Category: विशेष लेख

पायाभूत क्षेत्रात १७ लाख कोटींची गुंतवणूक

पायाभूत क्षेत्रात १७ लाख कोटींची गुंतवणूक देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आणि खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने अर्थ मंत्रालयाने एक मोठी घोषणा केली. मंत्रालयाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत 17…

इंडियन आर्मी डे

इंडियन आर्मी डे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. देश स्वातंत्र्य करण्यासाठी लाखो ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. हजारो, लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर…

यंदाचा हंगाम अधिक अडचणीचा

यंदाचा हंगाम अधिक अडचणीचा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ऊस शेती आणि साखर कारखाने हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. साखरेचा वाढलेला उत्पादनखर्च, पावसामुळे घटलेले उसाचे उत्पादन, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार आणि कर्जाचे…

स्टीलच्या किमतीत कंपन्यांच्या संगनमताने अनैतिक वाढ

स्टीलच्या किमतीत कंपन्यांच्या संगनमताने अनैतिक वाढ भारतातील स्टीलच्या किमती बाजारातील चढउतारांमुळे नव्हे, तर काही प्रमुख कंपन्यांमधील कथित संगनमतामुळे वाढल्या होत्या. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) केलेल्या एका मोठ्या तपासात टाटा स्टील,…

राष्ट्रीय भूगोल दिन

आज १४ जानेवारी, आजचा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो हे खूपच कमी लोकांना माहित आहे. भूगोल हा विषय आपण लहान वयापासूनच शिकत आलो असूनही भूगोलाचे…

गृहविक्रीमध्ये घट, बांगलादेशचे सावट

गृहविक्रीमध्ये घट, बांगलादेशचे सावट सरत्या आठवड्यामध्ये अर्थनगरीत नेहमीच्याच क्षेत्रांमधील घडामोडींचा बोलबाला होता. त्यातल्या त्यात निवासी मालमत्तांच्या विक्रीत घट अनुभवायला मिळाली. दरम्यान, बांगलादेशमधील संकटाने अर्थविश्वात काही पडसाद उमटले. याच सुमारास तीन…

विझू न देण्याची जिद्द: क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम”

