Category: होम

वंचितच्या मविआतील सहभागासाठी काँग्रेसकडून आता राज्यसभेची ऑफर

मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी व्हावे यासाठी काँग्रेसकडून दोन जागा वाढवून देण्याची ऑफर दिली होती. तरीही वंचितने प्रतिसाद न दिल्याने आता काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेसहीत केंद्रात…

दिलीप करंगुटकर स्मृती कॅरम स्पर्धा

पुण्याच्या आयुष गरुड विजेता पुणे : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय एकेरी कॅरम स्पर्धा पुण्याच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा आयुष गरुडने जिंकली. १२…

‘खोट्या फाईल काढून खडसेंना अडकवण्याच प्लॅन’?

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. यावर रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत…

 मनसेला मुंबईत खिंडार

 ६५० पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश मुंबई : बंद दाराआड महायुतीकडून मनसेला सोबत घेण्यासाठी चर्चा सुरु असतानाच आता दिवसाढवळ्या भाजपाने मनसेला मुंबईत खिंडार पाडले आहे. तब्बल ६५० पदाधिकाऱ्यांनी ‘मनसे’ राज ठाकरेंची साथ सोडत भाजपात दाखल होण्याचा निर्णय घेतलाय.…

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची अध्यक्षपदी  निवड पुणे – २०२४ ते २०२८ या कालावधी करता निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत विविध पदांकरिता करिता कोणाचाही ज्यादा अर्ज न आल्याने ही निवडणूक आज…

डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करुन काहींच्या कमरेचे,गळ्याचे पट्टे उतरवले – मुख्यमंत्री शिंदे

नागपुर : मी डॅाक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संजय राऊत…

बुधवारपासून खारलँड मैदानात एमसीएतर्फे मुलींची निवडचाचणी

ठाणे : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील १७ वर्षाखालील मुलींसाठी बुधवारपासून दरवर्षी प्रमाणे कळव्यातील खारलँड मैदानात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी…

४८ वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा

डीटीडीसीने विजेतेपद राखले ठाणे : एकतर्फी लढतीत डीटीडीसी संघाने रूट मोबाईलचा आठ गडी राखून दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील या गटाचे विजेतेपद आपल्याकडे कायम राखले…

जातीयवाद्यांची सत्ता उखडून टाकावीच लागेल- शरद पवार

दौंड : “जातीयवादी लोकांच्या हातात सत्ता आहे. ही सत्ता उखडून टाकण्याची वेळ आली आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्याची वेळ आलीय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार आहे. मोदींचे ऐकत नाही म्हणून…

१३ एप्रिलपासून ठाण्यात समता संस्कार शिबिर

ठाणे : दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा १३ एप्रिल पासून १६ एप्रिल पर्यंत समता विचार प्रसारक संस्थेतर्फे येऊर येथे समता संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १० वी च्या परीक्षेला बसलेल्या आणि कॉलेज मध्ये जाणाऱ्या १८ ते २५ वयाच्या युवक युवतींसाठी असलेल्या या निवासी शिबिरात शरीर विज्ञान, माध्यमांचा प्रभाव, मोबाईल चा विवेकी वापर, आकाश दर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयांवर रंजकपणे, खेळांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. डॉ. संजय मंगला गोपाळ, वंदना शिंदे, प्रशांत केळकर, राजू बहाळकर, हर्षदा बोरकर या सारखे मान्यवर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर शॉर्ट फिल्म दाखवून त्यावर चर्चा करण्यास सुप्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शक संतोष पाठारे येणार आहेत. मुलांना शिस्तीचे धडे देत व्यक्तिमत्व विकास होण्याबरोबर त्यांच्या सामाजिक जाणिवा जागृत व्हाव्या हा मुख्य उद्देश हे शिबिर भरवण्यामागे आहे. येऊर येथील निसर्गरम्य वातावरणात संपन्न होणार्‍या या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येंने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी सचिव अजय भोसले (८१०८९४९१०२) यांना संपर्क करावा. जागा मर्यादित आहेत.