चीनचा खोडसाळपणा
भारताचा शेजारी असणारा पण भारताला कायम पाण्यात पाहणारा चीन सतत काही ना काही खोड्या काढून दोन्ही देशातील तणाव कायम वाढवत असतो. हे आताच नाही तर १९६२ पासून चालू आहे. १९६२…
भारताचा शेजारी असणारा पण भारताला कायम पाण्यात पाहणारा चीन सतत काही ना काही खोड्या काढून दोन्ही देशातील तणाव कायम वाढवत असतो. हे आताच नाही तर १९६२ पासून चालू आहे. १९६२…
मोबाईलचा स्क्रीन बोटांनी वर खाली हलवत असताना स्क्रीनवर मेसेज येतो, की तुमचे क्लाउड स्टोरेज जवळपास भरले आहे. त्यानंतर, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही स्टोरेज खरेदी करता; पण हा सर्व ‘क्लाउड डेटा’…
अलीकडच्या काळात भारत आणि तालिबान यांच्यातील संबंधांमध्ये बरीच प्रगती दिसून आली आहे. अफगाणिस्तानातील लोकांना मानवतावादी मदतीसाठी भारत सातत्याने प्रयत्न करत आहे. भारताने अद्याप तालिबानला मान्यता दिलेली नाही; परंतु अफगाणिस्तानातील लोकांना…
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व…
ठाणे : १६ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून हजारोंच्या संख्येने युवा प्रशिक्षणार्थी आझाद मैदान, मुंबई येथे सहभागी झाले होते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून सरकार मायबापाने…
अनिल ठाणेकर ठाणे :राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत दिली. तर विविध सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. त्यानुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.५ च्या कलम ३ (१) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत नागरिकांना विविध सेवा पुरविण्यात येतात. नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत काल मर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिल प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये (परिशिष्ट सोबत जोडले आहे) नमूद केल्याप्रमाणे या सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ०००००
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात बैठक पडली पार कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ ची प्रगती, ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा आढावा घेतला. सर्व प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या पूर्णत्वासाठी योग्य त्या सूचना दिल्या. तसेच या प्रकल्प उभारणीतील अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले. यावेळी खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त मुद्गल, अतिरिक्त महानगर आयुक्त मनुज जिंदाल, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त जमीर लेंग्रेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रशांत काळे, निलेश शिंदे, नवीन गवळी, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, वामन म्हात्रे आदी पदाधिकारीही उपस्थित होते. महत्वाचे प्रकल्प आणि त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण, कामांची पूर्तता आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पांना गती द्यायची असेल तर लवकरात लवकर जमीन अधिग्रहण करा, अशी सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. बदलापूर – कांजुरमार्ग मेट्रो मार्ग १४ चा फायदा अधिकाधिक भागाला कसा होईल, त्यासाठी मार्गाच्या आरेखनात बदल करता येईल का याची चाचपणी करण्याची सूचना केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील ३८० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील ‘यू टाईप’ रस्त्यांना गती देण्याच्या सूचना केल्या. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील वर्दळीच्या शहाड उड्डाणपूल रुंदीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने करण्याच्या सूचना उल्हासनगर मनपा आयुक्तांना दिल्या. उल्हासनगर मनपा क्षेत्रातील प्रमुख ७ रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली काटई फ्री वे या प्रकल्पांसाठी वेगाने जागा अधिग्रहीत करण्याची सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. 00000
