Category: होम

मारकडवाडीमध्ये मतपत्रिकेवर प्रतिकात्मक मतदान होणारच

सोलापूर: माळशिरसमधील मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आज, सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मारकडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी ईव्हिएमचा झोल उघड करण्यासाठी मतदानपत्रिकेवर प्रतिकात्मक मतदान मारकवाडीत घेतले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी…

दिवा-भिवंडी-विक्रमगड नवा लोहमार्ग टाकण्याची खासदार सवरा यांची मागणी

रेल्वेमंत्र्यांचे विविध मागण्यांकडे वेधले लक्ष योगेश चांदेकर पालघरः दिवा-भिवंडी-अंबाडी-कुडूस-वाडा-विक्रमगड असा नवा लोहमार्ग टाकण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सरवा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. पालघर जिल्ह्यातील रेल्वेच्या अन्य प्रश्नाकडेही त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात डॉ. सवरा पालघर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मंत्र्यांच्या निदर्शनास आणत आहेत. त्यासंबंधीची निवेदनेही ते देत आहेत. गेल्या दहा-वीस वर्षात दिवा-भिवंडी-अंबाडी- कुडूस- वाडा- विक्रमगड या भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकसंख्येची वाढती घनता लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढणे आवश्यक आहे. या भागात नवीन लोहमार्ग टाकला, तर प्रवाशांना मध्य रेल्वेच्या दिवा जंक्शन पर्यंत जाणे शक्य होईल. तसेच थेट कोकणात जाण्याचा मार्ग सुलभ होईल. याशिवाय भिवंडी-वाडा हे लोहमार्गाच्या नकाशावर येऊ शकतील, असे त्यांनी निदर्शनास आणले आहे. लांब पल्ल्याच्या चार गाड्यांना थांबा द्या याबाबत खा. सवरा यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले आहे. वसई येथे मेगा टर्मिनल सुरू करण्याबाबत वैष्णव यांनी दिलेला आश्वासनाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय पश्चिम रेल्वे मंडळाच्या बैठकीत कच्छ एक्सप्रेस, दादर बिकानेर एक्सप्रेस, बांद्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस आणि बांद्रा गाजीपूर एक्सप्रेस या लांब पल्यांच्या गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून याठिकाणी देशभरातील कामगार वेगवेगळ्या उद्योगात काम करतात; परंतु त्यांना दक्षिण आणि उत्तर भारतात जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यांना मुंबई किंवा सुरतला गाड्या पकडण्यासाठी जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालघर या जिल्हास्तराचा विचार करून रेल्वे मंडळाला पालघर येथे या चार लांब पडलेल्या गाड्यांना थांबा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी वैष्णव यांच्याकडे केली आहे. मेमो गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वेची आरक्षित जागा नालासोपारामधील निलमोरे या गावात आहे तलावाच्या आकाराची ही जागा बाग आणि क्रीडांगणासाठी महापालिकेने आरक्षित केले आहे. या जागेवर खर्च करण्यासाठी रेल्वेने ही जागा वसई विरार महापालिकेकडे द्यावी आणि त्यापैकी दहा हजार चौरस फुटाची जागा कमी होण्यासाठी द्यावी, अशी मागणी खा. सवरा यांनी वैष्णव यांच्याकडे केली. मेमो गाड्या घोलवडपर्यंत आणण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय बलसाड फास्ट पॅसेंजरपूर्वी सकाळी ११ ते दुपारी दोन आणि सायंकाळी साडेचार ते रात्री आठपर्यंत मेमो गाड्या सुरू कराव्यात, सुरतसाठी सकाळी नऊ ते दुपारी बारा दरम्यान आणि सायंकाळी चार ते संध्याकाळी सात दरम्यान पॅसेंजर अगोदर मेमो सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली.     उपनगरीय सेवा वापीपर्यंत वाढवा मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सध्या डहाणूपर्यंत आहे. ती घोलवड किंवा उंबरगाव, वापी पर्यंत वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही सेवा वाढवली, तर त्याचा फायदा विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होईल असे खासदार सवरा यांनी म्हटले आहे.  

