Category: होम

श्री उद्यानगणेश कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलची विजयी सलामी

मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूल, बालमोहन विद्या मंदिर, उत्कर्ष मंदिर तर मुलींमध्ये बालमोहन विद्या मंदिर, एसआयईएस, चुनाभट्टी हायस्कूल आदी शालेय संघांनी…

अवजड वाहतूकदरांच्या समस्या सोडवणार अवजड वाहतूक सेना अध्यक्ष उदय दळवी

केतन खेडेकर मुंबई : शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी वाहतूकदारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी भाऊचा धक्का येथे सर्व पदाधिकारी आणि वाहतूक दणांसोबत आंदोलन केले. वाहतूकदारांना अटल शेतीवरून…

क्रिकेट प्रशिक्षक संजय गायतोंडेना वैद्य पुरस्कार

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या एमसीए शरद पवार इनडोअर क्रिकेट अकॅडमितील फलंदाजीचे माजी प्रशिक्षक, एमसीए प्रशिक्षण समितीचे माजी चेअरमन ६४ वर्षीय जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक संजय गजानन गायतोंडे यांची कुर्ला स्पोर्ट्स…

ममता दिना निमित्त मुलुंडमध्ये रुग्णांना फळांचे वाटप

मुंबई : शिवसेना ठाकरे गट तर्फे मुलुंड विधानसभेच्या वतीने माॅसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा झालेल्या ममता दिना निमित्त श्रीमती म. तु. अग्रवाल, श्रीमती श्यामकुवंरबाई जटाशंकर डोसा प्रसूतीगृह, स्वातंत्र्यवीर सावरकर…

शासकीय आरोग्यसेवेचा कार्यभार आशाताईंच्या खांद्यावर

शहापूर : शहापूर तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून येथील आरोग्यसेवा आशा कार्यकर्त्यांच्या खांद्यावर टाकून मदमस्त आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आपली जबाबदारी झटकत असल्याचे निदर्शनात आले…

 बदलापूर–खोपोली लोकल बंद

कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक   मुंबई : मध्य रेल्वेच्या कर्जत येथील यार्डमध्ये सुधारणा, कर्जत स्थानकावरील पायाभूत कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, १२ जानेवारीला विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत बदलापूर – खोपोली लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील पळसधरी आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप, डाऊन आणि मधली मार्गिकेवर रविवार, १२ जानेवारीला दुपारी १.५० ते ३.३५ या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत बदलापूर – खोपोली स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी १२.२० वाजता सुटणारी सीएसएमटी – खोपोली आणि दुपारी १.१९ वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येणार आहे. दुपारी १.४० वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येणार आहे. रविवारी दुपारी १.५५ वाजता सुटणारी कर्जत – सीएसएमटी लोकल, दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली – सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून चालवण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुपारी ३.२६ वाजता कर्जत – सीएसएमटी लोकल बदलापूर येथून सुटेल. गाडी क्रमांक २२१९४ ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस दुपारी २.५० ते ३.३५ दरम्यान चौक येथे थांबवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेद्वारे देण्यात आली. 00000

आरोपी संजय मोरेला जामीन नाहीच

कुर्ला बस दुर्घटना प्रकरण मुंबई : गेल्या महिन्यात कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे याने जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून मोरेने जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांनी शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर निर्णय देताना तो फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. मोरे याच्या जामीन अर्जावर शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, न्यायवैद्यक अहवाल आणि आरटीओचा अहवालाचा दाखला देऊन मोरे हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नव्हता. तसेच, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. त्यामुळे, मोरे याच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा दावा करून पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. मोरे हा चांगला चालक नसून त्याच्यापासून धोका आहे. त्यामुळेच, त्याला जामीन मंजूर करू नये. तसेच, जामिनावर सुटका झाल्यास तो पळून जाण्याची शक्यता असल्याचा दावाही पोलिसांनी मोरे याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करताना केला होता. दुसरीकडे, आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे आणि विद्युत बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. किंबहुना, या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिला जात असल्याचा दावा मोरे याच्या वतीने युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला होता. या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक करण्यात आलेली नाही किंवा आरोपी करण्यात आलेले नाही. आपल्याला कार्यालयात बसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि दिंडोशी बस आगारात विद्युत बस चालविण्यास सांगितले. त्यानंतर, आपल्याला कुर्ला येथे बस चालविण्यास परवानगी देण्यात आली. तसेच, या दुर्घटनेसाठी आपल्या एकट्याला जबाबदार धरता येणार नसल्याचा पुनरूच्चार करून आपल्याला जामीन मंजूर करण्याची मागणी मोरे याच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली होती.

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकजवळील, झोपड्या रेल्वेकडून जमीनदोस्त

कल्याण : विठ्ठलवाडी पूर्व रेल्वे स्थानकाजवळ पदपथावर पक्की बांधकामे करून अनेक कुटुंब मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर राहत होती. रेल्वे स्थानकाला खेटून या झोपड्या असल्याने रेल्वे प्रशासनाने गुरुवारी रेल्वे सुरक्षा बळ आणि…

डोंबिवलीत दहशत माजविणाऱ्या भाईला भर रस्त्यात पोलिसांचा चोप

डोंबिवली : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता परिसरात दहशत असलेला एक भाई रविवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान महात्मा फुले रस्त्यावरून स्वताची मोटार चालवित होता. या भाईने मोटारीच्या दर्शनी भागाचा प्रखर…

 ठाणे महापालिकेने आखला शंभर दिवसांचा कार्यक्रम

 कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन सेवा सज्जता आणि स्वच्छता मोहिमेवर भर   ठाणे : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने १०० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वंकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात आला आहे. या सर्वाची यशस्वी अमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिकेनेही कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यात, नागरी सुविधांच्याबाबतीत कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात यावे. महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे. माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावी. महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात, यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवून त्यावेळी शक्यतो फिल्ड व्हिजिट ठेवू नयेत. नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करावे. तसेच, महापालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अमलबजावणी करावी, असेही या कृती कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले आहे. कृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे बैठक घेतली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे यांच्यासह पालिकेचे सर्वच अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीबाबतचे सादरीकरण केले. या आढावा बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त राव यांनी राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत विवेचन केले. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचे कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने कृती कार्यक्रम हाती घ्यावा. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे काटेकोर आयोजन आणि यशस्वी अमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले. नागरिकांचे जीवन सुखकर करणे याला प्राधान्य आहे. आपल्या मुलभूत कर्तव्यांचा तो महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावे. प्रशासन सुसंगत पद्धतीने काम करीत असल्याचे नागरिकांना जाणवले पाहिजे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. 0000