कल्याण आणि भांडुप परिमंडलात पीएम सूर्यघर योजनेचा लाभ कल्याण :प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत १३ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. यातील २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. तर शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे. महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांनी https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा असून सर्व सुविधा ऑनलाईन व पेपरलेस उपलब्ध आहेत. 0000
मुरबाड पोलिसांच्या तपासावर शंका राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यातील सरळगांव येथील आंबेडकर चळवळीतील अभ्यासू नामवंत वकील आणि ग्रुप ग्रामपंचायत सरळगावचे विद्यमान सदस्य ऍड प्रफुल रोकडे व त्यांचे भाऊ अक्षय रोकडे यांनी सरळगाव नाक्यावर म्हसा यात्रेकरीता येणा-या लोकांचे स्वागताचा पोस्टर लावत असताना तेथील गुंड प्रवृत्तीचे विष्णु सदाशिव घुडे, वैभव सदाशिव घुडे व अक्षय सदाशिव घुडे यांनी जातीयद्वेष भावनेतून जातीय वाचक शिवगाळ करत बेदम मारहाण केली.याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी अक्षय घुडे, विष्णू घुडे, वैभव घुडे व इतर ५ ते ६ आरोपीं विरोधात ॲट्रॉसिटी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र राजकीय वरदहस्त असल्याने आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे मुरबाड पोलीस तपास यंत्रणेवर आंबेडकरी समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र नव्याने आलेले पोलीस निरीक्षक गिते यांनी आरोपी दोन दिवसात अटक करतो अशा वलग्ना केल्या, माझ्यावर विश्वास ठेवा मात्र त्यांच्या वलग्ना हवेतच विरल्या. त्यामुळे पोलीस देखील आरोपीना पाठीशी घालत आहेत हे उघड झालं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंबेडकर चळवळीतील नामवंत वकील व ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ऍड प्रफुल रोकडे व त्यांचा भाऊ अक्षय रोकडे यांनी बाजारपेठेत म्हसा यात्रेतील भाविकांचे स्वागत करण्याचे बॅनर लावण्यासाठी तेथे आले. बॅनर लावत असताना आरोपी अक्षय घुडे यांनी यावर आमदार कथोरे यांचा फोटो आहे. त्यामुळे हा बॅनर लावू नये असा दम दिला. आणि तुमची लायकी नाही, म… समाजाच्या लोकांना बॅनर लावण्यासाठी ही जागा नाही. त्यावर संयम ठेवत ऍड रोकडे यांनी, आम्ही बॅनर बाजूला लावतो, असे सांगत असताना आरोपी विष्णू घुडे,यांनी धावत येत काहीही ऐकून न घेता अक्षय यास मारण्यास सुरवात केली. यावेळी ऍड रोकडे यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ऍड प्रफुल्ल रोकडे यांना देखील जातीय वाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली, या मारहाणीत ऍड रोकडे व त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला. व मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असल्याने तो खाली कोसळला. आरोपी विष्णू, वैभव, अक्षय त्यावरच न थांबता ऍड प्रफुल्ल व भाऊ अक्षय यांना फरफटत नेले. आणि ऍड प्रफुल्ल रोकडे यांचा गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. कसे बसे त्यांच्या तावडीतून निसटून त्यांनी मुरबाड पोलीस स्टेशनं गाठले. सदर घटना इतकी गंभीर असताना देखील, आणि पाच सहा दिवस उलटून गेले तरी मुरबाड पोलीस स्टेशनं चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते यांनी कोणतेही ऍक्शन न घेता आरोपीना पाठीशी घातले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी आरोपी अटक करतो, काळजी करू नका असे बोलणाऱ्या मुरबाड पी आय गिते यांच्या तपास यंत्रनेवर आंबेडकरी समाजाला संशय निर्माण झाला आहे.येत्या दोन दिवसात आरोपी अटक केले नाहीत तर पोलिसांच्या अपयशाच्या आणि निक्रियतेच्या विरोधात आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलनच्या माध्यमातून पोलीस प्रशासना विरोधात संताप व्यक्त करत ऍड प्रफुल्ल रोकडे व भाऊ अक्षय रोकडे यांच्या हल्लेखोरांना अटक साठी मागणी करणार आहेत. 0000