विझू न देण्याची जिद्द: क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम” हेमंत ढोमे लिखित व दिग्दर्शित “क्रांतिज्योती विद्यालय  मराठी माध्यम” हा चित्रपट थेट प्रेक्षकांच्या मनाला हात घालतो आणि विचार करायला भाग पाडतो. अवघ्या १ तास ४९ मिनिटांच्या कालावधीत हा चित्रपट मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठीतून शिक्षण घेऊन घडलेल्या पिढीचा ठोस, वास्तववादी आणि प्रभावी आरसा उभा करतो. २०२६ च्या सुरुवातीलाच हा चित्रपट आला  आणि मराठी माध्यमाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली. कथा चित्रपटाची कथा अलिबागजवळील नागाव येथील क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम या ९० वर्षे जुन्या शाळेभोवती फिरते. काळाच्या ओघात आणि खोट्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे ही शाळा बंद करून त्या जागी ‘इंटरनॅशनल स्कूल’ उभारण्याचा डाव आखला जातो. शाळेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. या संकटसमयी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के गुरुजी आणि माजी विद्यार्थी बबन शाळेच्या जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र आणतात. सुरुवातीला ही लढाई थोड्या विनोदी, हलक्याफुलक्या पद्धतीने सुरू होते; मात्र जसजशी गोष्ट पुढे सरकते, तसतशी ती गंभीर व विचारप्रवर्तक बनते. पुढे  काय होते त्यासाठी चित्रपट बघण्यास जा . दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी कमी कालावधीत भरपूर आशय मांडला आहे. अनावश्यक मेलोड्रामा टाळत त्यांनी पात्रे आणि कथावस्तू यांवर ठाम भर दिला आहे. कलाकारांकडून संयमी पण प्रभावी अभिनय करून घेतला आहे. “आपल्या मराठी भाषेची लाज वाटते… या पृथ्वीवर कदाचित पहिलीच जमात असेल तिला  आपल्या आईची लाज वाटते” किंवा“छापखाना आणि कारखान्यात फरक असतो; कारखान्यात माणसं घडतात”असे संवाद थेट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात.एक वेगळं ऊर्जा ,नवं चैतन्य चित्रपट गृहात बघण्यास मिळते. अभिनय अमेय वाघ याचा बबन हा संपूर्ण चित्रपटाचा कणा आहे. आगरी बोलीतील ही त्याची पहिली भूमिका असून ती अत्यंत प्रभावी झाली आहे.पाजक्ता कोळी अंजली या संशोधकाच्या भूमिकेत शांत, विचारशील आणि शाळेची हुशार विद्यार्थी  आहे . पहिला मराठी चित्रपट असूनही तिचा अभिनय सहज वाटतो. क्षिती जोग सलमा हसीना अंतुले या केंद्र सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेत ठामपणे लक्ष वेधून घेतात.हरीश दुधाडे राकेश या वकील आणि शेतकऱ्याच्या भूमिकेत जमिनीशी जोडलेली मूल्यं प्रभावीपणे मांडतात.कादंबरी कदम आणि पुष्कराज चिरपुटकर दुबईतील यशस्वी व्यावसायिक असूनही आपल्या शाळेची ‘क्रांतिज्योती’ विझू न देण्याची जिद्द ठसठशीतपणे व्यक्त करतात.या सगळ्यांच्या केंद्रस्थानी सचिन खेडेकर मुख्याध्यापक दिनकर शिर्के म्हणून उभे राहतात. त्यांच्या संयमी , ठाम आणि भारदस्त अभिनयामुळे ही क्रांतिज्योती अधिक तेजाळते. निर्मिती सावंत नार्वेकरबाईंच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे सहजसुंदर वाटतात. शिक्षणमंत्री म्हणून जितेंद्र जोशी लक्षात राहतात. तांत्रिक बाजू/गीत हर्ष-विजय यांचं संगीत कथेला योग्य साथ देतं. ईश्वर अंधारे यांची गीतं आशयाला साजेशी आहेत. पार्श्वसंगीत कुठेही आक्रस्ताळं किंवा अनावश्यक वाटत नाही. सत्यजीत शोभा श्रीराम यांचं छायांकन वास्तवदर्शी आहे. शाळेचे वर्ग, मैदान आणि परिसर आपलेसे वाटतात. भावेश तोडणकर यांचं संकलन विषयाच्या गांभीर्याशी सुसंगत आणि संतुलित आहे चित्रपट संपल्यानंतर मराठीतून शिक्षण घेऊन घडलेल्या व्यक्तींची नावं, हुद्दे आणि चेहरे पडद्यावर झळकतात. तेव्हा प्रेक्षक स्वतःलाच प्रश्न विचारतो आपण कोणत्या शाळेत शिकलो? त्या शाळेने आपल्याला काय दिलं? आणि आज आपण आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत का घालत नाही? “क्रांतिज्योती विद्यालय –मराठी माध्यम” हा केवळ चित्रपट नाही, तर मराठी भाषा आणि शिक्षणाविषयीची एक शांत पण ठाम क्रांती आहे. संपदा सावंत

पायावर कानाचे रोपण…

श्याम तारे हे छायाचित्र बनवलेले आहे असे तुम्हाला वाटले असेल परंतु ही छायाचित्र अगदी खरे आहे आणि एका रुग्णावर अशी शस्त्रक्रिया करावी लागण्याचा प्रसंग घडला आहे. ही अतिशय महत्वाची शस्त्रक्रिया…

‌‘शंख एअरलाईन्स‌’ पुढच्या महिन्यात हवाई सेवेत

‌‘इंडिगो‌’च्या अलीकडील संकटानंतर, सरकारने तीन एअरलाइन्सना ऑपरेटिंग परवाने दिले आहेत. यापैकी एका एअरलाइन्सची ऑपरेशनल तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‌‘शंख एअरलाइन्स‌’ जानेवारीच्या पहिल्या सहामाहीमध्ये तीन एअरबस विमानांच्या सुरुवातीच्या ताफ्यासह ऑपरेशन…

दारूला पर्याय दुधाचाच

दोन दिवसांपूर्वीच संपूर्ण जगाने नववर्षाचे उल्हासात स्वागत केले. महाराष्ट्र देखील तिथे मागे नव्हता. मुंबईच्या चौपाटीपासून तर थेट इकडे गडचिरोली आणि तिकडे रत्नागिरी पर्यंत सर्वत्र नागरिकांनी जल्लोष करत सरत्या वर्षाला निरोप…