Category: होम

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या आयपीएल स्पर्धेसारख्या खेळविण्यात येतील – विहंग सरनाईक

 ५ वर्षात उभारणार ५० मैदाने अनिल ठाणेकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या आयपीएल स्पर्धेसारख्या खेळविण्यात येतील असे प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीग (MPL) चे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी केले. तसेच महायुतीचे सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चवर मजबूत काम करत आहे .  म्हणून आपण सुद्धा क्रिकेट साठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे काम एकत्र करूयात आणि येत्या ५ वर्षात ठाणे जिल्ह्यात एक नव्हे तर ५० मैदाने उभारण्याचा निर्धार ठेवून असे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे ठाण्याला नवीन ओळख मिळणार आहे.स्पर्धेचे आयोजक आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीग (MPL) चे अध्यक्ष विहंग सरनाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य विकास पाटील, डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन चे सेक्रेटरी एम.डी.मराठे, अध्यक्ष जयंत वेलदे , सदानंद केळकर आदी उपस्थित होते. तर बाळाराम खोपकर यांनी सूत्रसंचालन केले ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध 48 व्या एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. त्यावेळी बोलताना विहंग सरनाईक यांनी वरील वक्तव्य केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या १६ वर्षांखालील स्टार स्पोर्टस् क्लब आयोजित एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ठाण्यातील श्री माँ विरुध्द कल्याण येथील के सी गांधी स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. के सी गांधी स्कुल ने श्री माँ विद्यालय शाळेचा पराभव करत एन. टी. केळकर चषकावर आपले नाव कोरले. गेली दोन वर्ष श्री माँ विद्यालयाने हा चषक जिंकला होता. मात्र ह्या वर्षी के सी गांधी शाळेने पारितोषिक जिंकल्याने त्यांची हॅट्ट्रिक हुकली. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न, ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ४५ षटकांच्या या स्पर्धेत श्री माँ विद्यालय शाळेने प्रथम फलंदाजी करून ३४.४ षटकात ११७ धावांवर के सी गांधी शाळेच्या गोलंदाजांनी रोखले तर ११७ धावांचा पाठलाग करतांना श्री माँ विद्यालयाच्या खेळाडूंना मात देत के सी गांधी शाळेच्या खेळाडूंनी हा सामना ३० षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात जिंकला असून ६ गडी राखून हा सामना जिंकला.

दणकून निवडून आलो तर ठणकावून उत्तर देऊ..!

  विश्वनाथ भोईरांचा माजी आमदार राजू पाटलांना टोला डोंबिवली :  ईव्हीएममशीन मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या भाजपा शिंदे यांची राजकीय खेळी सुरु असल्याची टिका मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या टिकेला आता शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठणकावून उत्तर देत सांगितले आहे की राजू पाटील जिंकले असते तर त्यांनी हा मुद्दा उचलला नसता. ते पडले तसेच त्यांच्या विरोधात आम्ही लढलो म्हणून हा आकस असू शकतो. त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. परंतू आता आम्ही दणकून निवडून आलो आहोत, तर ठणकावून उत्तर देतो असे भोईर म्हणाले आहेत. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएममशीन वरुन सत्ताधाऱ्यांविरोधात मोहीम सुरु केली आहे. विविध मतदारसंघातून विरोधी उमेदवारांनी व्हीव्हीपॅट मधील मत नोंदणीची तपासणी करण्याची मागणी केली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे हे निवडणूक जिंकले आहेत. येथे शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष भोईर व मनसेचे राजू पाटील यांचा पराभव झाला आहे. 66 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला आहे. याठिकाणी राजू पाटील व सुभाष भोईर यांनी जिल्हा प्रशासनाकडे येथील व्हीव्हीपॅट मशीनमधील मत मोजणीसाठी अर्ज केला आहे. तसेच राज्यातील सत्तातरणावरुन सध्या भाजपा आणि शिंदे गटात सुरु असलेले राजकीय नाट्यावर मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी भाष्य केले आहे. माजी आमदार पाटील म्हणाले, ईव्हीएमच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या काय राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले..शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे.. ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय येतोय. कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण 65 हजार मतदान वाढले आणि 66 हजार मतांनी शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झालेत.. वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का ?? असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे.एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीन मधील मते मोजण्याकरीता आठ लाख रुपये भरले आहेत असे पाटील यांनी म्हटले आहे. 0000

‘ग्रीन ग्रो आगरो अॅग्रो सोल्यूशन’चा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

ठाणे : मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे नुकतेच ‘ग्रीन ग्रो आगरो अॅग्रो सोल्यूशन’चा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्रालय बँकेचे उपाध्यक्ष श्री.सुनील खाडे उपस्थित होते. त्यांच्या…

