Category: होम

देश आता भुलणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमची जादू संपलेली आहे – डॉ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : ‘लोक काय खातात; शाकाहार की मांसाहार ? याचा अर्थ दहा वर्षांत तुम्ही काहीच करू शकला नाहीत. आता शेवटचे अस्र तुमच्याकडे उरले आहे, ते म्हणजे हिंदू विरूद्ध…

विविध उपक्रमांचा मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी चांगला उपयोग-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. पथनाट्य, प्रभात फेरी आदी द्वारे नागरिकांमध्ये मतदानासाठी प्रेरित केले जात आहे, याचा जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले. ‘वॉक फॉर वोट रॅली’चा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. ‘वॉक फॉर वोट’ रॅलीसाठी जिल्हाधिकारी जावळे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी निर्मला कुचिक, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे,अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील, अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका वैशाली पाटील यांनी लोकशाहीचा उत्सव पोवाडा सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून आज सकाळी आठ वाजता सुरु झालेली रॅली त्यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय येथून. ब्राह्मण आळी, महावीर चौक बालाजी मंदिर नाका, बीच रोड, एसबीआय बँक या मार्गाने शहरातील विविध भागातून नेऊन जिल्हाधिकारी येथे समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीमध्ये मतदानाबाबत प्रचारगीते, चित्ररथ, फलक याद्वारे घोषणा देत व नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आली. आजच्या रॅलीसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका यासह अधिकारी कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी सहभागी महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता परिसरात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर भेट देऊन मोठ्या प्रमाणात सेल्फी घेत होत्या. यातून जिल्ह्यातील ७ मे रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत मतदान करण्याचा संकल्पच दिसून येत होता.

दिलीप वेंगसरकर माझे हिरो आणि आदर्श – डॉ. शैलेश श्रीखंडे

मुंबई : दिलीप वेंगसरकर हे माझे हिरो आणि आदर्श आहेत असे प्रतिपादन विख्यात कॅन्सर सर्जन आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक शैलेश श्रीखंडे यांनी केले. ड्रीम ११ कप या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.  ओव्हल मैदानातील ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर ड्रीम ११ कप या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास येऊ शकाल का असा वेंगसरका यांचा मला फोन आला आणि मी तात्काळ त्यांना हो म्हणून सांगितले. मी देखील आय.ई.एस. स्कुल साठी लहान असताना शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळलो असल्याने आणि दिलीप वेंगसरकर या व्यक्ती बद्दल प्रचंड आदर असल्याने मी येथे आलो. क्रिकेट मधील आपल्या अप्रतिम कारकिर्दी नंतर या व्यक्तीने युवा क्रिकेटपटूनसाठी जे अप्रतिम कार्य केले आहे त्याला खरोखरच तोड नाही. त्यामुळेच दोन  शस्त्रक्रिया मध्ये थोडा वेळ काढून मी आज यथे आलो आहे. क्रिकेट खेळायला मैदानात उतरल्यानंतर खेळपट्टी, वातावरण या साऱ्याना दोष न देता प्रत्येक वेळी आपली सर्वोत्तम खेळी करायला हवी कारण हीच गोष्ट आपल्या उर्वरित आयुष्यात देखील उपयोगी ठरते. आम्ही आज देखील प्रत्येक शस्त्रक्रिया करताना आपले सर्व ज्ञान पणाला लावतो तेव्हांच त्या यशस्वी होतात असे श्रीखंडे यांनी सांगितले.  वेंगसरकर यांनी देखील यावेळी  बोलताना आपल्या फलंदाजीने संघाला विजय मिळवून देणाऱ्या हर्ष गायकर आणि आयुष शिंदे यांनी शेवटपर्यंत नाबाद राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जेव्हां एखाद्या फलंदाजांचा जम बसतो त्यावेळी आपली विकेट फेकून परतण्यापेक्षा संघाला विजयी करून परतणे हेच महत्वाचे असते असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीने क्रिकेट मंत्रा अकादमी संघावर ८ विकेट्सनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  विजेत्यांना डॉ. श्रीखंडे आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट मंत्रा अकादमी संघाने निर्धारित ३५ षटकांत ५ बाद १८३ धावांचे लक्ष्य उभारले. ४ बाद ७१ वरून आयुध मोहंती (नाबाद ४५) आणि वंश चुंबळे (५०) या जोडीने पाचव्या विकेटसाठी ८९ धावांची भागी रचली.  आलेख सिंग याने ४१ धावांत २ बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या यश जगताप (२६) आणि अस्मित झा (३७) या सलामीच्या जोडीने ६२ धावांची सलामी दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर आयुष शिंदे (नाबाद ५१) आणि हर्ष गायकर (नाबाद ६०) या जोडीने जबरदस्त फटकेबाजी करीत केवळ १३ षटकांतच १०७ धावांची अभेद्य भागीदारी करून २८ षटकांतच संघाचा विजय साजरा केला. हर्ष गायकर याने केवळ ३२ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ६० तर आयुष शिंदे याने ५५ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या.  अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून हर्ष गायकर याची निवड करण्यात आली. संक्षिप्त धावफलक –  क्रिकेट  मंत्रा अकादमी – ३५ षटकांत ५ बाद १८३ (श्रीहन हरिदास २२, समृद्ध भट २०, आयुध मोहंती  नाबाद ४५, वंश  चुंबळे ५०; आलेख सिंग ४१ धावांत  २ बळी ) पराभूत विरुद्ध ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी – २८ षटकांत २ बाद १८४ (यश जगताप २६, अस्मित झा ३७, आयुष शिंदे नाबाद ५१, हर्ष गायकर नाबाद ६०).

