निमिष मुळे, झारा बक्षी सर्वोत्तम जलतरणपटू
खार जिमखाना खुली जलतरण स्पर्धा : मुंबई : खार जिमखानाच्या वतीने आयोजित खुल्या जलतरण स्पर्धेत खार जिमखान्याच्याच निमिष मुळे आणि झारा बक्षी या दोघांनी सर्वोत्तम जलतरणपटूंचा मान मिळविला झारा बक्षी…
खार जिमखाना खुली जलतरण स्पर्धा : मुंबई : खार जिमखानाच्या वतीने आयोजित खुल्या जलतरण स्पर्धेत खार जिमखान्याच्याच निमिष मुळे आणि झारा बक्षी या दोघांनी सर्वोत्तम जलतरणपटूंचा मान मिळविला झारा बक्षी…
ठाणे : संघर्ष आणि श्री सह्याद्री गणेशोत्सव मंडळाने आयोजित करण्यात आलेल्या शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत मुचुरी गावातील निनावीदेवी पालखी नृत्य पथकाने अव्वलस्थान पटकावले. तर, गंगोबा नृत्य पथकाने दुसरे आणि…
राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे – आनंद परांजपे अनिल ठाणेकर ठाणे : सन २०१४, सन २०१६, सन २०१९ सन २०२२ या साली काय घडले हे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शरदचंद्र पवारसाहेबांना विचारायची हिंमत दाखवावी.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजितदादा, प्रफुल्लभाई भुजबळसाहेब, तटकरेसाहेब आदी अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढविली. राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती आणि कळवा येथे सांस्कृतिक कार्यक्रम होता, शिमग्याचा पालखी नाचविण्याचा, त्या सांस्कृतिक व्यासपीठावरून बोलताना पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेसाहेब यांच्यावर त्यांनी काही आरोप केले. याचा मी निषेध करतोच पण माझा एक त्यांना थेट प्रश्न आहे. हे सगळे आरोप आमच्यावर करण्यापेक्षा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना जर त्यांनी जावून विचारले की, २०१४ साली विधानसभेचे संपूर्ण निकाल यायच्या आधी बिनशर्त पाठिंबा भाजपला कोणी द्यायला लावला? २०१६ साली भाजपच्या केंद्रीय शिर्ष नेतृत्वाबरोबर ज्या काही बैठका झाल्या ह्या आपल्या मान्यतेने झाल्या की नाही ? २०१९ मध्ये पुन्हा तो प्रयत्न झाला, पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशिर्वादाने झाला ? राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठविली गेली ? २०२२ ला सत्तांतर होत असताना त्थावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या ? हे सगळे प्रश्न जर डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना धिचारले तर ते अधिक स॔युक्तिक ठरेल आणि माझा त्यांना हा ही सल्ला आहे की, आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. एकनाथ खडसेजी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, अशाप्रकारची घोषणा त्यांनो केली आहे. त्यांना आव्हाड यांनी जावून विचारावे की साहेबांनी आपल्याला काय कमी केले होते ? २०२० मध्ये आपला पक्ष प्रवेश झाला आणि राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अपले नाव पक्षाकडून गेले. राज्यपाल नियुक्त आमदारकी आपल्याला मिळाली नाही तरी २०२२ ला लगेच जुनमध्ये ज्या निवडणूका झाल्या त्यामध्ये माननीय एकनाथराव खडसे यांना पक्षातर्फे विधानपरिषदेचे आमदार बनविण्यात आले. त्या एकनाथराव खडसे यांना प्रश्न विचारले तर अधिक बरे होईल. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर माननीय अजितदादांचे, माननीय सुनील तटकरेसाहेब यांचे असलेले योगदान महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील कार्यकर्त्यांना माहित आहे. पहिले प्रांताध्यक्ष छगन भुजबळसाहेब यांच्या बंगल्यातुन पक्षाचे नाव, चिन्ह, पहिला झालेला राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा याचे नियोजन करण्यात आले होते. त्या काळापासून या नेत्यांचे योगदान इतके आहे की जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न विचारण्याची पात्रता किंवा कुवत देखील नाही. सातत्याने सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात पण राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे, असा सणसणीत आरोप प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला. आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवात केली. पण माननीय अजितदादा पवार, छगन भुजबळसाहेब, सुनील तटकरेसाहेब, प्रफुल्लभाई पटेल आदी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याचे काम केले. पण डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी मात्र ठाणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस संपविण्याचे काम केले. ज्या गणेश नाईकांचा दुस्वास तुम्ही आयुष्यभर केलात, त्यांच्याबद्दल स्वर्गीय वसंतरावजी डावखरे यांच्याबद्दल वारंवार शरदचंद्र पवारसाहेबांना खोटनाट सांगत राहिलात, यामुळे कितीतरी चांगली लोक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेली. याचा विचार, आत्मपरीक्षण जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः करावे. इतके दिवस मी त्यांना इतिहासकार डाॅ जितेंद्र आव्हाड म्हणायचो आता.पण आता ते रामदास पाध्येंसारखे किंवा जाॅनी लिव्हर सारखे नकलाकार बनणार असतील तर माहीत नाही. ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले त्यामुळे डाॅ जितेंद्र आव्हाड होश मे आवो, आपली पायाखालची वाळू आता सरकत चालली आहे. मी तर त्यांना २४ तासाचे आव्हान दिले होते की राष्ट्रवादीचे कार्यालय अधिकृत आहे की अनधिकृत आहे, हे त्यांनी कळवेकरांना सांगावे पण त्यांनी उत्तर दिले नाही. आता मी त्यांना पुन्हा चॅलेंज देत आहे. त्याही वेळेला त्यांनी कांगावा केला की, खारलॅण्डचे ग्राऊंड कोणी बंद केले ? खारलॅण्ड चे ग्राऊंड बंद व्हावे ही राष्ट्रवादीची अजिबात इच्छा नव्हती. त्या ग्राऊंडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, कळवेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा पण ते ग्राऊंड त्यांनी जे व्यक्तिगत जहागीर केली त्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. अट्टाहास करुन घेतलेल्या भिवंडीच्या जागेवर महाविकास आघाडीतुन सुरेश उर्फ बाळ्यामामा यांना उभे केले आहे तिथे जाऊन त्यांचा प्रामाणिक प्रचार करावा, जिंकविण्यासाठी प्रयत्न करावा, ही त्यांना सदिच्छा. पण येत्या २ जूलैला कळेल की आपल्यामध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची तरी क्षमता आहे का ? महाराष्ट्र तर खूप दूरची बात झाली. कोण कोणाचे घर फोडत नसतो. ५ जुलैला एक वेगळी, स्पष्ट राजकीय भूमिका एमटीएनएल मध्ये अजितदादांनी घेतली तेव्हा माझ्यासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यां, जनतेला वस्तुस्थिती, सत्य माहित पडले. सातत्याने आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडू नयेत, असा टोला प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मारला. भाऊ आणि बहिण हे जगातील एक खूप महत्वाचे नाते आहे. या नात्यावर डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. त्यांच्या घरातील तो कौटुंबिक प्रश्न आहे. बोलायचे असेल तर काही मी देखील बोलू शकतो. माननीय अजितदादा व सुप्रियाताई यांच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचे घरातील संबंधांवर भावाबहिणीच्या संबंधांवर डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. कधीतरी त्यांना देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की, तुमचे तुमच्या बहिणीशी संबंध कसे आहेत ? हे त्यांनी स्वतः देखील तपासून घ्यावे. बायकोचे आणि नवर्याचे नाते देखील पवित्र आहे त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. मी एकच सल्ला देईल तुमच्या बहिणीचे, पत्नीचे संबंध अधिक कसे सुदृढ आणि चांगले होतील त्याकडे त्यांनी प्रयत्न करावे. डोमकावळ्यांचे देखील अनन्यसाधारण महत्व आहे. आपण जेव्हा सर्व पित्रीला पिंडदान करतो तेव्हा सर्वजण कधी येउन पिंडाला शिवतो यासाठी