Category: होम

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे विशेष निमंत्रित सदस्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हाउसिंग फेडरेशन आदरणीय सन्मानीय मा. श्री.सीतारामजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. 🎂🌷💐 वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ज्योती भगत  भारतीय मराठा महासंघ विभाग प्रमुख उद्योग आघाडी घोडबंदर रोड व मानवता सेवा चे सदस्य व हिरानंदानी इस्टेट आणि सोहम गार्डन च्या मॅनेजर  व मित्र परिवार उपस्थित होते.

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ६ जानेवारीला – शुभांगी साठे

  अशोक गायकवाड रत्नागिरी :जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे जानेवारी२०२५ चा लोकशाही दिन सोमवार दि. ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात १…

अमित शहांनी त्या वक्तव्यातून अदानीला वाचवले

रमेश औताडे मुंबई : भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर असा जप काय  करता, असा सवाल तुच्छतेने लोकसभेत केला. त्यातून नवा वाद उभा करून इतर विषयावरील प्रश्न व चर्चा थांबवत त्यांनी अदानीला वाचवले. आणि लोकसभेत त अदाणी वरील चर्चेतून भाजपचीही खुबीने सुटका केली. असा स्पष्ट आरोप संविधान तज्ज्ञ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष  डॉ. सुरेश माने यांनी केला. मुंबईतील धारावी येथे बौद्ध, मातंग, चर्मकार कार्यकर्त्यांच्या एका संयुक्त मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. सुरेश माने यांच्यासह दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, मातंग समाजातील नेते प्रबुद्ध साठे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे या मेळाव्यात मार्गदर्शक होते. आपल्याला भरकटवून सरकारवर शेकणाऱ्या मुद्द्यांपासून भाजप पक्ष स्वतः ची सुटका करून घेत आहे.  इतरांनी लादलेल्या अजेंड्यावर काम करण्याचे आपण थांबवणार आहोत की नाही ? असा सवाल यावेळी डॉ. सुरेश माने यांनी केला. प्रास्ताविक भाषण या मेळाव्याचे एक निमंत्रक  आंबेडकरवादी भारत मिशनचे संयोजक दिवाकर शेजवळ यांनी केले. तर, सूत्रसंचालन चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगावकर यांनी केले.

असुरक्षित मुलांच्या परिवर्तनासाठी आशेचा किरण

  रमेश औताडे मुंबई : गेल्या २९ वर्षांमध्ये ११ हजारहून अधिक गरजू मुलांचे पालनपोषण करत त्यांना फक्त निवराच नाही तर , दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी देऊन…

 बोरीवली पूर्व येथे मालवणी महोत्सव

कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी मुंबई : मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२ च्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार, ४ जानेवारीपासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै.  अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजतां परंपरेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील श्री देव गिरोबा मंदिराच्या प्रतिकृती आणि बालनगरी व बाजारपेठेचे महा आरती तसेच पारंपारिक गाऱ्हाणे घालून उद्घाटन करण्यात येणार आहे. या मालवणी महोत्सवाचे यंदाचे २७ वे वर्ष असून रविवार, १२ जानेवारी २०२५ पर्यंत कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध होणार आहे. रोज सायंकाळी ७ वाजतां श्री देव गिरोबाची वाजंत्री तरंगासह पालखी आणि रात्री ८ वाजतां दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांनी दिली.

 सिडकोची अनधिकृत बांधकामांवर सन 2024 मध्ये प्रभावी कार्यवाही

2,102 अनधिकृत बांधकामांचे निष्कासन; 2 लाख चौ.मी. हून अधिक क्षेत्र केले अतिक्रमणमुक्त     नवी मुंबई : विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली, सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता…

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महोत्सवामधून चालना- कीर्ती किरण पुजार