– ‘गुजरातच्या लबाडांचे लक्ष आता ठाणे, मुंबई महापालिकेवर’

शिवसेना नेते विनायक राऊत यांचे वक्तव्य ठाणे : विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांनी यंत्रणेचा वापर करून विजय मिळवला, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता झालेला पराभव विसरुन कामाला लागले पाहिजे. कारण, गुजरातच्या लबाडांचे लक्ष ठाणे, मुंबई महापालिकेवर असल्याने सर्वांनी जागृत रहा आणि कामाला लागा असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी ठाण्यातील पदाधिकारी – कार्यकर्त्यांना केले. ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवासेना कार्यकर्त्याचा मेळावा ठाण्यातील खारकर आळी येथील एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मेळाव्याला संबोधित करत, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमधील पराभव विसरुन आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. ते पुढे म्हणाले, चोरांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडायचा असेल तर, एकजुटीने काम करा. महापालिका निवडणुका कधीही लागू द्या आतापासूनच कामाला लागा आणि ठाणे महापालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच भगवा फडकवा असे आवाहन देखील विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना केले. या निवडणूकीत पैसा आणि यंत्रणेचा वापर कसा झाला हे सर्वांनी पाहिले. विरोधकांनी या निवडणूकीत सरळ मार्गे विजय मिळवलेला नाही. त्यामुळे ही लोक म्हणजे सत्तेला चिकटलेली गोचीड आहे, अशी टीका देखील राऊत यांनी केली. तसेच शिवसेना संपलेली नाही आणि संपवणाऱ्यांची अवलाद देखील जन्माला आली नाही, त्यामुळे घाबरू नका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन विनायक राऊत यांनी उपस्थितांना केले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक विश्वास उटगी, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते अनिश गाढवे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, सहसचिव विश्वास निकम, ठाणे शहर समन्वय संजय तरे, संपर्कप्रमुख महेश नेणे, काँगेसचे जेष्ठ नेते मधु मोहिते, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटिका रेखा खोपकर, उपजिल्हा संघटिका संपदा पांचाळ, महेश्वरी तरे, आकांक्षा राणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ईव्हीएममुळे विरोधकांचा विजय झाला आहे. त्यामूळे खचून जाऊ नका, ठाणे महापालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा भगवा फडकवायला तयार रहा, असे आवाहन यावेळी शिवसेना नेते राजन विचारे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. तर, ही निवडणूक आपल्याला खूप काही शिकवून गेली. जेव्हा प्रचार करताना आम्ही फिरत होतो. तेव्हा ठाणेकर जोरदार स्वागत करत होते. अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव दिसून आला. मात्र, यामधून समजले हे ठाणे शिवसेनेचे होते आणि पुढे देखील शिवसेनेचेच राहील, असे मत शिवसेना (उबाठा) पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केले.

सिंहस्थासाठी हवा स्वतंत्र कक्ष

 ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडली हरिभाऊ लाखे नाशिक : नियोजनासाठी दरवेळी आव्हानात्मक ठरणारा नाशिकचा सिंहस्थ अवघ्या २२ महिन्यांवर आला असून, जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर दर मंगळवारी नियोजन बैठकाही सुरू झाल्या आहेत. एव्हाना सिंहस्थ नियोजनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन होऊन तेथे पूर्णवेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे आवश्यक होते. परंतु, अधिकारी, कर्मचाऱ्यांची फाइल सरकारदरबारी पडून असल्याने नियोजनाला गती येण्यास अवधी लागणार आहे. नाशिकचा सिंहस्थ पावसाळ्यात होत असल्याने त्याचे नियोजन करणे आव्हानात्मक काम असते. साधू-महंतांसह लाखोंच्या संख्येने शाही स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करताना प्रशासनाचा कस लागतो. त्युामुळे १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे किमान दोन ते तीन वर्ष आधी नियोजन सुरू करावे लागते. सन २०१५ नंतर आता सन २०२६-२०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. आता निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सिंहस्थाची दर मंगळवारी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक दोन बैठका झाल्या असून, स्वतंत्र सिंहस्थ कक्ष सुरू होणे आवश्यक आहे. आगामी सिंहस्थात ५० लाख साधू-महंत आणि पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. सर्व विभागांची कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी व जिल्हास्तरावर यंत्रणांच्या समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष तातडीने स्थापन करणे आवश्यक आहे. सिंहस्थाचे नियोजन अनेक यंत्रणांना सोबत घेऊन करावे लागते. त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र कक्षाची आवश्यकता आहे. परंतु, या कक्ष स्थापनेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या कक्षात ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यासंदर्भातही जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, तो अद्याप धूळ खात पडला आहे.