जनादेशाचा अवमान

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मागच्याच सरकारवर लोकांनी विश्वास दाखवला. प्रचंड बहुमत देऊनही दोन्ही ठिकाणी मित्रपक्षांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ प्रमुख पक्षांवर आली. सरकार स्थापन करण्याला प्राधान्य देण्याऐवजी राजकीय आजार बळावण्याने एकीकडे सरकार…

MG स्पोर्ट्स क्लब पुणे टुर्नामेंटमध्ये उपविजेते

पुणे : कॅप्टन साहिल कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली, MG स्पोर्ट्स क्लबने पुणे टुर्नामेंटमध्ये अपूर्व कामगिरी केली आणि उपविजेते म्हणून स्पर्धा संपवली, ज्यामध्ये त्यांच्या चिकाटी आणि कौशल्याचे दर्शन झाले. टुर्नामेंटमध्ये एक उत्तम कामगिरी करणारा खेळाडू होता शिवम ठोम्बरे, ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच्या अत्युत्तम ऑलराऊंड योगदानामुळे तो डोक्यावर ठरला. गोलंदाज म्हणून, शिवमच्या गोलंदाजीचे स्पेल्स महत्त्वपूर्ण क्षणांत निर्णायक ठरले, कारण त्याने सातत्याने ब्रेकथ्रू दिले जेव्हा टीमला त्यांची गरज होती. मैदानावर देखील त्याचे प्रदर्शन उल्लेखनीय होते, एक शानदार कॅच घेतल्याने एका सामन्याचा कल बदलला आणि टीमला मोठा गती मिळवून दिला. शिवमचे दबावाच्या परिस्थितीत बॉल आणि क्षेत्ररक्षणात यशस्वी योगदान MGSC च्या यशात महत्त्वपूर्ण ठरले. त्याच्या फलंदाजीतील योगदान देखील महत्त्वाचे होते, कारण त्याने टुर्नामेंटच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये मोलाचे धावा दिल्या. त्याच्या सर्वांगीण कौशल्यामुळे आणि खेळाकडे त्याच्या परिपक्व दृष्टिकोनामुळे तो MG स्पोर्ट्स क्लबसाठी एक अत्यंत प्रभावशाली खेळाडू ठरला आणि त्याला योग्य प्रमाणात मान्यता मिळाली. रौनित सिंग हा दुसरा प्रमुख खेळाडू होता, जो टीमचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून उभा राहिला. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरी आणि तणावाच्या परिस्थितीत सामन्याचा भाग्य बदलण्याची क्षमता त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आली. रौनितने अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या, ज्यामुळे MGSC ला फायनलपर्यंत पोहोचायला मदत झाली, आणि त्याची फलंदाजी आणि शांतता त्याला टीमच्या फलंदाजीच्या रचनेतील कणा बनवून ठेवली. माझ खान देखील MGSC च्या फायनलपर्यंतच्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरला. त्याची स्थिर फलंदाजी, विशेषतः महत्त्वपूर्ण क्षणांत, टीमला आवश्यक ती आधार देत होती, ज्यामुळे टीम महत्त्वाच्या टप्प्यांवर योग्य मार्गावर राहिली. टीमचे गोलंदाज, ज्यात रामलखन राजभर आणि निशांत पिल्लाई यांचा समावेश आहे, हे देखील महत्त्वपूर्ण होते, कारण त्यांनी महत्त्वाच्या वेळी विकेट्स घेतल्या आणि विरोधकावर दबाव ठेवला. फायनलमध्ये, अनेक खेळाडूंनी, ज्यात विगनेश गवडे, शिवम शर्मा, अर्णव सापकाल, धैर्य अश्तेकर, वेदांत राजिवले, अनिकेत धावले, भाविक सोनी आणि अहमद खान यांचा समावेश आहे, मोठे योगदान दिले. MG स्पोर्ट्स क्लबचा फायनलपर्यंतचा प्रवास त्यांच्या सामूहिक कौशल्य आणि निर्धाराचे प्रतीक होता, आणि त्यांनी टुर्नामेंट गर्वाने आणि भविष्याच्या आशा भरण्यासह संपवला.