डोमकावळ्यांची वाट बघत असतात. तेव्हा या प्रकृतीमध्ये, देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक पशू, पक्षी, मनुष्य याचे महत्त्व आहे. यामुळे फार काही त्यांनी डोमकावळा, गद्दार, घरफोड्या म्हणू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही योग्य ती कायदेशीर काळजी घेत आहोत. आमचे ज्येष्ठ विधितज्ञ आमची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकष आम्हाला चिन्हाबाबत आखून दिलेत, ते सगळे योग्य त्या परीने आम्ही पाळत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाकडून देखील एक नेता सातत्याने मॅटर सबज्युडीश असताना त्यांना कायम ट्विट करण्याची सवय आहे ती त्यांनी करु नये. अशाप्रकारचे ऑब्झर्वैशन सुप्रिम कोर्टाच्या शेवटच्या सुनावणीत करण्यात आले होते. अंत भला तो सब भला. विजय शिवतरे हे महायुतीचा पुरंदर येथे मेळावा घेत आहेत. या मेळाव्याला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. ही चांगली गोष्ट आहे. महायुतीच्या आमच्या उमेदवार सौ सुनेत्राताई अजित पवार या मोठ्या मताधिक्याने बारामतीत मतदारसंघातुन निवडून येतील. सुजय विखे पाटील असोत की कोणाही उमेदवाराला धमकी मिळत असेल तर त्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने व पोलिसांनी तत्काळ घ्यायला हवी.
अशोक गायकवाड नागपूर : मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीने मानांकन बहाल करुन नागपुरकरांचा गौरव केला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वीप अंतर्गत मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करुन लोकशाहीच्या महत्वपूर्ण उत्सवात आपले कृतीशिल योगदान द्यावे यादृष्टीने नागपूर येथे प्रशासनाच्या वतीने व्यापक जनजागृती केली जात आहे. यातील मतदार साक्षरतेसाठी शनिवार रोजी कस्तुरचंद पार्क येथे सकाळी ६ वाजता सुरु झालेल्या मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीने मानांकन बहाल करुन नागपुरकरांचा गौरव केला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांच्या विशेष उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभास विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, अतिरिक्त आयुक्त डॉ. माधवी खोडे चावरे, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, स्वीपच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पद्मश्री सन्मानित डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. कस्तुरचंद पार्क मैदानावर सकाळी ६ पासूनच नागपुरकरांनी मतदार जागराच्या या पाठाला शिस्तीची जोड दिली. संयोजकांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक ब्लॉकनुसार मतदार विभागून बसले. यात एनसीसीच्या युवा मतदारांनी ड्रेस कोडमध्ये येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया रिकॉर्ड अकॅडमीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्षरित्या संपूर्ण कस्तुरचंद पार्क फिरुन उपस्थिती व सहभागाची पाहणी करुन घेतली. इलाईट वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अँबेसेडर अमित हिंगोरानी, इंडिया रिकॉर्ड अकॅडमीचे वरिष्ठ मॅनेजर पी. जगन्नाथन यांनी नागपुरच्या या वैशिष्ट्यपूर्ण मतदार जागराच्या पाठाला रेकॉर्डब्रेक उपस्थितीसह मानांकन प्राप्त झाल्याचे जाहीर केले. या पाठाअंतर्गत मतदारांची जबाबदारी व लोकशाहीच्या सशक्तीकरणाबद्दल सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधून जबाबदार नागरिकत्वाची भूमिका समजावून सांगितली. गटविकास अधिकारी, राजनंदिनी भागवत यांनी मतदारांना आपल्या परिसरातील मतदान बुथ, वोटर हेल्पलाईन ॲपची सविस्तर माहिती दिली. तहसिलदार रोशन मकवाने यांनी मतदान यंत्राबाबत संपूर्ण माहिती दिली. उपजिल्हाधिकारी सुरेश बगळे यांनी दिव्यांग मतदारांना मतदानासाठी असलेल्या सेवासुविधा, निवडणूक विभागाची भूमिका याबाबत माहिती करुन दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे यांनी युवा मतदानबाबत जागृती अभियानाची संकल्पना मांडली.