सावंतवाडी गंजीफा कलेला मिळाला ‘जीआयटी टॅग’  

सावंतवाडी : सुमारे 500 वर्षांपूर्वीचा सावंतवाडी गंजीफा कलेचा वारसा सावंतवाडी संस्थांनचे राजमाता श्रीमंत सत्वशीला देवी भोसले आणि राजेसाहेब श्रीमंत शिवराम राजे भोसले यांनी जपून ठेवला होता. त्यांच्या पश्चात त्यांची डोर राणीसाहेब शुभदा देवी भोसले आणि युवराणीसाहेब श्रद्धा राजे भोसले यांनी सांभाळली आहे आणि या सावंतवाडीच्या गंजिफा कलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचवले आहे. यावर्षी १६ जानेवारीला भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री  द्वारा ‘जीआयटी टॅग’ सावंतवाडी गंजिफा कलेला मिळालेला आहे. ही गोष्ट सावंतवाडीकरांसाठी खूप गर्वाची आहे. ज्यांनी या पारंपारिक कलेला वेळोवेळी जतन करून या पारंपरिक गंजीफा कलेचा वारसा जपलेला आहे. सावंतवाडी गंजीफा कार्डला मिळालेल्या ‘जीआयटी टॅग’मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडी गंजीफा कार्डचा अस्सल सेट सावंतवाडी पॅलेस वर्कशॉप मधून मिळणार आहे,ज्यामुळे पर्यटकांची फसगत होणार नाही. हा सर्वात मोठा फायदा ‘जीआयटी टॅग’ मिळण्याचा आहे. वरील सर्व भौगोलिक मानांकन कायदेय प्रक्रिया मध्ये एडव्होकेट समीक्षा राजेंद्रकुमार दाभाडे यांनी पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे व सावंतवाडी गंजीफा कलेला ‘जीआयटी टॅग’ मिळवून दिलेला आहे.

करु या महामानवाचे पुण्यस्मरण

विशेष लेख प्रा. अर्जुन डांगळेे देश लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या साजरीकरणात मशगुल असताना जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे पुण्यस्मरण अनेक बाबींकडे लक्ष वेधून घेणारे ठरेल. डॉ. आंबेडकरांनी नेहमीच अन्न,…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जलविषयक धोरण

दिन विशेष श्याम ठाणेदार विश्वरत्न महामानव, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३३ वी जयंती. आजच्याच दिवशी सण १८९१ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्यप्रदेशातील महू या…

शरद पवारांचे खायचे दातही दिसले…

बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा लढा निश्चित होऊन एक आठवड्याहून अधिक कालावधी लोटला आहे. नणंद सुप्रिया सुळे यांच्यासाठी त्यांचे तीर्थरूप दस्तुरखुद्द शरदराव पवार कंबर कसून मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासोबत सुप्रियाजींच्या…

उघड आणि छुप्या पाठिंब्याची नाटके आहेत- उद्धव ठाकरे

मुंबई – भाजपाला काहीजण उघडपणे बिनशर्त पाठिंबा देतायेत तर काहीजण भाजपाच्या विरोधात लढण्याचं नाटक करून त्यांनाच छुपा पाठिंबा देतायेत. आता ही नाटके जनता ओळखते. त्यामुळे हुकुमशाहीविरोधात लोकशाही अशा या सरळ लढाईत जनता योग्य तो…

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी पालिका सज्ज

मुंबई : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर येथील चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ‘राजगृह’ येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह  विविध तयारी देखील…

गवळी ‘भावना’ सारुन प्रचाराला लागल्या !

मुंबई : माझ्या वडिलांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना विनंती करून वाशिम जिल्हा निर्माण केला. वाशिम जिल्ह्यात शिवसेना माझ्या वडीलांनी रुझवली. त्यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पराभव करून या मतदार…