डॉ. भागवतांच्या विधानावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे…

घ्या समजून राजे हो अविनाश पाठक समाजात प्रत्येक जोडप्याला किमान तीन अपत्य असावीत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरक संघ चालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केले…

महा वने लावावी नानाविध

संविधान कीर्तन मालिका शामसुंदर महाराज सोन्नर भाग सहा संतांच्या प्रबोधन चळवळीने मांडलेल्या सुधारणावादी विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात कसे उमटले आहे, याचा धांडोळा आपण घेत आहोत. भारतीय संविधानाच्या अनुछेद 12 ते…

राजावाडी क्रिकेट क्लबचा मोठा विजय

ठाणे : क्षमा पाटेकर आणि निव्या आंबरेच्या अष्टपैलू खेळामुळे गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखान्याचा १३१ धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या मर्यादित ४० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दणदणीत पराभव केला. राजावाडी क्रिकेट क्लबने ५ बाद २३६ धावांचा बचाव करताना माटुंगा जिमखान्याला ३३ षटकात १०५ धांवावर गुंडाळत दुसऱ्या फेरीतले स्थान निश्चित केले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय माटुंगा जिमखान्यासाठी फायदेशीर ठरला नाही. क्षमा पाटेकर आणि निव्या आंबरेने अर्धशतकी खेळी करत संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. क्षमाने १२ चौकारासह ६३ धावांची खेळी केली. निव्याने नऊ चौकार मारत ५३ धावा केल्या. दिक्षा पवारने नाबाद ३३ आणि किमया राणेने २४ धावा केल्या. माटुंगा जिमखान्याच्या त्रिशा परमारने दोन, समीक्षा घाडगे, अनन्या शेट्टी आणि रेनी फर्नांडेझने प्रत्येकी एक बळी मिळवले. उत्तरादाखल राजावाडी क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवताना थोड्या थोडया धावांच्या फरकाने फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवून विजय साकारला. पराभूत संघाकडून रेनी फर्नांडेझने सर्वाधिक २७, तिशा कपूरने नाबाद १७ आणि गार्गी बांदेकरने १७ धावा करत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली. विजयी संघाच्या क्षमा पाटेकर, वैष्णवी पोतदार, निव्या आंबरे आणि तनिशा धनावडेने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. निवेदी जैतपालने एक बळी मिळवला. क्षमा पाटेकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. संक्षिप्त धावफलक : राजावाडी क्रिकेट क्लब : ४० षटकात ५ बाद २३६ ( क्षमा पाटेकर ६३, निव्या आंबरे ५३, दिशा पवार नाबाद ३३, किमया राणे २४, त्रिशा परमार ७-१-३२-२, समीक्षा घाडगे ३-१९-१, अनन्या शेट्टी ८-३८-१, रेनी फर्नांडेझ ८-५३-१) विजयी विरुद्ध माटुंगा जिमखाना : ३३ षटकात सर्वबाद १०५ ( रेनी फर्नांडेझ २७, तिशा नायर नाबाद १७, गार्गी बांदेकर १७, निव्या आंबरे ८-१-२१-२, क्षमा पाटेकर ५-२०-२, वैष्णवी पोतदार ५-२२-२, तनिशा धनावडे ५-२१-२, निवेदी जैतपाल ४-९-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – क्षमा पाटेकर.

‘मुंबई स्पोर्ट्स २ रे ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर’ आणि ‘मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार प्रदान

