मंत्रालयाच्या उपहारगृहात बजावली सेवा मुंबई : रविंद्र यशवंत नागे, पर्यवेक्षक हे मंत्रालय उपहारगृहामध्ये सन १९८२ साली वेटर या पदावर रुजू झाले व सन १९८४ पासून विधान भवन उपहारगृहामध्ये कार्यरत आहेत. विधान भवन दुसरा मजला उपहारगृह व वातानुकुलीत उपहारगृहांतर्गत पीठासीन अधिकारी, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, प्रधान सचिव, सचिव, सर्व समिती प्रमुख, सर्व समित्या, विधीमंडळ आणि मंत्रालय अधिकारी, परदेशी शिष्टमंडळे, पिठासीन अधिकारी यांच्या बैठका, मंत्रीमंडळांच्या बैठका, मंत्री महोदयांच्या दालनातील बैठका, अतिमहत्वाच्या व्यक्तींकडे राज्यातून विधान भवनामध्ये येणारे अभ्यांगत यांच्यासाठी विधान भवन २ रा मजला उपहारगृहातून खाद्यपदार्थ, पेय, आहार, अल्पोपहाराची सेवा पुरविण्यात येते. विधान भवन उपहारगृहातील सर्व कामे सहकारी कर्मचारी यांच्याकडून खेळीमेळीच्या वातावरणात करुन घेण्याची कला रविंद्र नागे यांना चांगल्याप्रकारे अवगत आहे. अधिवेशन कालावधीत कामाचा कितीही ताण असला तरी पूर्णत्वास नेण्याकरीता श्री. रविंद्र नागे नेहमीच परिश्रम घेत असतात. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये चौरस आहारगृहातर्फे हैद्राबाद हाऊस उपहारगृह, विधान भवन उपहारगृह तसेच राजगृह उपहारगृह चालविण्यात येत असतात. सर्व कामांकडे श्री. रविंद्र नागे बारकाईने लक्ष ठेवून असतात, वेळप्रसंगी प्रत्येक उपहारगृहाला भेट देवून खाद्यपदार्थांचा आढावा घेणे तसेच काही मदत लागल्यास आवर्जून ती पूर्ण करणे हीबाब त्यांची अतिशय उल्लेखनीय अशी आहे. दि. ३१ जुलै, २०२५ रोजी श्री. नागे हे शासकीय सेवेतुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजेच हिवाळी अधिवेशन हे त्यांच्या सेवेचे नागपूरचे शेवटचे अधिवेशन आहे. रविंद्र नागे यांच्या देखरेखीखाली पर्यवेक्षक, आचारी व वेटर हे उकृष्टरित्या तयार झाले असून उपहारगृहाचे कामकाज उत्तरित्या सांभाळण्यास सक्षम झालेले आहेत. रविंद्र नागे यांचे सहकारी मणिलाल मोर्बेकर, जनार्दन मोरे, प्रकाश कोळी, गोपाल पुजारी, सहदेव पवार, किसन मराडे हे सुध्दा सन २०२५ मध्ये शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. उपहारगृहाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रविंद्र नागे व त्यांचे सहकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. 00000