Category: होम

कोकणी-मालवणी माणूसच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही

सुनील प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई : लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुका होतील. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर कोकणी मालवणी माणूसच भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, विधानसभेतील शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी काल रात्री विश्वास व्यक्त केला तर दादरमध्ये सगळ्या जत्रा होतात पण मालवणी जत्रोत्सव होत नाही, अशी खंत व्यक्त करुन माहीमचे आमदार, विभागप्रमुख महेश सावंत यांनी दादरमध्ये मालवणी जत्रोत्सव भरविण्याचे सूतोवाच केले. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ आयोजित आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ तसेच मागाठाणे मित्र मंडळाच्या सहकार्याने मालवणी महोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या महोत्सवाची सांगता काल रात्री शिवसेना नेते प्रतोद सुनील प्रभू आणि आमदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी या दोघांनी आयोजकांचे कौतुक करतांना कोकणी मालवणी चाकरमान्यांनी ओसंडून वाहणारे मैदान हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. कोकणी माणूस आणि शिवसेना वेगळी करताच येणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने कोकणी मालवणी माणसाने पुढे नेण्याचे काम केले आहे. या मालवणी महोत्सवामुळेच कोकणी माणसाला शिवसेनेने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, असेही सुनील प्रभू यांनी सांगितले. उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांच्या सह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते मालवणी महोत्सव आणि देव गिरोबा मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक १४, १२ चे सर्व पदाधिकारी, मागाठाणे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी हा महोत्सव यशस्वी केला. प्रभू आणि सावंत या आमदारांनी सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांना शुभेच्छा दिल्या.

१९७२ साली अकरावी उत्तीर्ण झालेल्यांची आदिवासी शाळांमध्ये घसघशीत मदत

– सत्तरी गाठलेल्या ‘मुली मुलां’चा उत्साह कौतुकास्पद ठाणे, दि. (प्रतिनिधी) : अंबरनाथ येथील दि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय येथे १९७२ साली अकरावी (जुनी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी समाज माध्यमाद्वारे एकत्र येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात सुमारे सहा शाळांना भेट दिली आणि तेथील मुली, मुले आणि शिक्षक तसेच शाळांना घसघशीत सहाय्य केले. सत्तरी ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांच्या विधायक कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. समाज माध्यमावर ‘आम्ही १९७२चे विद्यार्थी’ असा समूह काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. या माध्यमातून १९७२ साली जुनी अकरावी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५४ मुली आणि मुलांनी (आज मितीस सत्तरीत असलेल्या) एकत्र येऊन काही विधायक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अंदाड येथे भेट दिली. ‌विशेष म्हणजे दि एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय या शाळेचीच शाखा अंदाड येथे असून सौ. दीपिका विशे या मुख्याध्यापिका आहेत.   त्यानंतर अंदाड येथे प्रवीण शिर्के मुख्याध्यापक असलेल्या  शाळेला भेट दिली. यानंतर  हीव, सपाटपाडा, मानिचा पाडा येथील शाळांना भेटी दिल्या. या ठिकाणी मडके, कुंदे, चौधरी, हुलावळे, पाटील असे शिक्षक आदिवासी मुले मुलींना आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पाटी, पेन्सिल, कंपॉस, वह्या, चित्रकला वह्या, रंग, खोडरबर, शाळेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, सतरंजी पट्ट्या, रोख रक्कम अशाप्रकारे सहाय्य करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक, कर्मचारी, गणवेशातील मुली, मुले यांनी अतीशय शिस्तबद्ध पद्धतीने या सत्तरीतल्या मुली मुलांचे प्रेमादराने स्वागत केले. रमेश कुर्जेकर, भारती सातघरे, भारती चव्हाण, ज्योती तावडे, सिद्धार्थ पुराणिक, सरोजिनी राणे, नीलांबरी गुप्ते, प्रतिभा धर्माधिकारी, प्रकाश मावळणकर, रत्नाकर कोर्डे, अनघा पोतनीस, संजीव पोतनीस, विजय औटी, दिगंबर वेर्णेकर यांचा या १९७२ च्या तुकडीत समावेश होता. भारती सातघरे, रत्नाकर कोरडे, सिद्धार्थ पुराणिक यांनी या तुकडीचे नेतृत्व करतांना मुंबईहून सर्व शालोपयोगी साहित्य आणण्यासाठी परिश्रम घेतले. उद्योजक (व विद्यार्थी) विश्वनाथ पनवेलकर यांनी ही सहकार्य केले.

देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठीचा सुगंध दरवळेल ! शरद पवार

दिल्ली येथे पार पडणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा स्वागताध्यक्ष म्हणून मराठी साहित्यकांशी आज संवाद साधला. गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझे दौरे, भाषणं सुरु होते. त्यातील सातत्यपूर्ण संबोधनामुळे माझा घसा बसला…

बिघडलेली ‌‘इंडिया‌’ आघाडी

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये ‌‘इंडिया‌’ आघाडीमध्ये बिघाडी सुरू झाली आहे. विरोधक कोण आणि मित्र कोण याचे भान ‌‘इंडिया‌’ आघाडीतील घटक पक्ष गमावून बसले आहेत. आता एकमेकांना संपवण्याची भाषा सुरू…

आजची युवा पिढी व सद्यस्थिती

जगातील सर्वात तरुण जन देश जर कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या १४४ कोटी इतकी आहे. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या ही…

देवाच्या दारी आणखी किती बळी?

भाविकांची हुल्लडबाजी आणि बालाजी मंदिर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत तिरुमल्ला येथे सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्येक शहरांमध्ये प्रति बालाजी मंदिरे असताना इतक्या गर्दीच्यावेळी जाऊन जीव धोक्यात घालण्याची…

मुंडे विरोधातील मोहिमेला भाजपाचे बळ ?

महाविकास आघाडीच्या नव्या सरकारची स्थापना सरत्या वर्षी 5 डिसेंबरला झाली. सरकारचा शपथविधी झाला आणि 17 डिसेंबरला सरकारमध्ये मंत्री मंडळातील सर्व 42 जागा एकाच फटक्यात भरल्या गेल्या. त्या मंत्र्यांना खाते वाटप…

‘डीप क्लिनींग ड्राईव्ह’मुळे कमी होऊ लागले हवेतील धुळीचे प्रमाण

नवी मुंबई : नियमित स्वच्छता करण्यासोबतच ज्या रस्त्यांवर अधिक वर्दळ असते किंवा एखादा दुर्लक्षित परिसर असतो अशा ठिकाणांकडे विशेष लक्ष देत त्याठिकाणी डीप क्लिनींग करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे…

नूतन हिंदी प्राथमिक हायस्कूल येथे हस्तकला व विज्ञान प्रदर्शन संपन्न

कल्याण : कल्याण पूर्वेतील राष्ट्रीय सेवा परिषद संस्थेच्या नूतन हिंदी प्राथमिक  विद्यालयातील प्राथमिक विभागाचे सुंदर कलाकृती व विज्ञानावर आधारित प्रयोग यांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक शाळेत संस्थापक शिवकुमार त्रिपाठी व मुख्याध्यापिका अनुप्रिता पटवर्धन मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध शालेय उपक्रमांचे आयोजन करत असतात. विद्यार्थी दरवर्षी कला, व्यावहारिक अनुभव आणि विज्ञान विषयांवर आधारित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कलाकृती आणि प्रयोग सादर करतात. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देणे आहे. यावर्षी देखील याच उद्देशाने एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये गणेश विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रदर्शन व्यवस्थित पार पडण्यासाठी अन्नू पांडे, मीनल पाटील, वृता पाटील, चंद्रकला सिंग, रशिदा खान, सोनल त्रिपाठी, अंजू पांडे आणि कमलेश मिश्रा ह्या शिक्षकांनी व शाळेतील कर्मचारी रामजी यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थी व पालक इत्यादींच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.