मुंबई, मुंबई स्पोर्ट्स नुकतेच “स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर” व “मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट” चे पारितोषिक वितरण केले. हे पुरस्कार प्रवीण शेट्टी – अध्यक्ष, बंट्स संघ, आर. के. शेट्टी प्र. कार्यवाह बंट्स संघ, प्रदीप गंधे, रविराज ईळवे (कामगार आयुक्त), जय कवळी, उदय देशपांडे, जया शेट्टी, भास्कर सावंत आदी खेळातील दिग्गजांकडून वितरीत करण्यात आले. बक्षीस वितरणानंतर खेळाडूंनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या त्या पुढील प्रमाणे. ध्रुव सितवाला : त्यांना मुंबई स्पोर्ट्सकडून “स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2023-24” पुरस्कार प्रदान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी जाहीर केले की या पुरस्काराची रक्कम रु. 1,00,000/- (रु. एक लाख) मुंबई स्पोर्ट्सतर्फे भारतीय सैन्याच्या विधवांसाठीच्या निधीसाठी देणगी म्हणून दिली जावी. त्यांच्या या कृतीने ते फक्त त्यांच्या खेळाचेच चॅम्पियन नाहीत, तर हृदयानेही चॅम्पियन आहेत हे दाखवून दिले. अश्वार्या मिश्रा : यांनी आपला संदेश वडील आणि भाऊ यांच्या माध्यमातून पाठवला, त्यांनी तिच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. त्यांनी भारतातील अॅथलेटिक खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी आदिले सुमारिवाला यांचे आभार मानले. तसेच “मुंबई स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2023-24” पुरस्कारासाठी मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला. अक्षन के. शेट्टी : यांचा पुरस्कार त्यांचे वडील श्री करुणाकर शेट्टी यांनी स्वीकारला, जे पोइसर जिमखान्याच्या यशस्वीतेमागील मुख्य व्यक्तिमत्त्व आहेत. अक्षन यांनी मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा पुरस्कार म्हणजे घरच्यांनी आपल्या व्यक्तीला दिलेला सन्मान असल्याचे सांगितले. कुणाल कोठेकर : यांनी मुंबई स्पोर्ट्सने खेळाडूंना सन्मानित करण्याचा हा उत्कृष्ट उपक्रम असल्याचे सांगितले व सर्वांचे आभार मानले. रुतुजा खाडे : यांनी मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की मुंबईच्या खेळाडूसाठी हा पुरस्कार मिळणे हे अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. आमच्या कामगिरीची दखल मुंबईतील संपूर्ण खेळ जगात घेत आहे याचा अभिमान असल्याचे स्पष्ट केले. सोनाली बोराडे : यांनी पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. तसेच यामुळे तिचा हुरूप वाढल्याचे सांगितले आणि मुंबई स्पोर्ट्सचे आभार मानले. नताशा जोशी : पॅरा डेफ ऑलिम्पिक शूटर, यांनी सांगितले की मुंबई स्पोर्ट्स दरवर्षी खेळाडूंना पुरस्कार देऊन उत्तम कार्य करत आहे. मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेला सन्मान तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरेल आणि भविष्यातील मुंबईतील खेळाडूंना प्रेरणा देईल. मिलिंद वागळे : क्रिकेट समालोचक, यांनी मुंबई स्पोर्ट्सचे मनःपूर्वक आभार मानले आणि पद्मश्री उदय देशपांडे, त्यांच्या बालपणीच्या मित्राच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून आनंद व्यक्त केला. भाग्यश्री सावंत : यांच्या आईने पुरस्कार स्वीकारला व अशा प्रकारे पहिल्यांदाच सन्मान झाल्याचे सांगितले. प्रदीप गांधे  : “श्री मेजर ध्यानचंद लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड” विजेते, यांनी सांगितले की मुंबई स्पोर्ट्सने मुंबईतील खेळाडूंना त्यांच्या यशासाठी सन्मानित करण्याची अनोखी प्रथा सुरू केली आहे. त्यांनी मुंबई स्पोर्ट्सचे आभार मानले आणि खेळासाठी मुंबईत आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी सर्व खेळाडूंनी एकत्र यावे, असे आवाहन केले. जय कवळी : राजकीय पक्ष मुंबईतील खेळांसाठी काय उपाय योजना करणार आहेत?  खेळासाठी “स्पोर्ट्स लॉबी” तयार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले व त्या “स्पोर्ट्स लॉबी”ने राजकीय पक्षांकडे पाठपुरावा केला पाहिजे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षंनी मुंबईतील खेळांचा व त्याच्या विकासाचा मुद्दा निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर केला पाहिजे व त्याची अंमलबजावणी सुध्दा केली पाहिजे असे आवर्जून सांगितले. स्पोर्ट्स कोड तारक कि मारक :  स्पोर्ट्स कोडवर राजू भावसार, क्रीडा पत्रकार महेश विचारे व अॅड. नंदन कामत यांनी आपले परखड विचार मांडले व त्यातून राजू भावसार यांनी स्पोर्ट्स कोड तारकच असल्याचे सांगितले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला बंट्स संघाने त्यांचे सभागृह व भोजन व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली होती. या समारंभाचे सूत्रसंचालन क्षितीज वेदक यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळ तोरसकर यांनी केले.