भारत निवडणूक आयोगामार्फत यापुर्वी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड २०२३ ने सन्मानित केले आहे. मिशन युवा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मतदार नोंदणी अभियानात ७५ हजार युवकांनी आपली नाव नोंदणी मतदार यादीत नोंदवून नागपुरला वेगळे वैभव प्राप्त करुन दिले.मतदान जागरुकतेच्या पाठासाठी ७५०० मतदारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. नागपुरकरांनी याला भरभरुन प्रतिसाद देत उद्दिष्टापेक्षा ११०० संख्येने अधिक हजेरी देवून एकूण ८१०० मतदारांची उपस्थिती यशस्वी करुन दाखविली. यावेळी स्वीप अंतर्गत मतदारांच्या साक्षरतेसाठी व मतदानाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने निर्मिती करण्यात आलेली ‘अधिकार है’ ही ध्वनीचित्रफित रिलीज करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सर्व उपस्थित मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात वोटींग करण्याकरिता शपथ दिली. या कार्यक्रमास लोकसहभागाचे प्रातिनिधीक प्रतिनिधीत्व म्हणून एशियन खेळाडू ओजस प्रविण देवतळे, क्रिकेटपटू वृदराज राऊत, पारलिंगी कार्यकर्ती विद्या कांबळे, जगातील सर्वात कमी उंचीची ज्योती आमगे, ज्येष्ठ नागरिक सुरेश रेवतकर, आंतरराष्ट्रीय स्वीमींग खेळाडू जयंत दुबळे, माजी सैनिक संजय खंडारे, सफाई कर्मचारी रोशन बन्सोड, संदीप राऊत, पोलीस विभागातील सुशिल धाकटे, आदी क्षेत्रातील प्रतिनिधी यांना निमंत्रित केले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.
ठाणे : जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार २५ ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघामधील २५३० मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आज दि.07 एप्रिल 2024 रोजी राम गडकरी रंगायतन, ठाणे येथे ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण व समर्थ विद्यालय, ठाणे येथे ईव्हीएम हँण्डस् ऑन ट्रेनिंग संपन्न झाले. या प्रशिक्षणाकरीता नियुक्त मतदान अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती 63% इतकी होती. हे प्रशिक्षण दोन टप्यात घेण्यात आले. सकाळी 10:00 ते1:00 व दुपारी 02:00 ते 05:00 या दोनही वेळांमध्ये ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण व ईव्हीएम हँण्डस्ऑन ट्रेनिंग देण्यात आले. दोनही प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान अधिकारी / कर्मचारी यांची गैरसोय होवू नये म्हणून जागोजागी दिशादर्शक फलक / हजेरी नियोजन फलक लावण्यात आले होते. तसेच वैद्यकीय पथकाची देखील प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपलब्धता होती. येणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या पार्किंगसाठी दोन्ही ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. राम गणेश गडकरी रंगायतन हॉल येथे प्रशिक्षणासाठी पेंडॉल टाकण्यात आलेला होता.या पेंडॉलमधील मतदान अधिकारी/कर्मचारी यांना उन्हाळयाचा त्रास होवू नये म्हणून कुलर व फॅनची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आलेली होती. तसेच प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणात करण्यात येऊन चहा बिस्कीटचीही व्यवस्था करण्यात आलेली होती. एकंदरीत प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे नियोजन हे चांगल्या प्रकारे केलेले होते. तसेच ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण उर्मिला पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ठाणे उपविभाग, ठाणे यांनी स्वत: अतिशय साध्या व सोप्या भाषेमध्ये चांगल्या प्रकारे दिले. त्यामुळे मतदान अधिकारी कर्मचारी व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणाचे नियोजन व प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.
