नाशिक जिल्ह्यात १५ लाख बहिणी लाडक्या
९५ टक्के महिला मतदारांचे योजनेसाठी अर्ज, ७९ हजार अपात्र हरिभाऊ लाखे नाशिक : लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबरला संपली असून, जिल्ह्यात एकूण १५ लाख ७४ हजार ४०९…
अवैध मद्य विक्री प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
दहा दिवसांत ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त साठ आरोपींना अटक योगेश चांदेकर पालघरः विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातून होणारी अवैध मद्याची वाहतूक, निर्मिती आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ४३ लाख २८ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या दहा दिवसांत ७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सीमावर्ती राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या शेजारी जिल्ह्यांतून येणाऱ्या मद्याची वाहतूक, निर्मिती व वाहतूक साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आंतरराज्यातील अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आज एक लाख वीस हजार सातशे वीस रुपयांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे. मद्याचे ७२ बॉक्स संबंधितांकडून ताब्यात घेतले. यांनी केली कारवाई ही कारवाई दादरा नगर हवेलीचे उत्पादन शुल्क निरीक्षक रेहान तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डहाणू येथील निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, संभाजी फडतरे आदींनी केली. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक तारखेपासून दहा दिवसांत उत्पादन शुल्क विभाग भलता सक्रिय झाला असून, अवैध मद्याची वाहतूक, निर्मिती, साठवणूक आदी प्रकरणी या विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दहा दिवसांत या प्रकरणी ७७ गुन्हे दाखल झाले असून ६० जणांना अटक करण्यात आली आहे. सात वाहने जप्त करण्यात आली आहेत. निवडणूक काळात जातीने लक्ष उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, कोकण विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, पालघर येथील उत्पादन शुल्क विभागाचे उपाध्यक्ष बी एन भुतकर यांच्या मार्गदर्शकाखाली ही कारवाई करण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्य राज्यातून अवैध मद्य, बोगस मद्य मोठ्या प्रमाणात येत असते. विशेषतः दीव-दमणचे मद्य महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात येत असल्याने उत्पादन शुल्क विभाग कारवाईसाठी सज्ज झाला आहे. कोट ‘विधानसभेची निवडणूक, मतदान आणि मतमोजणी या काळात राज्य उत्पादन शुल्क विभाग आंतरराष्ट्रीय कारवाया सुरू ठेवणार आहे. – सुधाकर कदम, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पालघर
हरियाणामध्ये भाजपची हॅट्रिक;
एक्झिट पोलची ‘एक्झिट’ चंढीगड : एक दोन नव्हे तर विविध संस्थानी केलेल्या तब्बल १२ एक्झिट पोलमध्ये भाजापाचा पराभव दाखविला जात असताना आज मोदीं है तो मुमकीन हैची जादू हरिणायात पुन्हा पहायला मिळाली. भाजपाने…
ओबीसीप्रमाणे एससी, एसटीलाही क्रिमीलेअरचा निकष लागू होणार
नवी दिल्ली- आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना क्रिमीलेअरचे निकष लागू होते. त्यानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ओबीसी प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. आता हेच निकष एससी आणि एसटी प्रवर्गासाठीही लागू…
जेईई आणि नीट प्रशिक्षण कोर्सेससाठी १ कोटी – पालकमंत्री उदय सामंत
अशोक गायकवाड रत्नागिरी शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राप्रमाणेच जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांकरिता प्रशिक्षण कोर्सेस सुरु करावेत, त्यासाठी १ कोटी रुपये दिले जातील, अशी…
पत्रकारिता आणि मानवी हक्क अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु
रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सुरु असणाऱ्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) आणि मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रम या अभ्याक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १ जुलै २०२४ पासून…
ठाणे रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग घ्यावा व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे अशी जनजागृती आज ठाणे रेल्वेस्थानकावरील प्रवासी मतदारांमध्ये करण्यात आली. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१४ मे) ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले. यावेळी १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ स्वीप पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात युवावर्ग,स्त्री -पुरुष ,दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता. ठाणे शहरात २० मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचे आणि लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन स्वीप पथकाने केले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिक हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रावर कोणताही त्रास होवू नये यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे त्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोणत्याही शंका, स्पष्टीकरण आणि तक्रारींसाठी नागरिक 1950 वर कॉल करून आपल्या शंकाचे निरसन करु शकतात असेही यावेळी सांगण्यात आले. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन करीत उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.
रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ पूर्ण
रत्नागिरी : अशोक गायकवाड रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार असून, यासाठी प्राप्त मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण राहुल यादव…
ईदच्या मुहूर्तावर ‘अमीना’ प्रदर्शित होणार
रमेश औताडे मुंबई :राज कुमार प्रॉडक्शन्स सध्या आपला आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अमीना’ मुळे चर्चेत आहेत. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता जो…