महाराष्ट्र जिद्दीने खेळला हाच ‘सुवर्ण विजय’ – संदीप तावडे

मुंबई : ४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने आणखी एक सुवर्ण विजय मिळवला. या विजयाचे महत्त्व विशद करताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे शासकीय परिषद सदस्य संदीप तावडे यांनी संघाच्या जिद्दीचे आणि कौशल्याचे कौतुक केले. मातीचा गुण आणि जिद्द विजयाचा मार्ग दाखवतो “प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचा जो आपल्या मातीचा गुण आहे, तोच आपल्याला विजयाच्या मार्गावर नेतो. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या विजयाबद्दल खात्री होती; आम्हाला फक्त तो किती गुणांनी जिंकतो हे महत्त्वाचे वाटत होते,” असे तावडे यांनी नमूद केले. ओडिसाचा आव्हान आणि महाराष्ट्राची जिद्द ओडिसाच्या संघाने या स्पर्धेसाठी विशेष तयारी केली होती. त्यांनी काही नवीन तांत्रिक कौशल्ये विकसित केली होती, परंतु महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ती जिद्दीने पार केली. “ड्रीम रनसारखे नवीन नियम महाराष्ट्राच्या खेळाडूंवर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत, कारण तीनही फळीतील खेळाडूंनी मजबूत संरक्षण केले. इतर संघांवर मात्र या नियमांचा परिणाम दिसून आला,” असे तावडे म्हणाले. राज जाधवचा उत्कृष्ट खेळ “दुसऱ्या पाळीत संरक्षण करताना तिसऱ्या फळीतील दोन खेळाडू मैदानात उतरल्याने थोडेसे दडपण आले होते. परंतु राज जाधवने आपल्या उत्कृष्ट संरक्षणामुळे 1 मिनिट 40 सेकंद टिकून सामना सोपा केला,” असे त्यांनी सांगितले. संघाचा संपूर्ण विजय आणि भविष्यासाठी मार्गदर्शन तावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंनी जिद्द, कौशल्य आणि कठोर परिश्रमाने सुवर्णपदक मिळवले आहे. “महाराष्ट्र खो-खो संघाचे यश भविष्यातही कायम राहील, आणि हे विजय नवोदित खेळाडूंना प्रेरणा देतील,” असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या संघाने आपल्या मातीतील जिद्द आणि सांघिक मेहनतीच्या जोरावर सुवर्ण विजय संपादन केला आहे. हा विजय महाराष्ट्राच्या खो-खो परंपरेचा गौरव आहे. महाराष्ट्राच्या संघाच्या यशामागे जिद्द आणि मार्गदर्शनाचा हातभार – प्रशांत इनामदार ४३वी कुमार-मुली राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धा २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर, उत्तर प्रदेश येथे संपन्न झाली. स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या आणि कुमार संघांनी अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्यालयीन सचिव प्रशांत इनामदार यांनी या स्पर्धेतील अनुभव आणि संघाच्या कामगिरीबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रास कोर्टमुळे प्रारंभिक आव्हाने “या स्पर्धेतील क्रीडांगण ग्रास कोर्टचे होते, त्यामुळे सुरुवातीला खेळाडूंना या क्रीडांगणाशी जुळवून घेणे अवघड गेले. गवतावरून पाय घसरत असल्यामुळे खेळाडूंची दमछाक होत होती. तरीही त्यांनी आपल्या सर्वोत्तम कामगिरीने या अडचणींवर मात केली,” असे प्रशांत इनामदार म्हणाले. नियोजनाचा अभाव आणि खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक राष्ट्रीय स्पर्धेतील नियोजनाचा अभाव स्पष्ट होत होता. “निवास व्यवस्था सुमार दर्जाची होती, परंतु भोजन व्यवस्था मात्र सर्वोत्तम होती. खेळाडूंसाठी सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामुळे त्यांना विश्रांती मिळाली,” असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन संघाच्या यशामागे प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. “डॉ. चंद्रजीत जाधव, सचिन गोडबोले आणि प्रशांत पाटणकर यांनी संरक्षण व आक्रमणासाठी योग्य धोरणांची आखणी करून खेळाडूंना बोनस गुण कसे मिळवावेत याबाबत मार्गदर्शन केले,” असे इनामदार यांनी नमूद केले. मॅटवर अंतिम सामना आणि सरावातील फरक “मॅटचे क्रीडांगण एकच असल्यामुळे संघांना अंतिम सामना थेट मॅटवर खेळावा लागला. मॅटचा पूर्ण अंदाज नसल्यामुळे महाराष्ट्राने जास्त फरकाने विजय मिळवला नाही, पण तरीही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या खेळाडूंचा सराव सकाळी व सायंकाळी होतो, परंतु तिथे दिवसभर सामने खेळवले जात होते, त्यामुळे काहीशी आव्हाने निर्माण झाली,” असे त्यांनी सांगितले. खेळाडूंचा जिद्दीने विजय “महाराष्ट्राच्या कुमार संघाने उपउपांत्यपूर्व फेरीतील कोल्हापूर विरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यांतही दोन्ही संघांनी जिद्दीने खेळत सुवर्णपदक मिळवले,” असे इनामदार यांनी सांगितले. प्रशांत इनामदार यांनी संघाच्या कठोर परिश्रम, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले. राज्य निवड समिती आणि राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ चंद्रजीत जाधव व कार्याध्यक्ष श्री सचिन गोडबोले यांनी सर्वोत्तम संघ निवडला. त्यांचेही विशेष कौतुक. या विजयाने महाराष्ट्राच्या खो-खो परंपरेचा गौरव वाढवला आहे. कठोर परिश्रम हेच महाराष्ट्राच्या मुलींच्या खो-खो संघाच्या विजयाचे रहस्य – प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड ४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले आहे. या विजयाबद्दल बोलताना संघाचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी यशाचे श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला, तांत्रिक प्रशिक्षणाला, आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या भक्कम पाठबळाला दिले आहे. राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी आणि उत्कृष्ट संघनिर्मिती…