अशोक गायकवाड रत्नागिरी : मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्याचबरोबर त्यांचा बौधिक, शारीरिक, मानसिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवासारखे महोत्सव उपयुक्त आहेत, असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून आज छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे करण्यात आला. यावेळी बाल कल्याण समिती सदस्य ॲड रजनी सरदेसाई, ॲड प्रिया लोवलेकर, शिरीष दामले, बाल न्याय मंडळ सदस्य ॲड विनया घाग, राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रुपेश पेडणेकर, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु श्रीरंग कद्रेकर, लांजा संस्थेच्या संचालक मंगला नाईक आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार म्हणाले, मुलांचा केवळ बौध्दिक विकास करुन चालणार नाही, तर त्याबरोबरच शारीरिक मानसिक विकासासाठी त्यांच्यामधील कला, क्रीडा, कौशल्य अशा सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. त्यासाठी जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे. भविष्यातील सुदृढ आणि सक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. विद्यार्थ्यांनी अशा महोत्सवांमध्ये सहभागी व्हावे. त्यामधून जीवनात उज्ज्वल यश संपादन करा. जिल्हा माहिती अधिकारी सातपुते म्हणाले, मन, मनगट आणि मेंदूचा विकास होण्यासाठी मैदानाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकांमध्ये लपलेल्या कलागुणांना बाहेर काढण्याची एकमेव जागा म्हणजे विविध महोत्सव होय. अशा महोत्सवांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण, क्रीडा कौशल्य आर्वजून सादर करावीत. त्यामध्येच भविष्यातील बीजे रोवलेली असतात. प्रास्ताविकेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हावळे म्हणाले, जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुर्नवसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांमध्ये बंधुभाव, सांघिक भावना व नेतृत्व गुण निर्माण होण्याच्या दृष्टीने दरवर्षी चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित केला जातो. यामध्ये ५०० मुला मुलींनी सहभाग घेतला आहे. क्रिकेट, खो खो , कबड्डी अशा क्रीडा प्रकाराबरोबरचे निबंध, चित्रकला, सामुहिक गायन, नाटिका अशा सांस्कृतिक स्पर्धाही होणार आहेत. रोटरी क्लबच्यावतीने यावेळी ४० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिविक्षाधीन अधिकारी अनिल माळी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, चाचा नेहरु आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आली. जिल्हा परिविक्षाधीन अधिकारी अतिश शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॕड योगेंद्र सातपुते यांनी केले.

नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार

 गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ हरिभाऊ लाखे नाशिक : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान ४२५ दशलक्ष लिटर क्षमतेची साडेबारा किलोमीटर नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सध्या लोखंडी पाईपवर गंज प्रतिबंधक प्रक्रिया केली जात आहे. लवकरच खोदकाम होऊन प्रत्यक्ष पाईप टाकले जातील. या जलवाहिनीद्वारे पुढील ३० वर्षातील संभाव्य लोकसंख्येचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गंगापूर धरणातून सध्या बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत सिमेंटच्या वाहिनीद्वारे पाणी आणले जाते. साधारणत: अडीच दशकांपूर्वी केलेली ही सिमेंटची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. गळतीमुळे पाणी पुरवठ्यात अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून १८०० मिलीमीटर व्यासाची मुख्य लोखंडी जलवाहिनी टाकण्याचे निश्चित केले होते. प्रारंभी या कामासाठी २१० कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. हे काम जिंदाल कंपनीला मिळाले. विविध कारणांस्तव रखडलेल्या या कामाचा श्रीगणेशा झाला आहे. नव्या जलवाहिनीचे काम नऊ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. गंगापूर धरणातून शहरात येणाऱ्या उजवा तट कालव्याची जागा पाटबंधारे विभागाकडून यापूर्वीच महापालिकेकडे हस्तांतरीत झाली आहे. त्या जागेत जुन्या वाहिनीला समांतर ही नवीन जल वाहिनी टाकण्यात येईल. या कामासाठी अवाढव्य लोखंडी पाईप नियोजित मार्गात आणण्यात आले आहेत. सध्या लोखंडी पाईपवर गंज प्रतिबंधक प्रक्रिया सुरू असून आठवडाभरात खोदकाम होऊन प्रत्यक्ष पाईप टाकण्याचे काम सुरू होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी सांगितले. क्षमता कशी विस्तारणार ? नाशिक शहरातील पाणी पुरवठ्यासाठी ७५ टक्के पाणी गंगापूर तर २५ टक्के पाणी मुकणे धरणातून घेण्यात येते. सद्यस्थितीत एकूण ५५५ दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेतले जाते. यातील गंगापूर धरणातून अस्तित्वातील वाहिन्यांची क्षमता सुमारे ३०० दशलक्ष लिटर आहे. हे सर्व पाणी शहरातील सात केंद्रात शुद्धीकरण करून ११९ जलकुंभ आणि सुमारे अडीच हजार किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांमधून वितरित केले जाते. गंगापूर धरण ते बारा बंगला ही नवीन जलवाहिनी जुन्या वाहिनीला समांतर असणार आहे. नवीन जलवाहिनीची क्षमता २२ तासात ४२५ दशलक्ष लिटर पाणी वहनाची आहे. ती २४ तास कार्यरत राहिल्यास ही क्षमता ४६० दशलक्ष लिटरपर्यंत जाऊ शकते. शहराची २०५५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून जलवाहिनीचे नियोजन झाल्याचे अधिकारी सांगतात.

पनवेलमध्ये आरोग्यकिरण हेल्थ एक्स्पो

पनवेल : आरोग्यकिरण व कृष्णा इव्हेंटच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील गोखले सभागृहात दिनांक  ४ व ५ जानेवारी आरोग्यकिरण हेल्थ एक्स्पो २०२५ आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे  उदघाटन शनिवार दिनांक ४ जानेवारीला…

कोकणातील तीन रेल्वेगाड्या ठाणे, दादरपर्यंत धावणार

मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे फलाट क्रमांक १२ आणि १३ ची पायाभूत कामे केली जात आहेत. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या…