– एड्स जनजागृती प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या ठाणे : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने जागतिक एड्स दिन-२०२४ जनजागृतीपर प्रभात फेरी व विविध…

क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी ठाणे कार्यालयांतर्गत विविध उपक्रम व योजना

ठाणे –  राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या धोरणानुसार सन 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे योजिले आहे. जिल्हा ठाणे मधील क्षयरुग्ण परिणामकारक बरे होण्याची टक्केवारी सन 2023 – 95 टक्के…

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व पल्स पोलिओ मोहिम प्रभावीपणे राबवा

  जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये आवाहन ठाणे : ठाणे जिल्ह्यात ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच 8 डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या दोन्ही मोहिमांची तयारी पूर्ण झाली असून आरोग्य यंत्रणांनी दोन्ही मोहिमा प्रभावीपणे राबवावी व एकही बालक यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आज जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत करण्यात आले. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम तसेच नियमित लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांच्यासह जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमा यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांला जंतनाशकाची गोळी देण्यात यावी. तसेच यासाठी सर्व शासकीय शाळा, खासगी शाळांमध्ये योग्य ती खबदारी घेण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांनाही जंतनाशक गोळ्या तसेच पोलिओ डोस मिळेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या विट भट्टी परिसरातील नागरिकांच्या मुलांनाही जंतनाशक गोळ्या व पोलिओ डोस देण्यात यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ ते १९ वर्षे वयोगटातील चार लाख ५६ हजार ३५२ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला – मुलींमध्ये अॅनेमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे इत्यादी आजारांचा धोका उद्भवतो.  त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी जंतनाशकाची गोळी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे. महिला व बालविकास विभाग, पाणी पुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग तसेच शिक्षण विभागाच्या एकत्रित सहभागाने व समन्वयाने संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा कार्यक्रम शाळा व अंगणवाड्यामध्ये ४ डिसेंबर २०२४ व जंतनाशक मोहिमेच्या दिवशी जी मुले उपस्थित राहणार नाहीत त्यांना १० डिसेंबर २०२४ रोजी (मॉप अप दिवशी) गोळ्या देण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन स्तरावर प्रशिक्षण दिले असून सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नोडल शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कलाछंदचा कला अविष्कार दादरमध्ये करा : पद्मश्री उदय देशापांडे

ठाणे :’ भूतलावर तन-मन-धन ओतून रेखाटलेली माझी रांगोळी अल्पायुषी आहे. उद्या ती पुसली जाणार आहे. याची जाण असुनही रंगावळीकार रांगोळ्या काढताहेत दुसऱ्याला नेत्रसुख देताना स्वत: कलाविष्काराचा आनंद या श्री आनंद…

डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे होणार पुर्नसर्व्हेक्षण

डहाणू : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक या रेल्वे मार्गाची, अनेक दशकांची मागणी आहे. सदरची मागणी काही वर्षासाठी कालबाह्य झाली होती. मात्र, खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी ही मागणी पुन्हा पुर्नजीवीत केली आहे. या रेल्वे मार्गाचे पुर्नसर्व्हेक्षण होणार आहे. त्यासाठी  2  कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी खासदार डॉ.हेमंत सवरांनी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वेमार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  डहाणू- नाशिक रेल्वे सुरू करण्याची मागणी, या भागाचे पहिले तत्कालीन खासदार, जव्हार संस्थान चे राजे यशवंतराव मुकणे यांनी  1950  मध्ये केली होती. त्यानंतर या मागणीचा पाठपुरावा दिवंगत खासदार अॅड चिंतामण वनगा यांनी दोन तीन दशके केला आहे. दरम्यानच्या काळात तत्कालीन रेल्वे मंत्री राम नाईक यांच्या कार्यकाळात डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वे सुरू होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, नंतरच्या काळात या रेल्वे मार्गाची मागणी कालबाह्य झाली होती. आता पुन्हा पालघर चे खासदार डॉ.हेमंत सवरांनी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणी ला पुर्नजीवीत केले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या रेल्वे मार्गाच्या पुर्नसर्व्हेक्षणाला परवानगी दिली आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मार्गाची गरज…… आदिवासी भागात खरीप पीकाव्यतिरीक्त अन्य ऊत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे येथील आदिवासी, रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरीत होतात. या भागात कारखानदारी अथवा औद्योगिक वसाहत नाही. स्थानिक ठिकाणी महिला बचत गटांकडून उत्पादित अथवा तयार केलेल्या मालाला बाजारपेठ ऊपलब्ध होत नाही. शिक्षीत तरूणांना रोजगार नाही. त्यामुळे या भागात रेल्वे मार्ग झाल्यास, सर्व सुविधा तसेच रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाची गरज आहे. पुर्नसर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड या तीन आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्यात यावा. या तालुक्यातील मुख्य बाजारपेठांलगत सदरचा रेल्वे मार्ग व्हावा, तसे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर. ००००