नवी मुंबईतील उत्तम माने यांना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १ सुवर्णपदक, ३ रौप्यपदक

अनिल ठाणेकर नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलमध्ये  मीनाताई ठाकरे स्टेडियमवर  ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ या दरम्यान महाराष्ट्र राज्यस्तरीय खेलो इंडिया स्पर्धा  संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत,  नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ  नागरिक संघाचे सदस्य उत्तम माने यांनी ६५+ वर्षावरील गटात सहभागी होऊन १ सुवर्ण पदक व ३ रौप्यपदक संपादन केली. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे ८३० खेळाडू सहभागी झाले होते, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. उत्तम माने हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोंदी या गावचे रहिवासी असून ते नवी मुंबईत सानपाडा येथे स्थायिक झाले आहेत.  उत्तम माने यांचे सद्या ७० वय  असून तरुणांना लाजवेल अशी त्यांनी कामगिरी केली आहे. उत्तम माने यांनी हातोडा फेकमध्ये  सुवर्ण पदक जिंकले आहे तर भालाफेक मध्ये रौप्यपदक आणि थाळी फेक मध्ये रौप्यपदक तसेच ४ x १०० मीटर रिले स्पर्धेत ही रौप्यपदक जिंकले आहे. नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांचे हस्ते पारितोषिक वितरण व स्पर्धेचा समारोप करण्यात आला.