अनिल ठाणेकर ठाणे : देशभरातील सर्वात अधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या राज्यात शेतीच्या व शेतकरी-श्रमिकांच्या प्रश्नांवर आरपार संघर्ष उभा राहिल्यास केंद्र व राज्य सरकारला या प्रश्नांबाबत ठोस भूमिका घ्यावी लागेल. किसान सभेची राज्यस्तरीय शेतीमाल रास्तभाव परिषद अशा संघर्षाला चालना देईल असा विश्वास अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी यावेळी व्यक्त केला. शेतीमालाला रास्त दर मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर शेतीमाल हमीभाव कायदा करावा व शेतकऱ्यांना शेतीमालासाठी दीडपट भावाची कायदेशीर हमी द्यावी असा ठराव किसान सभेच्या पुढाकाराने आयोजित वर्धा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत एकमताने करण्यात आला. राज्यभरातील शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी जनजागरण व व्यापक आंदोलनाचा संकल्पही यावेळी करण्यात आला. वर्धा येथील शिववैभव मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या परिषदेचे उदघाटन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी केले व समारोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया हे होते. किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी मुख्य ठराव मांडला. डी. एन. हिवरे हे स्वागताध्यक्ष होते. देशात निवडणुकांचा माहोल असताना शेती, शेतकरी व ग्रामीण श्रमिकांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित केले जात आहेत. शेतीच्या क्षेत्रातील अरिष्टावर मात करण्यासाठी अपेक्षित मूलभूत उपाययोजना दुर्लक्षित करून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देऊन त्यांना कायमचे संकटात ठेवत, लाभार्थी बनविण्याचे काम भाजप प्रणित सरकार करत आहे. देशात शेतीमालाला रास्त भाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सर्वंकष पीक विमा योजना व शेतकरी पेंशनची मागणी तीव्र होत आहे. देशभरातील सर्वात अधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या राज्यात शेतीच्या व शेतकरी-श्रमिकांच्या प्रश्नांवर आरपार संघर्ष उभा राहिल्यास केंद्र व राज्य सरकारला या प्रश्नांबाबत ठोस भूमिका घ्यावी लागेल. किसान सभेची आजची परिषद अशा संघर्षाला चालना देईल असा विश्वास डॉ. अशोक ढवळे यांनी यावेळी व्यक्त केला. जेष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी यावेळी राज्यभरातून उपस्थित शेतकरी नेते व कार्यकर्त्यांना संबोधित केले. देशाची शेती आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडली गेली आहे. शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात ठेवून एक नजर आपल्या शेतात व एक नजर आंतराष्ट्रीय बाजारात रोखून ठेवण्याचा हा काळ आहे. कापसाचे मध्यंतरी आपल्याला जरा बरे भाव मिळाले याचे कारण येथील सरकारची मेहरबानी नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती हे कारण होते. मोदी सरकारने हे भाव सुद्धा टिकू दिले नाहीत. सोयाबीन व कापसाचे भाव वाढू द्यायचे नाही, शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही हेच सरकारचे धोरण आहे. आजच्या परिषदेच्या निमित्ताने मोदी सरकारच्या विरोधातील लढाईला आणखी चालना मिळेल असे ते यावेळी म्हणाले. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी परिषदेचा समारोप केला. देशात तीव्र होत असलेल्या व शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण असलेल्या कृषी अरिष्टावर निर्णायक उपाय करण्यासाठी शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणे, शेतीमालाला बाजारात उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी देणे व नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना रास्त नुकसानभरपाई मिळेल अशी व्यवस्था करणे या प्रमुख तीन उपायांची आवश्यकता आहे. दुर्दैवाने देशातील भाजप-प्रणित केंद्र व राज्य सरकार या मूलभूत उपायांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होईल व त्यातून भाजपच्या कॉर्पोरेट देणगीदार मित्रांना शेतीची लूट करून अमाप नफे कमवता येतील अशी व्यवस्था केली जात आहे. दुसऱ्या बाजूला अनुदानांनी स्वस्त झालेला शेतीमाल आयात करून व शेतीमालाची निर्यातबंदी लादून सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाकारणाऱ्या कंपन्यांना पाठीशी घातले जात आहे. अशा पार्श्वभूमीवर, किसान सभा या सर्व प्रश्नांवर आरपार संघर्षाची भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले. किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी परिषदेचा ठराव मांडला. शेतकऱ्यांना शेतीमालाला दीडपट भावाची हमी देणारा कायदा करण्याची मागणी त्यांनी या ठरावात केली. किसान सभेचे ज्येष्ठ नेते दादा रायपुरे, राज्य उपाध्यक्ष किसन गुजर, राज्य पदाधिकारी महादेव गारपवार, अनिल गायकवाड, राज्य समिती सदस्य जितेंद्र चोपडे, श्याम शिंदे, दिलीप परचाके, अमोल मारकवार, आदींनी ठरावास पाठिंबा दिला. केंद्रातील व राज्यातील भाजप प्रणित सरकार तद्दन कॉर्पोरेटधार्जिणे व शेतकरी-श्रमिक विरोधी असल्याने या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. अविनाश जरिले यांनी आभार व्यक्त केले. शेतकरी एकजुटीच्या घोषणांच्या निनादात परिषद यशस्वी झाली.
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ए विभाग बेलापूर कार्यालया अंतर्गत करावे गाव नवी मुंबई संताजी बळीराम नाईक, घर क्र- 873, सेक्टर-36, करावे गांव, नवी मुंबई व आदेश वाघमारे, घर क्र-404, सेक्टर-20, बेलापूर गाव, नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकाम सुरु असून सदरच्या बांधकामासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ए विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदर संताजी बळीराम नाईक, घर क्र- 873, सेक्टर-36, करावे गांव, नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकाम अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच आदेश वाघमारे, घर क्र-404, सेक्टर-20, बेलापूर गाव, नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकाम सिडको व नमुंमपा यांच्या संयुक्त मोहिमेत निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी ए विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर मधील अधिकारी/ कर्मचारी, मजूर 10, गॅसकटर 01, इलेक्ट्रीक हॅमर 03, पिकअप 01 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
ठाणे : भारतीय जनता पक्षाने भारतीय राजकारणाला विदेशी प्रभाव, विचार आणि मानसिकता यातून मुक्त केले. मार्क्सवाद, समाजवाद आणि भांडलवलशाही या चौकटीतून भारतीय राजकारण बाहेर काढले. देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. परकीय तत्वज्ञाना ऐवजी स्वदेशी चिंतनाची जोड दिली, असे प्रतिपादन पत्रकार, राजकीय-सामाजिक विश्लेषक मकरंद मुळे यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या चव्वेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नौपाडा मंडल आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मकरंद मुळे बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रभाग क्रमांक एकवीसचे नगरसेवक सुनेश जोशी, नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घाग्रेकर व्यासपीठावर होते. सदर कार्यक्रम नौपाडा, विष्णू नगर येथील नगरसेवक सुनेश जोशी यांच्या संपर्क कार्यालयात