Category: होम

गडकरींवर आचार संहितेच्या उल्लंघनाचा काँग्रेसचा आरोप

भाजपाकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर मुंबई  : भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपुर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी निवडणूक आचारसंहीता भंग केल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा…

रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार भाजपाचाच : नारायण राणे

सावंतवाडी : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मी झटत आहे.उध्दव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेने कोकण भकास केले आहे. जनता त्याचा येणाऱ्या निवडणूकीत हिशेब करेल असा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रहार करत…

केजरीवालांच्या जामिनावरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काल संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणात जामिन दिल्यामुळे आम आदमी…

मरीन लाईन्स ते वरळी कोस्टल रोडचे काम अंतिम टप्यात आहे. या कोस्टल रोडला समुद्राच्या लाटांची झळ  बसू नये म्हणून लाटाअवरोधक दगड कोस्टल रोडजवळ टाकण्याचे  काम सध्या जोरात सुरू आहे. छायाचित्र संतोष…

 भाजपाला धक्का

जळगावचे खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या सेनेत दाखल जळगाव : भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंगची सवय झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आज नाट्यमय घटना घडलीय. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा…

तैवानमध्ये महाभीषण भूकंप

तैपैई : गेल्या २५ वर्षात झाला नाही इतका महाभीषण भूकंपाने आज बुधवारी सकाळी तैवान हादरले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची ७.२ इतकी नोंद झाली आहे. या भूकंपामध्ये अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. तैवान…

कपिल पाटील यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

भिवंडी : ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक श्री. सुमित पाटील, श्री. राम माळी आदींची उपस्थिती होती.

दिव्यांग व्यक्तीला कमी समजू नका,  त्यांनाही समान संधी द्या – पूर्वेश सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : सत्यम हा आमच्या विभागातला असून तो खूप हुशार आहे. दिव्यांग असल्यामुळे त्याला नोकरीसाठी अडचणी येत होत्या. त्याला नोकरी लावून देण्याचे आश्वासन मी दिले होते व ते पूर्णही केले. आज त्याचा पहिला पगार झाला असून त्याच्या यशामुळे तो आणि त्याचे कुटुंब खुश आहेत. त्याला भविष्यात तलाठी बनायचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठीही मी त्याला मदत करणार  आहे. दिव्यांग व्यक्तीला कमी समजू नका त्याला समान संधी द्या असे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. ठाणे विभागात राहणारा सत्यम लिंगाळे याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून दिव्यांग असल्यामुळे नोकरीसाठी त्याला अडचणी येत होत्या. त्याची समस्या युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांना कळताच त्यांनी त्याला नोकरी मिळवून दिली होती. सत्यमला नोकरीत एक महिना पूर्ण झाला असून त्याने आज पूर्वेश सरनाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. युवा महाराष्ट्र मेळावा २४ फेब्रुवारीला पार पडला होता. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्यमला नियुक्ती पत्र देण्यात आले होते. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सत्यमला नोकरी लावून देण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण केले. आज सत्यम आणि त्याची आई पूर्वेश यांना भेटायला आले होते. त्याचा पहिल्या महिन्याचा पगार झाला. तो त्याने पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते स्विकारत त्यांचे मनापासून आभार मानले. आज मला माझा पहिला पगार  मिळाला. हे सर्व पूर्वेश सरनाईक यांच्यामुळे शक्य झाले आहे. त्यांनी मला काही महिन्यापूर्वी  नोकरीचा शब्द दिला होता व तो पूर्णही केला असल्याचे सत्यम याने सांगितले. माझा मुलगा ही सर्वसामान्य लोकांप्रमाणे कामाला जात असून मला खूप आनंद होत आहे की, आज त्याच्या नोकरीला एक महिना पूर्ण झाला. पालक म्हणून आम्हाला खूप आनंद असल्याचे सत्यमच्या आईने सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० महत्वाची भूमिका बजावेल – कुलगुरू डॉ.कारभारी काळे

अशोक गायकवाड रायगड : आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ करिता बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे यांनी मंगळवार, (दि.२) रोजी येथे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामार्फत १२ वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षामाठी प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शिक्षण व्यवस्थेमधील संभ्रम दूर होण्याच्या उद्देशाने कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे आयोजित एक दिवसीय स्कूल कनेक्ट कार्यशाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेस परिसरातील एकूण २०० पेक्षा अधिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला. ही कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली असून पहिल्या सत्रात राज्यात राबविण्यांत येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील शैक्षणिक बदलांबाबत जागृती, बँकेच्या शैक्षणिक कर्ज योजना, विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठात उपलब्ध शैक्षणिक सोई-सुविधा, विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, रोजगार, इंटर्नशिप करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इ. बाबत मार्गदर्शन करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात विद्यापीठातील विविध विभागांना भेट आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, डॉ.एच.एस. जोशी, डॉ.ए.पी. शेष, डॉ.नीरज अग्रवाल, डॉ.एस.एम.पोरे आणि पदविका विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक बदलांबाबत जसे मल्टीपल एन्ट्री मल्टीपल एक्झीट, बहुशाखीय विषय निवड पद्धत व लवचिक अभ्यासक्रम, नविन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयीन स्तरावर होणारे बदल, भारतीय ज्ञान परंपरा, अकँडमीक बँक ऑफ क्रेडीट, स्वयंम प्लँटफार्म वरील ऑनलायीन अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामाबाबत संवाद साधला तसेच विद्यापीठ अंतर्गत कार्यरत उष्मयान केंद्र व उपलब्ध सोई-सुविधा बाबत विद्यार्थ्यांना अवगत करून त्यांना उद्योजकीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्कृती विकसित होण्याकरिता विद्यार्थी व शिक्षकांकरिता विद्यापीठामार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचे आदान-प्रदान होण्यासाठी विद्यापीठ प्रशासन निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली. तसेच भारताला विश्वगुरु बनविण्याकरिता विकसित भारत २०४७ व आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वाची भूमिका बजावेल असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेत डॉ.ए.पी.शेष इंग्लिश विभाग प्रमुख यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना समग्र शिक्षण, जीवनावश्यक कौशल्य व माणुसकी याचे आपल्या शैक्षणिक जीवनातील महत्व विषद केले. करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख डॉ. नीरज अग्रवाल यांनी विद्यापीठात विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, रोजगार, इंटर्नशिप, स्टार्टअप / उद्योजकता करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इ.बाबत मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्वाची भूमिका पार पेल असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.मधुकर दाभाडे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना आपल्या भागातील संभाव्य उद्योग संधी लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी उद्योग स्थापन करावे तसेच आपल्या परिसरात उत्तम दर्जाचे अभियंता निर्माण होतील या करिता विद्यापीठ सदैव आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर यांनी विद्यापीठामार्फत उत्तम विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत सुरु करण्यात आलेल्या विविध नवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यशाळेची प्रस्तावना डॉ.एच.एस. जोशी यांनी केली तसेच या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.रतिका जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संप्रीत गौड यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.संजय नलबलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नवीन खंडारे व विद्यापीठाचे अधिकारी/कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

निवडणूक प्रचाराच्या परवानग्यांसाठी ‘सुविधा’ पोर्टल उपलब्ध

अशोक गायकवाड रत्नागिरी : उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घ्यावी. आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व नोडल अधिकाऱ्यांची आज आढावा बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड आदीसह नोडल अधिकारी उपस्थित होते. माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, इव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सविस्तर आढावा घेतला. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घ्यावी. आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, असेही सिंह म्हणाले.