Category: होम

शिवसेना उबाठा शिव आरोग्य सेनेच्यावतीने डायलेसीस रुग्णांना औषधे व श्रवणयंत्र वाटप

ठाणे – धर्मवीर आनंद दिघे जयंतीदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत…

ठामपाचे रेबीजमुक्त ठाणे अभियान

१० हजार भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य अनिल ठाणेकर ठाणे : महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘रेबीजमुक्त ठाणे’ अभियान राबविण्यात येत आहे. रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे तसेच रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे, यासाठी हे अभियान राबिवण्यात येणार आहे. या अभियानात २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या काळात दहा हजार भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. गेल्यावर्षी सात हजाराहून अधिक श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले होते. या उपक्रमात, ठाणे सीपीसीए, इंडियन सोसायटी फॉर व्हेटनरी ॲनिमल प्रोटेक्शन, सिटीझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, व्हीटीईएएमएस आणि पीएडब्ल्यू आशिया या संस्थाचे सहकार्य मिळणार आहे. भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा मृत्यूचे प्रमाण २०३०पर्यंत शुन्यावर आण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विशेष अभियान राबवून त्यात भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येते. गेल्यावर्षी ठाणे महानगरपालिकेने ७ हजार ४०९ भटक्या श्वानांना रेबीजची लस दिली होती. यंदाच्या वर्षातही पालिकेकडून हे अभियान राबविण्यात येईल. ठाणे महापालिका क्षेत्रात या वर्षी दहा हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लसीकरणासाठी एकूण २५ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डाॅक्टर आणि तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भटक्या श्वानांकडून चावा घेण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भागांची माहिती शहरातील नागरिक तसेच प्राणी मित्रांकडून जमा करण्यात आली असून त्याआधारे विभागवार लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे, अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी दिली.

माती नसल्याने ठाण्यातील मुख्य स्मशानभूमीत अर्भकांचा दफनविधी बंद !

ठाणे शहरातील मध्यवर्ती  स्मशानभूमीमध्ये मातीचा पुरवठा करण्यात येत नसल्याने येथे अर्भकांचा दफनविधी करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले आहे. येत्या दोन दिवसात येथे दफनविधी सुरू न केल्यास ठामपा मुख्यालयात आंदोलन छेडण्याचा…

नमो चषक क्रीडा महोत्सवाला राष्ट्रीय विक्रमवीर आणि

आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ललिता बाबर यांची भेट भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ललिता बाबर यांनी उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या नमो चषक स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खासदार…

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित खो खो स्पर्धा

४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित आणि मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने किशोर गट (४ फुट ११ इंच) तसेच व्यावसायिक पुरुष व…

शेवा गावातील कोळी समाजाचा JNPT विरोधात ऐतिहासिक चॅनेल बंद आंदोलन!

समुद्रात उतरून संघर्षाची नवी लढाई; हा लढा हक्कांसाठी, सन्मानासाठी राज भंडारी पनवेल : उरण तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने ४० वर्षांपासून JNPT (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनेल बंद आंदोलन पुकारले होते. गावकऱ्यांनी पाण्यात उतरून आपला रोष व्यक्त केला, कारण समुद्रात उतरून असा लढा उभारण्यात आला होता.या आंदोलनात महिलांचे मोठे योगदान ठरले असून, त्यांनी आपल्या हक्कांसाठी पुढाकार घेतला व संघर्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.ज्यामुळे आंदोलन ऐतिहासिक ठरले. JNPT ने प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवा गाव विस्थापित केले आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवले. चार दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज जगत आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी संविधानिक मार्गाने लढा देत आहेत. दिवसाच्या उत्तरार्धात भारत सरकारच्या जलवाहतूक , पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. सर्बानंद सोनोवाल यांनी हॉटेल वेस्टिन, पवई येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश कोळी , आगरी समाज नेते श्री. जयेंद्रदादा खुणे , पर्यावरणप्रेमी श्री.नंदकुमार पवार, अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे, आणि फेडरेशन ऑफ फिशरीजचे मार्शल कोळी, यांनी केले. या बैठकीस रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी श्री.भरत वाघमारे, एसडीओ पनवेल श्री.पवन चांडक, तसेच जे.एन.पी.टी.चे अध्यक्ष श्री. उन्मेष वाघही उपस्थित होते. मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या ४० वर्षांच्या संघर्षकथांना ऐकून स्तब्ध झाले आणि आंदोलकांप्रती सहानुभूती व्यक्त केली. त्यानंतर, मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया ३ महिन्यांत पूर्ण करण्याचे शब्द दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले. सदरील चॅनेल बंद आंदोलनात नवी मुंबई पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहपोलीस आयुक्त श्री. संजय येनपुरे साहेब, उपायुक्त श्री. प्रशांत मोहिते साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत साहेब यांनी आंदोलन शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे आंदोलन सुरळीत पार पडले आणि गावकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक वळण मिळाले. आंदोलन यशस्वी करण्याकरिता सुरेश दामोदर कोळी (अध्यक्ष,हनुमान – शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळ, रमेश भास्कर कोळी ( अध्यक्ष, पारंपारिक मच्छिमार संघटना ), परमानंद कोळी ( मा. सरपंच हनुमान कोळीवाडा ), मंगेश अनंत कोळी ( उपाध्यक्ष ), हरेश महादेव कोळी, नितीन महादेव कोळी, उज्वला रमेश कोळी ( अध्यक्ष, विस्थापित महिला संघटना ), कल्याणी कोळी ( उपाध्यक्ष ), जगदीश जनार्दन शेवेकर, प्रकाश नाखवा यांनी खूप मेहनत घेतली.