झाला. मकरंद मुळे यांनी आपल्या भाषणात 1980 ते 2024 भाजपाच्या वाटचालीचा आढावा घेतला. नीती, मूल्य, आदर्श, तत्व आणि व्यवहारिक राजकारण याचे संतुलन भाजप करत आहे असे मकरंद मुळे यांनी सांगितले. मतपेटीचे राजकारण आणि अस्मिततेच्या नावाखाली संकुचित भूमिका यापार्श्वभूमीवर भाजपाने स्थापनेपासून व्यापक राष्ट्रीय भूमिका घेतली असे मकरंद मुळे म्हणाले. भाषा, प्रांत, पंथ आणि जात यापलीकडे जाऊन अंत्योदय, विकास, आणि हिंदुत्व याआधारे भाजपाने आपला विस्तार केला असे मकरंद मुळे म्हणाले. लोकसभा निवडणूकीत चारशे पार ही नुसती घोषणा नसून तो दहा वर्षातील सरकारच्या कामातून आलेला आत्मविश्वास आहे. 1984 साली केवळ दोन खासदार म्हणून हिणवला गेलेल्या पक्षाने क्रमश: आपला जनाधार देशभर वाढवला आहे. पारंपरिक मतदार टिकवून नवीन मतदार जोडला आहे. लोकशाहीत संख्याबळाला महत्व असते. संख्येच्या आधारे सरकार तयार होते. सत्ता प्राप्त होते. मिळणारी सत्ता जनहितासाठी राबवणे महत्वाचे असते. त्यामुळे राजकारणात आपद धर्म म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. भाजपा त्या दृष्टीकोनातून निर्णय घेत आहे. राजकीय तडजोडी करत आहे. बेरजेचे राजकारण करत आहे. भाजपाच्या कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक यांनी हे राजकारण समजून घेणे आवश्यक आहे, असे मकरंद मुळे म्हणाले. भाजपाच्या स्थानिक सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देशाची सद्यस्थिती लक्षात घेऊन आपल्या पक्षाला विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे भाषणाच्या शेवटी मकरंद मुळे यांनी सांगितले. सुनेश जोशी आणि विकास घाग्रेकर यांचीही भाषणं झाली. कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांचा दावा मुंबई : आज देशात महगाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व गरीबांवर होणारे अन्याय मोठ्या प्रमाणात वाढले असून अशा स्थितीत भाजपने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे.आज देशात कोणत्याही एका पक्षाला ४०० सीट निवडून आणणे शक्य नाही evm मध्ये सेटींग केल्यास ते सहज शक्य आहे. evm मध्ये सेटींग करून निर्णय परिणाम बदलले जातात असे अनेक वर्षापासून आरोप होत आहे.त्यामुळे evm बाबतीत देशातील जनतेच्या मनात संभ्रम आहे. evm व vvpat याबाबत आम्ही आपल्या निदर्शनास आणून देवू इच्छितो की, बहुजन महापार्टीची स्थपना सन २०१७ मध्ये झाल्यानंतर आम्ही प्रथम निवडणूक उत्तर प्रदेश मध्ये होणाऱ्या विधानसभेची लढविली होती त्या निवडणुकीत फक्त evm या मशीन द्वारे निवडणूक घेण्यात आली.व निकाल जाहीर झाल्यानंतर आमच्या पक्षाच्या उमेदवाराने आम्हाला सांगितले की, आमच्या कुटुंबातील लोकांनी आम्हाला मतदान केले होते परंतु निकालात ते दिसत नाही त्यामुळे आमच्या उमेदवाराने तक्रार दाखल करण्यास सांगितले असल्याने आम्ही याबाबत बहुजन महापार्टी तर्फे मा.राष्ट्रपती व मा.केंद्रीय निवडणूक आयोग यांना पत्र देवून evm निकालावर हरकत घेतली होती.त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आम्ही कोर्टात लढा देण्याचे ठरविले.व सर्व निवडणुका evm व vvpat च्या माध्यमातून घेणेकामी मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक ८१८७/२०१७ दाखल केले होते व पारदर्शक निवडणूक घेण्याची विनंती मे न्यायालयात केली होती.त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने vvpat चा वापर करून मतदान घेण्यात येईल व पारदर्शक मतदान होईल याबाबतचे फलक शासकीय कार्यालयाबाहेर लावले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने vvpat मशीन खरेदी करणेकामी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च करुन देशातील सर्व बुथवर आवश्यक असलेले evm व vvpat मशीन खरेदी केलेली आहे.