Category: होम

नमुंमपा मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अॅम्फीथिएटर येथे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार व श्री. शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता श्री. अजय संखे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मतदान जनजागृतीसाठी दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयाच्या तर्फे विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माथेरानमध्ये पाणी पुरवठा समाधानकारक

जल प्राधिकरणाच्या पाणी नियोजनामुळे माथेरान : माथेरान मध्ये मागील काही दिवसांपासून गर्मीने डोके वर काढले असताना माथेरानला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत या तलावात असणारे पाणी माथेरान पर्यटन नगरीला पिण्याकरता पुरवठा केला जातो व हे पाणी कमी पडत असल्याने नेरळ येथून पंपिंग द्वारे माथेरानला जादाचा पाणीपुरवठा करण्यात येतो त्यामुळेच या पर्यटन हंगामामध्ये माथेरान कराना पाणी टंचाईस सामोरे तर जावे लागणार नाही ना याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे परंतु जल प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सूनियोजित नियोजनामुळे पाणीटंचाई सध्या तरी जाणवत नसल्याने सर्वत्र समाधान होत आहे. काही वर्षांपूर्वी माथेरान मध्ये या तलावातून पूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे व एन पर्यटन हंगामामध्ये येथे भीषण पाणीटंचाई सामोरे जावे लागत असेल परंतु नेरळ येथून माथेरान करतात जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर माथेरानकरांनी पाणीटंचाईपासून मुक्तता झाली होती परंतु मे महिन्याच्या शेवट शेवटला मात्र पाणीटंचाई सामोरे जावे लागते परंतु यावर्षी नेरळ येथून होणार पाणीपुरवठा समाधानकारक असल्याने  व शालेय मध्ये मुबलक पाणीसाठा सध्या  उपलब्ध असल्याने  माथेरानकरांना अजून तरी पाणी टंचाईस सामोरे जावे लागलेले नाही परंतु जल प्राधिकरणाने नेरळ येथून होणाऱ्या पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या  पंपांची दुरुस्ती योग्य प्रकारे करून ठेवल्यास मे महिन्यामध्ये होणाऱ्या पाणीटंचाई पासून माथेरान करांना दिलासा निश्चित मिळणार आहे. माथेरान मध्ये मे महिन्यामध्ये पूर्वी होणारी पर्यटकांची गर्दी मागील काही वर्षांमध्ये कमी झाल्याने पाण्याचा वापर  ही कमी झाला आहे  त्यामुळे या दिवसांमध्ये माथेरान करांना पाणीटंचाई जाणवत नाही परंतु काही भागांमध्ये मात्र पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत असतात जल प्राधिकरणाने दोन महिने आधीपासूनच प्रत्येक सोमवार व मंगळवार या दोन दिवशी विविध भागात पाणी पुरवठा बंद केला असल्याने सध्या माथेरान मधील तलावात पाणी उपलब्ध आहे त्यामुळेच येणाऱ्या पर्यटन हंगामात माथेरानकरांना पर्यटन हंगाम असाच राहिला तर पाणी टंचाई सामोरे जावे लागणार नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठाण्यात विविध ठिकाणी होणार प्रात्यक्षिके

अग्निशामक दल सेवा सप्ताहाचे आयोजन ठाणे :अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून रविवारी सकाळी करण्यात आला. त्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त  प्रशांत रोडे यांनी बाळकूम अग्निशमन केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केले. या प्रसंगी ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त (अग्निशमन विभाग) दिनेश तायडे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदी उपस्थित होते. याचवेळी, महाराष्ट्र फायर सर्व्हीस असोसिएशनच्या देणगी पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई बंदरात १४ एप्रिल, १९४४ रोजी लागलेल्या आगीत अग्निशमन जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने १४ एप्रिल ते २१ एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात, विविध आस्थापना, सोसायटी येथे अग्निसुरक्षेबाबतची प्रात्यक्षिके करण्यात येतील.

कल्याण लोकसभा क्षेत्रात ख्रिश्चन समाजासाठी ‘ख्रिश्चन भवन’-डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण  : ‘ख्रिश्चन एकता सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी, तसेच फादर्सनी  माझी भेट घेत कल्याण लोकसभा क्षेत्रात ख्रिश्चन समाजासाठी ‘ख्रिश्चन भवन’ उभारण्यासह अन्य मागण्या मांडल्या. त्यावर ख्रिश्चन समाजाशी सकारात्मक चर्चा केली. या सर्व…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्याधिकारी वैभव गारवे यांचे अभिवादन

अशोक गायकवाड कर्जत : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी रविवारी,(दि.१४) नगरपरिषद कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथिल घराबाहेर काल पहाटे दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील…

अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात

 हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई : आपल्याला पाळीव श्वानाची हत्या करणाऱ्या काळजीवाहकाविरोधातील खटला गेली चार वर्षे प्रलंबितआहे. त्यामुळे, तो लवकरात लवकर निकाली काढून आपल्या श्वानाला न्याय मिळवून द्यावा,…

 ‘मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी’

राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसे अखेर महायुतीच्या प्रचारात मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सातत्याने भूमिका बदलते, अशी काहींनी टीका केली. मात्र आम्ही भूमिका बदलली नसून मुद्द्यांवर बोलत आहोत. काविळ…

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने ठाणे कोर्ट नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनुयायांनी मेणबत्या प्रज्वलित करून अभिवादन केले यावेळी अनुयायांमध्ये उत्साहाचे…