गावित यांचे गौरवोद्गार जी. एन. एम नर्सिंग विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा योगेश चांदेकर पालघरः नर्सिंग हा व्यवसाय नसून मानवतेची सेवा करण्याचे हे व्रत आहे. जगभरातच सध्या नर्सिंग स्टाफचा तुटवडा असून पालघर येथील ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’ संचलित ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स’च्या विद्यार्थ्यांना भारताबरोबरच परदेशातही उत्तम व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची संधी आहे. ते पालघरचे नाव जगभरात उंचावतील, असा विश्वास आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला. ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’च्या व ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स’च्या प्रथम वर्षाच्या जी.एन. एम. नर्सिंग विद्यार्थ्यांच्या शपथविधी सोहळ्यात गावित प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी बोईसरचे आमदार विलास तरे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, माजी नगराध्यक्ष उज्वला काळे, शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे, संस्थेचे अध्यक्ष शांताराम वळवी, सचिव जतिन संखे, उपाध्यक्ष रूपाली गावित, सदस्य रोहित गावित आदी उपस्थित होते. प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गावित यांनी फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांच्या परिचारिका सेवेच्या व्रताचा पाया तसेच मुंबईतील काशीबाई गणपत या पहिल्या परिचारिकेने आरोग्य सेवेतील दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. पालघर जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षात पाच हजार एक्केचाळीस मुलाचे मृत्यू कुपोषण आणि पुरेशा उपचाराअभावी झाले. त्याला केवळ आरोग्य विभाग जबाबदार नसून प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि तंत्रज्ञनाचा अभाव हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. माता, बाल मृत्यूचे प्रमाण नाशिक जिल्ह्यातील कळवण, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, अमरावती परिसरातील चिखलदरा तसेच गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातही पालघर जिल्ह्यासारखीच स्थिती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. त्यांची चूक आहे, तिथे बोलले पाहिजे, त्याचबरोबर त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या पाहिजेत, ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण घेतलेले पुरेसे कर्मचारी मिळत नाही, ही शासनाची अडचण आहे, असे गावित म्हणाले. दक्षिणेतील परिचारिका जगभर दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू या राज्यात परिचारिकांचे प्रमाण मोठे आहे. सेवाभाव हा त्यांच्या वृत्तीत आहे. त्यामुळे आखाती देशात तसेच आपल्या देशातही विविध ठिकाणच्या रुग्णालयात केरळ आणि तामिळनाडूच्या परिचारिकांचे प्रमाण मोठे आहे, असे निदर्शनास आणून गावित म्हणाले, की आता आपल्याकडे हे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी एकट्या कुटंबात वृद्धांची सेवा करण्यासाठी आता परिचारिकांना मागणी आहे. परिचारिकांची कामगिरी ही केवळ पैशात मोजाली जाणारी नाही, तर त्यापेक्षा खूप महत्त्व आहे. समाजसेवेतील ते एक महत्त्वाचे कार्य आहे. हिरो आणि समाजाची आई! परिचारिका ही रुग्णांसाठी केवळ सिस्टर नसून ती सेवाभावाने काम करणारी आई असते. रुग्णांची काळजी घेण्यासोबतच त्यांना सावरण्यास मदत करीत असते. त्यामुळे पॅरामेडिकल स्टाफ हा खऱ्या अर्थाने समाजाचा ’हिरो’ असतो. समर्पण, मेहनत, कौशल्य हे जर असेल तर कोठेही चांगली नोकरी मिळू शकते. आणि तंत्रज्ञानाच्या बदलाबाबत तुम्ही सातत्याने सतर्क राहा आणि स्वतःला अपडेट करत राहा, असा सल्ला गावित यांनी दिला. पालघर आणि राज्याचे नावही ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’च्या ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’चे विद्यार्थी जगात उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यातही उत्तम संधी या वेळी आमदार तरे म्हणाले, की नर्सिंग हे सेवाभावी क्षेत्र आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता भविष्यातही नर्सिंग क्षेत्राला उत्तम संधी निर्माण होणार आहेत. नर्सिंग क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संवेदनाशील, दक्ष, शिस्तप्रिय व समाजसेवी वृत्तीचे असणे महत्त्वाचे आहे. या वेळी बाळासाहेब पाटील यांनीही फ्लॉरेन्स नाईंटिंगेल यांच्या कार्याचा तसेच मदर तेरेसा यांच्या कार्याचा गौरव करताना परिचारिकांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले. या क्षेत्राला भावी काळातही मोठा वाव आहे असे त्यांनी सांगितले. 00000