चौकाजवळ, बाजीराव रोड, पुणे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस खो-खो परिवारातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पुरस्कार्थी, क्रीडा संघटक, खो-खो प्रेमी व सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले आहे.

श्री माँ विद्यालयात आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग्ज स्पर्धा संपन्न

श्री माँ विद्यालयात आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग्ज स्पर्धा संपन्न ठाणे : श्री माँ विद्यालय, ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा, ठाणे (पश्चिम) येथील श्री माँ स्टेडिअमच्या भव्य प्रांगणात एकविसावी आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाणे परीसरातील बहुसंख्य विद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली होती. या स्पर्धेत नामांकित शाळांनी चित्रकलेतील निपुण विद्यार्थी स्पर्धेसाठी पाठविले होते. चित्रकला स्पर्धेत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी रंगी-बेरंगी चित्र चितारुन आपले कौशल्य प्रकट केले. तसेच सुंदर पोस्टर पेंटिंग सादर केलेत. या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाना १०००, ८५०, ७०० रोख रक्कमेची बक्षीसे आणि ३०० रु. ची प्रोत्साहनात्मक १० बक्षीसे देण्यात आलीत. या स्पर्धेसाठी २२ शाळांमधील जवळ जवळ १४०० मुलांचा सहभाग होता. या कार्यक्रामात श्री माँ ग्रुफ ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन श्री बालगोपाल, श्रीमती चित्रा अय्यर, प्रिन्सीपॉल श्रीमती मिनी नायर, श्रीमती मेघना वांगे, श्रीमती रमा अनंतरामन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत

दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत एम बी ए फाऊंडेशन अव्वल ठाणे: लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि  ज्युपिटर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत एम बी ए फाऊंडेशन संस्थेने बाजी मारली. एन के टी सभागृहात जुन्या संमिश्र गाण्यांवर पार पडलेल्या या नृत्य स्पर्धेत १३ शाळांमधील सुमारे १३० हून अधिक विशेष विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ तरल नागडा यांच्या संकल्पनेतून ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेचे यंदा ११ वे वर्ष होते. झवेरी ठाणावला कमलिनी कर्णबधिर स्कूलच्या चमूने दुसरा तर विश्वास सेंटरने तृतीय स्थान संपादन केले. विशेष मुलांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. दिवसोदिवस या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समाजात या मुलांना स्वीकारण्याची भावना वाढीस लागल्याचे लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष प्रसाद खोपकर यांनी सांगितले. सर्वश्री डॉ जुई मांडके आणि दिप्ती नायर यांनी यावेळी परिक्षक म्हणून काम पाहिले. लायन्स क्लबचे माजी जिल्हा गव्हर्नर राकेश चौमाल, लिओ क्लबच्या जिल्हा गव्हर्नर शिवानी शाह आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा ग्रीष्मा इंदप यांनी आभार प्रदर्शन केले.

कल्याणामध्ये रंगणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’  शरीरसौष्ठव स्पर्धा

कल्याणामध्ये रंगणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’  शरीरसौष्ठव स्पर्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विजय साळवी यांच्या आयोजनाखाली होणार भव्यदिव्य स्पर्धा कल्याण : हिंदुस्तानातील तमाम हिंदुप्रेमी नागरिकांचे आराध्य दैवत असणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण शहर शिवसेना शाखेने शरीर सौष्ठव स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केले आहे. या स्पर्धेत कोण होणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’ चा मानकरी हे पाहणे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवसेना उपनेते विजय साळवी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण शहर शाखा यांच्या वतीने “हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा शुक्रवार ६ फेब्रुवारीला  सायंकाळी ६ वाजता कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) संतोषी माता मंदिर रोड, कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेस ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनची मान्यता आहे. या स्पर्धेला कल्याणकर क्रीडाप्रेमींनी व खेळाडूंनी तसेच निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, कल्याण पश्चिम व मुरबाड जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, कल्याण पश्चिम शहरप्रमुख बाळा परब, कल्याण पश्चिम विधानसभा संघटक किशोर शुक्ला आदींनी केले आहे.

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानशिवाजी पार्क, दादर येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड हॉलमध्ये ३३ व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी (५० वर्षावरील ), महिला वयस्कर एकेरी (५० वर्षावरील), आंतर कचेरी व आंतर क्लब अशा एकंदर सहा गटांमध्ये हि स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल. मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या क्लब मार्फत नावे स्वीकारली जाणार असल्याने खेळाडूंनी त्वरित आपल्या क्लबशी संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, मुंबई येथे उपलब्ध असून दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान नावे स्वीकारली जातील. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.