आज आवश्यकतेपेक्षा जास्त vvpat व evm मशीन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहे. vvpat मशीन खरेदी करण्यामागे एकच उद्देश होता तो म्हणजे पारदर्शक निवडणूक व पारदर्शक निकाल.परंतु निवडणूक आयोग vvpat slip ची मोजणी का करत नाही याबाबतचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा ? निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली आहे का ? पारदर्शक निवडणूक घेवून पारदर्शक निर्णय पारीत झाल्यास लोकशाही आणखीन भक्कम होईल व देशातील जनतेचा विश्वास निवडणूक आयोगावर वाढेल.त्यामुळे माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की, त्यांनी निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी यांना याबाबत विचारणा करावी.व vvpat slip ची मोजणी झाल्यास हरकत काय ? आज देशातील जनतेच्या मनात evm बाबत शंका आहे.निवडणूक आयोगाने evm मशीन बनविण्याचे ठेका ज्या इसमास दिला गेला आहे तो भाजप या पक्षाचा पदाधिकारी आहे असे आरोप बहुतेक लोक करीत आहेत.त्यामुळे evm या मशीन मध्ये गडबड करुन निकाल बदलला जाऊ शकते असे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाने अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च करून vvpat मशीन लावलेले आहे त्याचा उपयोग मतमोजणीसाठी का केला जात नाही ? फक्त evm मशीनची मोजणी करून निर्णय पारीत केले जात असल्याने ५०० कोटी रुपये का खर्च करुन vvpat मशीन का खरेदी करण्यात आली आहे ? evm मशीनद्वारे जाहीर होणाऱ्या निर्णयास सर्व पक्षातील लोकांनी विरोध केलेला आहे. देशात पारदर्शक निवडणुक व्हावे असे समस्त देशवासीयांची भावना आहे त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग vvpat slip ची मोजणी करून निर्णय जाहीर केल्यास निवडणुका पारदर्शक झाले आहे हे स्पष्ट होईल. vvpat slip ची मोजणी करून निर्णय जाहीर करण्यास अंदाजे ५ ते ६ दिवस लागतील व या निकालावर कुणीही आक्षेप घेवू शकत नाही. vvpat slip ची मोजणी करण्यास शासनाचा वाढीव एक रुपयाही खर्च होणार नसल्याने पारदर्शक निवडणूकीचा निकाल लागावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित सर्व जिल्हाधिकारी म्हणजेच निवडणूक निर्णय अधिकारी यांना याबाबत योग्य ते आदेश द्यावे अशी आमची मागणी आहे व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील vvpat slip ची मोजणी करण्याबाबत त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट करावे असे बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी बोलताना सांगितले आहे.
डहाणू : धाकटी डहाणू येथील ‘सागर सरिता’ नावाच्या मासेमारी बोटीला खोल समुद्रात एका भल्या मोठ्या मालवाहू जहाजाने पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली. वत्सला यशवंत मर्दे यांची सागर सरिता नावाची मासेमारी बोट शनिवारी रात्री आठच्या सुमारास खोल समुद्रात मासेमारी करीत असताना, तिला अचानक गुजरात बाजूकडे जाणाऱ्या एका भल्या मोठ्या मालवाहतूक जहाजाने धडक दिली. यामध्ये बोटीच्या पंख्याजवळ भगदाड पडल्याने बोटीत पाणी घुसू लागले. या वेळी बोटीतील नऊ खलाशानी प्रसंगावधान राखत भगदाड पडलेल्या जागी चादरी घालून पाणी अडवले. त्यांनी जवळच मासेमारी करीत असलेल्या इतर बोटींना मदतीसाठी पाचारण केले. या वेळी धडक देणाऱ्या मालवाहू जहाजाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही अपघातग्रस्त बोट डहाणूच्या किनाऱ्यावर आणण्यात आली. या घटनेमुळे मच्छीमार संघटनाकडून संताप व्यक्त केला जात आहे. खोल समुद्रात आम्ही मासेमारी करायची की नाही, असा सवालही मच्छीमार नेते अशोक अंभिरे यांनी केला आहे.