Category: होम

मंजुनाथ महाविद्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन विषयांवर मार्गदर्शन

कल्याण : १ ते ७ फेब्रुवारी वनवणवा सप्ताह साजरा करून सर्वत्र जनजागृती केली जाते. जंगलातील मानवी हस्तक्षेप व नैसर्गिक कारणांमुळे आग लागण्याचे घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. जंगलाला आग लागून झाडं नाहीसे होत आहेत त्यावर अवलंबून असलेली पक्षांची घरटी, ढोली व त्यांची अंडी थोडक्यात वन्यजीवन आणि वनसंपदा नष्ट होऊन वन्यजीवांचा नाहक बळी जात आहे. ठाकुर्ली येथील मंजुनाथ महाविद्यालय येथे आपत्कालीन व्यवस्थापन विषयांवर वनवणवा, आगीची कारणे, साहित्यांचे आधारे आग विझविणे इ. यासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच प्रथोमचार पेटी मधील त्रिकोणी पट्टी, बॅडेजचा वापर करणे, कृत्रिम पद्धतीने स्ट्रेचर बनविणे याविषयावर वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी प्राध्यापिका निशा देवधर, माधुरी महाराव तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक,  विद्यार्थी  वर्ग, शिक्षकवृंद व महाविद्यालयीन अन्य कर्मचारी उपस्थीत असल्याची माहिती प्रशिक्षण मार्गदर्शक  सुहास पवार यांनी दिली.

माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा

माथेरान : माथेरान मध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. १ फेब्रुवायेथील विविध ठिकाणी जवळपास पंचवीस गणेशमूर्तींची यानिमित्ताने प्रतिष्ठापना करण्यात आली होती.माथेरान हे एक छोटेसे गाव असल्याने ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घेतला.दि.२ रोजी बाप्पांना ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून मुले ,मुली महिलांनी बेभान होऊन नाचत निरोप देण्यासाठी मिरवणुकीत भाविकांनी गर्दी केली होती.येथील शारलोट तलावात विसर्जन करण्यात आले.परंतु नेहमीप्रमाणेच बत्ती गुल असल्याने याभागातून बाप्पाना अंधारात मार्गक्रमण करावे लागले.

सानपाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

नवी मुंबई : नवीन मुंबई सानपाडा येथील सेक्टर ८ च्या हुतात्मा बाबू गेनू सैद गणेश मैदानावर  गणेश जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सानपाडा  मंडळाच्या वतीने २६ जानेवारी ते २ फेब्रुवारीच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. आळंदीचे ह.भ.प. श्री. महादेव महाराज पैठणकर यांचे काल्याचे किर्तन झाले. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान  ह. भ. प. श्री.  अनिल महाराज पाटील,  ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज निंबोळे,  ह. भ. प. श्री. शंकर महाराज मोरे, ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे, ह. भ. प. श्री. देवेंद्र महाराज निढाळकर, ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज शिंदे,  ह.भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज काकडे,  या मान्यवर महाराजांची आध्यात्मिक ज्ञानदानाची किर्तनरुपी सेवा झाली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ. प. श्री. बाळू महाराज औटी व  ह. भ. प. श्री. मनोहर महाराज लांडे यांनी केले, तर दैनंदिन पूजा व्यवस्था सर्वश्री. रघुनाथ कवडे, ज्ञानेश्वर डोंगरे, शरद घोलप, अशोक घाडगे यांनी केली. या कार्यक्रमासाठी अनेक भाविकांनी देणगी देऊन  सहकार्य केले. भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजनबद्ध  असा सुंदर कार्यक्रम झाला. अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन करण्यात आले होते.

डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र – आदिती तटकरे

अशोक गायकवाड रायगड : डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र आहे. अशा प्रकारे जिल्हयात ३२ केंद्र मंजुर करण्यात आले आहेत.संपुर्ण राज्यात शासनाने ४०० डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली आसून त्यामधे रोज ३००० रुग्णांना सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक रायगड अलिबाग आणि एच.एल.एल.लाईफ केअर लि.यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रूग्णालय म्हसळा येथे सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची घोषणा तटकरे यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर, उप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण शिंदे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, स.पो.निरिक्षक संदीप कहाळे, सा.बांधकाम अभियंता महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना तटकरे म्हणाल्या, म्हसळा या ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ५ डायलिसिस मशीन व बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दरदिवसाला १५ डायलिसिस रूग्णांना सेवा दिली जाणार आहे. डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र आहे. अशा प्रकारे जिल्हयात ३२ केंद्र मंजुर करण्यात आले आहेत. संपुर्ण राज्यात शासनाने ४०० डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली आसून त्यामधे रोज ३००० रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. श्रीवर्धन मतदार संघात श्रीवर्धन येथे २,माणगाव २, आणि रोहा येथे ३ मशीन ऊपलब्ध आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कु. तटकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर यांनी केले.यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

आज युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवक- युवतींचा पुन्हा एकदा एल्गार

ठाणे : महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या अस्थापानेत कार्यरत आहेत, तिथेच त्यांना नियमित करण्यात येईल असे आश्वासन दिले…

श्री उद्यानगणेश कॅरम स्पर्धेत विश्वेत, निखील, सोहम, केतकीची विजयीदौड

मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धेत हिरानंदानी फाउंडेशन स्कूल-ठाणेचा विश्वेत बिजोतकर, सीईएस मायकल…

सुप्रसिद्ध गायक देवदत्त नागपुरे यांच्या मातोश्री सुलोचना नागपुरे यांना ९० वर्ष पूर्ण

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ९ मधील मिलेनियम टॉवर बी टाईप सोसायटीतील सुप्रसिद्ध गायक देवदत्त नागपुरे यांच्या मातोश्री सुलोचना नागपुरे यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी ९० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने…

नावीन्यपूर्ण कृषिकडे वळताना कृषी परिसंस्था बदलू नका-डॉ. संजय भावे

अशोक गायकवाड कर्जत : नावीन्यपूर्ण कृषिकडे वळताना कृषी परिसंस्था बदलू नका, त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात.सोयाबीन, बी. टी.कापसाचे उत्पादन ज्या भागात होते त्याठिकाणी शेतकरी आत्महत्यासारख्या समस्या उद्भवल्या मात्र कोकणातील भात…

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

वॉटरपोलोत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी महिलांत केरळ, तर पुरुषांत सेनादलाचे आव्हान हल्दवानी : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी वोट्रपोलोमधील आपली विजयी घोडदौड कायम राखत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या…

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

तिरंदाजीत महाराष्ट्राला सुवर्ण चौकाराची संधी! सबज्युनिअर खेळाडूंची चमकदार कामगिरी डेहराडून ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघांनी अचूक वेध साधला. रिकर्व्ह व कंपाऊंड या दोन्ही प्रकारातील सांघिक गटासह रिकर्व्ह…