Category: होम

  भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व स्त्रियांच्या विकासाचा पाया रचणा-या थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिननिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार…

 ‘बुक्स इन बस’ उपक्रमांतर्गत नवीन पुस्तकांचा समावेश

   नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या   नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या व्होल्वो वातानुकूलित बसेसमध्ये ‘बुक्स इन बस’ (बसमधील चालते फिरते ग्रंथालय) हा आगळावेगळा उपक्रम जानेवारी 2022 पासून सुरू…

घराघरात सावित्रीमाईंचा फोटो लागलाच पाहिजे – उमेश पाटील

    ठाणे : मुली सर्वाच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत असून सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, प्रसंगी दगडगोटे खाऊन मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने झटत राहिल्या त्या सावित्रीबाई फुले…

संजय वाघुले यांच्या पुढाकाराने आवश्यक सरकारी कागदपत्रांसाठी ठाण्यात शिबिरे

    अनिल ठाणेकर ठाणे :भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने ठाण्यातील नागरिकांच्या सुविधांसाठी टपाल विभागाच्या माध्यमातून आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ…

मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिला उपेक्षितच

श्रमिक मुक्ती संघटनेकडून महिलांच्या नावाची दखल घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अंबरनाथ : नावात आईचे नाव समाविष्ट करणे, मालमत्तांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करून त्यांचा योग्य तो सन्मान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र गावठाण हद्दीतील मालमत्ता नोंद मोहिमेत महिला वर्ग वंचित राहिल्याची बाब समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात गावठाण भागांचे सर्वेक्षण सुरु असून त्याद्वारे नागरिकांना मालमत्ता नोंदी देण्यात येत आहे. मात्र या नोंदींमध्ये घरातील फक्त पुरुषांची नावे असून महिलांचे यात नाव टाकण्यात आली नाही. याबाबत श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करत या नोंदींमध्ये कुटुंबातील पतीसह पत्नीचेही नाव नोंदविण्याची मागणी संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. ग्रामीण भागातील सर्व गावठाणांमधील घरांचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे काम सुरु आहे. त्या सर्व्हेच्या आधारे प्रत्येक घराचा तपशील आणि नकाशासह सनद तयार करून तिचे वाटप करण्यात येणार आहे. त्या सनदींचे काही नमुने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाहिले. त्या सर्व सनदींवर कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषांचेच नाव असून त्यावर महिलांच्या नावाचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांवर शासनाने केलेला हा मोठा अन्याय आहे असे मत श्रमिक मुक्ती संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे. शासनाने शिधापत्रिकेवर महिलेचे नाव कुटुंबप्रमुख म्हणून नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. २००६ सालच्या वनहक्क मान्यता कायद्यामध्ये वनहक्काची सनद पती आणि पत्नी दोघांच्या नावे करण्याची तरतूद आहे. तर २० नोव्हेंबर २००३ च्या निर्णयानुसार घर पती आणि पत्नी दोघांच्या नावे केले जात आहे. असे असताना ग्रामीण भागातील मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिलांना का वगळले, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. तसेच प्रगतशील आणि पुरोगामी असा लौकिक असणाऱ्या महाराष्ट्राचे हे धोरण प्रतिगामी असल्याची टीका श्रमिक मुक्ती संघटनेने केली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून मुरबाडमधील महिलांच्या सामूहिक स्वाक्षऱ्या असलेले निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून या नोंदींमध्ये कुटुंबातील महिलांचे नाव घ्यावे अशी मागणीही यावेळी केली आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक ॲण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन

    मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक ॲण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या रंगीत”दिनदर्शिका २०२५” चे प्रकाशन मुंबई पोर्ट प्राधिकरण रुग्णालयाच्या उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा वाघ यांच्या हस्ते ३ जानेवारी…

सतीश प्रधान यांची रविवारी शोकसभा

    ठाणे :ठाणे शहराचे शिल्पकार सतीश प्रधान यांचे श्रेय वादातीत आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी, ५ जानेवारी सायंकाळी ४.३० वाजता सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहात आयोजन…

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे,  दिनेश तायडे, अनघा कदम, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थ‍ित होते.

कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील गावांसाठी पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाची मंजुरी

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मानले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे आभार अनिल ठाणेकर कल्याण डोंबिवलीसह नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता दिल्याने कल्याण डोंबिवलीसह २७ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पाणी पुरवठा योजना करण्याबाबत कल्याण डोंबिवलीकरांना शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केल्याचे सांगत कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी  यापुढेही सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. केंद्र शासनाचे भक्कम पाठबळ राज्याला मिळत असून राज्य शासन केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्हा आणि कल्याण डोंबिवली परिसराचा अधिक वेगाने विकास होईल असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयातील कुस्तीपटूंचे यश

  मुंबई : मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर येथे कुस्तीच्या सरावा करिता येणाऱ्या , मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयातील कुस्तीपटूंनी पालघर…